मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाडवा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ पाडवा  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कार्तिकाची प्रतिपदा

येई घेऊन गोडवा.

दीपावली दिनू खास

होई साजरा पाडवा. . . . !

 

तेल, उटणे लावूनी

पत्नी हस्ते शाही स्नान.

साडेतीन मुहूर्ताचा

आहे पाडव्याला मान. . . . !

 

रोजनिशी, ताळमेळ

वही पूजनाचा थाट

येवो बरकत घरा

यश कीर्ती येवो लाट. . . . !

 

सहजीवनाची  गाथा

पाडव्याच्या औक्षणात

सुख दुःख वेचलेली

अंतरीच्या अंगणात.. . . . !

 

भोजनाचा खास बेत

जपू रूढी परंपरा.

व्यापारात शुभारंभ 

नवोन्मेष स्नेहभरा.. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्याचा उत्सव व्हावा…. ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्याचा उत्सव व्हावा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणे

ध्यास असावा नित नूतनाचा उगा कशाला झुरणे

लावीत जावे मनामनातून आनंदाचे झाड

धडपडताना जपत रहावे मूल मनातील द्वाड.

 

कशास बुरखे विद्वत्तेचे कशास आठ्या भाळी

वाचियले ते कुणी कधी का लिहिले काय कपाळी

फुलवित जाव्या चिवटपणाने स्वप्नफुलांच्या वेली

उगारील जो हात,तयाच्या हातावरती द्यावी टाळी.

 

असतील,नसतील सुंदर डोळे;तरी असावी डोळस दृष्टी

ज्याच्या त्याच्या दृष्टीमधूनी दिसेल त्याची त्याची सृष्टी

शोधित असता आनंदाला कधी न व्हावे कष्टी

मर्म जाणतो तोच करीतसे सुख सौख्याची वृष्टी.

 

वाट वाकडी असली तरीही सरळ असावे जाणे

काट्यामधूनी,दगडामधूनी जावे सहजपणाने

शोधित जाता ताल सुरांना सुचतील मधुर तराणे

आयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणे.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लक्ष्मी पूजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ लक्ष्मी पूजन  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

अमावस्या  अश्विनाची

दिवाळीचा मुख्य सण

अंधाराला सारूनीया

प्रकाशात न्हाते मन. . . . !

 

धनलक्ष्मी सहवास

घरी नित्य लाभण्याला

करू लक्षुमी पूजन

हवे सौख्य  जीवनाला… !

 

धन आणि अलंकार

राहो अक्षय टिकून

सुवर्णाच्या पाऊलाने

यावे सौख्य तेजाळून.. . . !

 

प्राप्त लक्षुमीचे धन

हवा तिचा सहवास

तिच्या साथीनेच व्हावा

सारा जीवन प्रवास. . . . !

 

सुकामेवा ,  अनारसे

फलादिक शाही मेवा

साफल्याची तेजारती

जपू समाधानी ठेवा.

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 85 – फराळ..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #85 ☆ 

☆ फराळ..! ☆ 

(दिवाळी निमित्त खास छोट्या दोस्तांसाठी.. बालकविता…!)

आई म्हंटली दिवाळीला

फराळ करू छान

फराळात चकलीला

देऊ पहिला मान..!

 

गोल गोल फिरताना

तिला येते चक्कर

पहिलं कोण खाणार

म्हणून घरात होते टक्कर..!

 

करंजीला मिळतो

फराळात दुसरा मान

चंद्रासारखी दिसते म्हणून

वाढे तिची शान..!

 

एकामागून एक करत

करंजी होते फस्त

फराळाच्या डब्यावर

आईची वाढे गस्त..!

 

साध्या भोळ्या शंकरपाळीला

मिळे तिसरा मान

मिळून सा-या एकत्र

गप्पा मारती छान…!

 

छोट्या छोट्या शंकरपाळ्या

लागतात मस्त गोड

दिसत असल्या छोट्या तरी

सर्वांची मोडतात खोड..!

 

बेसनाच्या लाडूला

मिळे चौथा मान

राग येतो त्याला

फुगवून बसतो गाल..!

 

खाता खाता लाडूचा

राग जातो पळून

बेसनाच्या लाडू साठी

मामा येतो दूरून..!

 

चटपटीत चिवड्याला

मिळे पाचवा मान

जरा तिखट कर

दादा काढे फरमान..!

 

खोडकर चिवडा कसा

मुद्दाम तिखटात लोळतो

खाता खाता दादाचे

नाक लाल करतो…!

 

दिवाळीच्या फराळाला

सारेच एकत्र  येऊ

थोडा थोडा फराळ आपण

मिळून सारे खाऊ..!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपावली शुभेच्छा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपावली शुभेच्छा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

? नव वर्ष सुखाचे जावो ?

                      

या दीपामधल्या वाती

अंधारा भेदून जाती

स्नेहाने जोडून नाती

प्रकाश गीते गाती.

 

तम सगळा विरून जावा

कण कण  तो उजाळावा

दुःखाचा अंश नसावा

सौख्याचा बाग फुलावा.

 

दशदिशांत दिपक उजळो

कलहाचे वादळ निवळो

मन प्रसन्नतेने बहरो

नववर्ष सुखाचे जावो.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सण ☆ प्रा. अशोक दास

प्रा. अशोक दास

? कवितेचा उत्सव ?

सण ☆ प्रा. अशोक दास ☆ 

सारीच घरे ऊजळलेली

प्रकाशाने लखलखलेली

तरीही एका झोपडीत अंधार

तो आपण करूया दूर/1/

 

सारेच चेहरे आनंदलेले

प्रसन्नतेने  ओतप्रोत भरलेले

तरीही एखादे मुख दुर्मुखलेले

त्यावर पाहू हास्य फुललेले/2/

 

सा-यांच्याच मुखी गोड घास

सुगंधाने भारलेला श्वास निःश्वास

तरीही कुठेतरी घुसमट आहे

तिथेही गंध,गोडी वाटू हमखास/3/

 

दुःख,दैन्य असतेच कुठे कुठे

आनंदाने न्हाऊन निघताना तिथे

थोडी मदत देऊया त्या हाती

प्रसन्नतेने साजरा सण सर्वांसाठी/4/

 

© प्रा. अशोक दास

इचलकरंजी / मो 9028574666

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागताचा दीप ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वागताचा दीप ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

सालभर राबूनिया

करू आशा रुजवण

पाच सणांचे मिलन

दिवाळीचा मोठा सण ||

 

अविचार जळमटे

झाडू मना स्वच्छ करू

घरा समवेत मन

साफ सुशोभित करू ||

 

नाती कशी दुरावली

याचा उहापोह करू

सारे आपुलेच सगे

स्नेहबंध घट्ट करू ||

 

विसरुनी चुका करू

एकमेकांचे स्वागत

दिवाळीच्या पर्वामध्ये

पुन्हा प्रेम पल्लवित ||

 

रांगोळी फराळ भेटी

दिवाळीचे आकर्षण

आठवणीने जपत

देऊ आनंदाचे क्षण ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नर्क चतुर्दशी.. . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ नर्क चतुर्दशी.. . !  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

वध नरकासुराचा

आली वद्य चतुर्दशी .

पहाटेचे शाही स्नान

मांगलिक चतुर्दशी. . . . . !

 

अपमृत्यू टाळण्याला

करू यमाला तर्पण.

अभ्यंगाने प्रासादिक 

करू क्लेष समर्पण. . . . !

 

नारी मुक्ती आख्यायिका

आनंदाची रोजनिशी

फराळाच्या आस्वादाने

सजे नर्क चतुर्दशी. . . . . !

 

एकत्रित मिलनाची

लाभे पर्वणी अवीट

गळाभेट घेऊनीया

जागवूया स्नेहप्रीत.. . . !

 

रोषणाई, फटाक्याने

होई साजरा  उत्सव.

दारी नाचे दीपावली

मनोमनी दीपोत्सव. . . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपावली ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ?।दीपावली।? ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

आनंदाच्या सौंदर्य लेण्यांनी

नटली सजली दीपावली

प्रतिकूलतेवर मात करूनी

विजयी झाली दीपावली ।१।

 

भ्रष्टाचारांच्या दुर्गुणांचा

नरकासूर मारून 

करुया अभ्यंग स्नान

मांगल्याने सजवू बघा दीपावली|२|

 

सद्गुणांचे दीप लावून

करु या लक्ष्मीपूजन

असमानतेचा अंधकार दूर सारून

समानतेच्या सुरेखा रंगांनी सजवू दीपावली।३।

 

बलीराजाच्या औदार्यांने

बलीप्रदा बघ आनंदली

भाऊ बहिणीच्या अतूट नात्याने                                                                

हासरी भाऊबीज , नाचली‌ दीपावली |४|

 

 स्वागताची रा॑गोळी

 पहा किती हर्षली

 र॑गीत दिव्यांनी घरे कशी शोभली

 मयूर‌ पंख लेवून आली‌ सखी

दीपावली |५|

 

 गोड ‌तिखटाचा संगम ‌झाल

जणू श्रीमंत गरीबांचा मेळ झाला 

करंजी ची चंद्रकोर सर्वांना भावली

समानतेची जणू आली दीपावली |६|

 

प्रकाशाचा सण हा भारी

अंधकार सारा‌ दूर करी

सत्यम् शिवम् ने कशी फुलली

तेजोमय ही आली दीपावली|७|

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आली धन त्रयोदशी.. . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ आली धन त्रयोदशी.. . !  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(अष्टाक्षरी)

दीपावली सणवार

अश्विनाची  त्रयोदशी

निरामय  आरोग्याची

आली धन त्रयोदशी.. . !

 

आरोग्याची धनवर्षा

वैद्य धन्वंतरी स्मरू

दान मागू आरोग्याचे

प्रकाशाची वाट धरू. . . . !

 

लावू कणकेचा दिवा

करू यम दीपदान

लाभो मनी समाधान

मागू आयुष्याचे दान . .. . . !

 

तन, मन, आणि धन

यांचे वरदान नवे .

धन त्रयोदशी दिनी

स्नान अभ्यंगाचे हवे.. . . !

 

धन, धान्य, आरोग्याने

घरदार सजलेले .

सुखी,  समृद्ध जीवन

अंतरात नटलेले.. . . !

 

धन त्रयोदशी दिनी

माय माउलीचे न्हाणे

अन्नपूर्णा तिच्या ठाई

गाई आनंदाचे गाणे. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print