मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आम्ही वारकरी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आम्ही वारकरी…  ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आम्ही वारकरी  /आमुची पंढरी

नांदतो संसारी  / दृढ भावे

 

अखंड चिंतन / शब्दब्रह्मी लीन

देतसे प्रमाण  / वैराग्याचे

 

घ्यावा समाचार / करावा संसार

प्रेमे चराचर  / आदरावे

 

उदर भरण / नव्हे देव ध्यान

दांभिकाचे मन  / ओळखावे

 

मानावा अभाव  / खोटा भेदभाव

करावा स्वभाव  / मृदुतेचा

 

आत्ममग्न मन  / वैभवाची खाण

विश्वाचे कल्याण  / घ्यावे चित्ती

 

जीवनाचा सार  / सात्विक विचार

दैवी साक्षात्कार / मानावा तो

 

सुखाची ही वारी /पंढरीच्या दारी

संतांची चाकरी /स्वर्ग सुख

 

तुकोबा महान  / करी विवेचन

तोडतो बंधन  / देहाचे या

 

तुकाम्हणे मज  / भेटला विठ्ठल

संसाराचा झोल  / सोडवाया

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 159 – संत जनाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 159 संत जनाई ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

दमा कुरुंडाई पोटी

गंगाखेड नगरीत।

स्वयंसिद्ध कवयित्री

जनाबाई जन्म घेत।

 

दमा ठेवी चाकरीस

दामा घरी जनाईस।

विठ्ठलाचे भक्त थोर

नामा भेटे जनाईस।

 

रोज दळण कांडण

शेणपाणी करी जनी।

साथ विठ्ठल भक्तीची

पांडुरंग ध्यानीमनी।

 

जैसा नामा तैसी जनी

सत्ता ज्यांची विठूवरी।

भक्तीसाठी जाते ओढी

शेला सोडून श्रीहरी।

 

ओव्या अभंग रसाळ

नित्य जनाई मुखात।

गावोगावी कीर्ती त्यांची

गुंजे जनमानसात।

 

सामान्यात असामान्य

अशी जनाईची ख्याती

संत कबिरांच्या कानी

गेली जनाईची कीर्ती ।

 

भारी अप्रुप वाटले

आले कबीर भेटीस।

शेण्यासाठी भांडणारी

पडे जनाई दृष्टीस।

 

शेण्यातुनी विठू नाद

कबिरांना ऐकविला।

नाम स्मरणाचा ऐसा

श्रेष्ठ भावार्थ दाविला।

 

एकनिष्ठ शिष्या शोभे

संत श्रेष्ठ नामयास।

देह ठेविला दासीने

नामदेव पायरीस।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पालखी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पालखी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

निघाली पंढरपूरी पालखी llध्रुll

 

पालखीतही मीच विराजे

मीच वाहते माझे ओझे

विठूमाऊली, दुखले खांदे

फुंकर तू घाल की      ll1||

 

मोह, क्रोध, मद सांडत गेले

निर्मळ, पावन, हलके झाले

हीण असे जे उरलेसुरले

तूच विठू जाळ की     ||2||

 

शेवटची ही मजल गाठली

विठूचरणी या मुक्ती लाभली 

नि:संगावर माझ्या उरली

विठूचीच मालकी      ||3||

 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वारकरी नाचे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ वारकरी नाचे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(उत्कृष्ठच !वाखरीचे रिंगण असो देहु-आळंदीहून पालखींचे प्रस्थान हा सोहळाही नयनरम्य भक्तीचा असतो)

आकाशाला गवसणी घालणारा

पांडुरंगाशी अभंगी बोलणारा

आषाढाचा थेंबसरी झेलणारा

संसाराचे सुख-दुःख पेलणारा.

 

आत्मज्ञान साक्षात्कार तो दैणारा

दिंडी-दिंडीत पाप-पुण्य घेणारा

काय महती पंढरीस नेणारा

भेदाविन भक्तासंगे संत होणारा.

 

हाच तो कृष्ण सावळा  घन सांडतो

पंढरीच्या वाळवंटी खेळ मांडतो

मुक्ता जनाईसवे दैवही कांडतो

पुंडलीक सावतासंगे जो भांडतो.

 

असा हा विठ्ठल तिन्ही लोका सांभाळे

वारकरी नाचे टाळ गर्जे आभाळे.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #181 ☆ पांडुरंग… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 181 – विजय साहित्य ?

🌼 पांडुरंग…! 🌼 ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

वारकरी पंथ । झाला एकरूप  ।।

दावी निजरूप  । पांडुरंग ।।१।।

 

युगे अठ्ठावीस । वाहे चंद्रभागा ।।

अंतरात जागा  । पांडुरंग ।।२।।

 

माळ वैजयंती  । हात कटीवर ।।

शोभे रमावर  । पांडुरंग  ।।३।।

 

संत सज्जनांची । पुण्यमयी ठेव।।

आशिर्वादी पेव। पांडुरंग  ।।४।।

 

वैष्णवांचा मेळा  । करीतसे वारी ।।

कैवल्य कैवारी । पांडुरंग  ।।५।।

 

हरिनाम मुखी। सदा घेत जाऊ ।।

जीवनात  पाहू । पांडुरंग  ।।६।।

 

कविराज वाणी । चिंतनात रंग।।

जोडीला व्यासंग  । पांडुरंग  ।।७।।

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #167 ☆ पाऊस… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 167 ☆ पाऊस☆ श्री सुजित कदम ☆

तुझ्या माझ्यातला पाऊस

आता पहिल्यासारखा

राहिला नाही..

तुझ्या सोबत जसा

पावसात भिजायचो ना

तसं पावसात भिजण होत नाही

आता फक्त मी पाऊस

नजरेत साठवतो…

आणि तो ही

तुझी आठवण आली की

आपसुकच गालावर ओघळतो..

तुझं ही काहीसं

असंच होत असेल

खात्री आहे मला

तुझ्याही गालावर नकळत

का होईना

पाऊस ओघळत असेल…!

 

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विठ्ठला ☆ श्री रमेश जावीर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ विठ्ठला ☘️ श्री रमेश जावीर 

पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला

आठवणीने कंठ माझा दाटला

शेतामध्ये राबतो मी  घाम हा फुटला

तुझे गीत मी गातो एकला एकला

पाहतो   वर आभाळात  थेंब हा कुठला

उरी माझ्या कंठ दाटे पायी काटा  रुतला

 ध्यान  तुझे मनी दाटे जीव हा  सुकला

सुखी ठेव देवराया सकला सकला

 कमरेचे हात सोड धीर हा सुटला

 नाठाळ हे जगी लोक आण वठणीला

 

© श्री रमेश जावीर

खरसुंडी, सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – काटेरी सौंदर्य…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

अल्प परिचय 

मराठी गद्य, पद्य, ललित लेख आणि विषयानुरूप लिखाणाची आवड. वाचनाची आवड तसेच अभिवाचन करण्यास आवडते.

?️?  चित्रकाव्य  ?️?

?काटेरी सौंदर्य– ? ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

 काट्यातही इतकं छान फुलता येत..

हेच तर जीवनाचं गुपित असत..

संकटांच्या काट्यावर करून मात..

आयुष्य उमेदीने फुलवता येत..

सभोवती जरी नुसतेच बोचरे काटे..

भय तरी ना फुलण्याचे कधी वाटे..

हिच तर खरी जीत आहे..

जगण्याची नवी रित आहे..

काट्यांना आपलंसं करता आलं पाहिजे..

काट्यांच्या सोबत ही हसत फुललं पाहिजे..

हेच तर काटेरी कॅक्टस शिकवतं..

जगण्याला एक नवी दिशा देतं…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 188 ☆ सांजवेळी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 188 ?

सांजवेळी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

आयुष्याच्या सांजवेळी,

आठवत राहतात….

काही फुलपंखी क्षण…

मनःपूत जगलेले!

 

आयुष्याला पडलेली,

सुंदर स्वप्नंच असतात ती,

कधीकाळी पाहिलेली…

काळजात खोलवर जपून ठेवलेली !

 

ती नाकारता येत नाहीत,

आणि इतर कोणाशी,

शेअर ही करता येत नाही,

आपला शाश्वत इतिहास..

 

म्हणूनच स्वतःशीच,

करतो उजळणी आपण,

कारण अगदी “हमराज”

असणारेही असतात अनभिज्ञ,

आपल्या मानसिकते पासून!

 

ते स्वतःच्या इतिहासापासूनही,

नामानिराळे!

नाकारतात स्वतःचा भूतकाळ,

अगदी निकराने !

कदाचित तेच अधिक सोयीस्कर,

वाटत असावे त्यांना !

 

पण एखाद्याचा स्वभाव असतो,

अधिकाधिक गुंतण्याचा,

गुंतून पडण्याचा !

 

केवढा मोठा कालखंड,

तेवीस चोवीस वर्षाचा….

निरंतर मनात रूंजी घालत असलेला !

 

पण नाही देता येत,

“ओ ” त्या हाकेला….

किंवा या हळव्या निमंत्रणाचा,

नाहीच करता येत स्वीकार!

 

म्हणून घालूनच घ्यावं,

एक कुंपण स्वतःभोवती !

आणि लागूही देऊ नये “भनक”

कुणालाच त्या कासाविशीची !!

– २६ जून २०२३

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येरे येरे पावसा… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ येरे येरे पावसा… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

डोंगर-दरी घुमवित

तापल्या रानाची

तहान भागवित

 

रोहिणीत केला पेरा

मृगाच्या भरवशी

कोरड्याच मृगाने

कल्लोळ काळजाशी

 

भेगाळल्या रानाची

कळ काळजाला

आशाळल्या नजरेनी

राजा न्याहाळतो आभाळा

 

तुझ्याच जीवावर

बळीराजा तो उदार

श्रध्दा ठेवून विठूवर

माया मातीवरी अपार

 

भिजून सरींत तुझ्या

हा कल्लोळ विझूंदे

ये रे पावसा धावून

हिरवं सपान फुलूंदे

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print