सौ. गौरी गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पालखी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

निघाली पंढरपूरी पालखी llध्रुll

 

पालखीतही मीच विराजे

मीच वाहते माझे ओझे

विठूमाऊली, दुखले खांदे

फुंकर तू घाल की      ll1||

 

मोह, क्रोध, मद सांडत गेले

निर्मळ, पावन, हलके झाले

हीण असे जे उरलेसुरले

तूच विठू जाळ की     ||2||

 

शेवटची ही मजल गाठली

विठूचरणी या मुक्ती लाभली 

नि:संगावर माझ्या उरली

विठूचीच मालकी      ||3||

 

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments