कवितेचा उत्सव
☆ विठ्ठला श्री रमेश जावीर ☆
पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला
आठवणीने कंठ माझा दाटला
शेतामध्ये राबतो मी घाम हा फुटला
तुझे गीत मी गातो एकला एकला
पाहतो वर आभाळात थेंब हा कुठला
उरी माझ्या कंठ दाटे पायी काटा रुतला
ध्यान तुझे मनी दाटे जीव हा सुकला
सुखी ठेव देवराया सकला सकला
कमरेचे हात सोड धीर हा सुटला
नाठाळ हे जगी लोक आण वठणीला
© श्री रमेश जावीर
खरसुंडी, सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈