सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

या वळणावर…  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उभी आहे मी एका वळणावर..

वाट पुढची‌ अनोळखी!

कशी शोधू मी माझी मला,

झाले मी  तुम्हास पारखी!..१

*

झाली नव्हती मनाची तयारी!

रहावे लागेल तुमच्या विना!

समजूत घालून जगते आहे,

साथ दे रे माझ्या मना!…२

*

सप्तपदी चाललो आपण,

साथ होती जन्मांतरीची!

सात जन्माची गाठ बांधली,

वचने  दिली तू निष्ठेची !..३

*

सोडून गेलात अचानक,

विसर पडला  माझा तुम्हांस !

जग रहाटीस सामोरे जाण्या,

मन करते मी घट्ट आज !..४

*

कठीण आहे वाट पुढची,

समजावते मी मनाला!

तुम्ही पाठीशी आहात माझ्या,

देत आधार थकल्या मनाला!…५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments