मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रतीक्षा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रतीक्षा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तू केव्हाही ये … 

मी वाट पहातच आहे …. .

 

फक्त एक लक्षात ठेव,

फार उशीर लावू नकोस … 

कारण….

 

पांगारा पुन्हा फुलू लागला आहे

वेलीवर कुंदाची फुलं डुलू लागली आहेत 

गुलमोहोर सर्वांगानी खुलू लागला आहे….

 

कसं फुलायचं असतं

कसं डुलायचं असतं

कसं खुलायचं असतं

हे सारं पहायचं असेल तर …. .

…. फार उशीर लावू नकोस…… 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 134 ☆ अभंग – सूर्य ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 134 ? 

☆ अभंग – सूर्य ☆

मावळता सूर्य, घाईमध्ये होता

निघालाही होता, स्वस्थानाला. !!

 

त्याला मी बोललो, थांब ना रे थोडे

बोलणारे गडे, माझ्यासवे. !!

 

घाईत असता, बोलला तो सूर्य

अरे माझे कार्य, प्रकाशाचे. !!

 

जरी मी थांबलो, सर्व ही थांबेल

दोष ही लागेलं, माझ्या कार्या. !!

 

म्हणोनी न थांबणे, कार्य हे करणे

सदैव चालणे, नित्य-कार्या. !!

 

काल्पनिक भाव, माझा मी मांडला

त्यातून शोधला, गर्भ-अर्थ. !!

 

कवी राज म्हणे, शब्द अंतरीचे

आहे कल्पनेचे, साधे-शब्द. !!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-10… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-10…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

 पाण्याची खोली मोजण्यासि

मीठ तेथ जाई बुडी मारण्यासि

स्वतःच तेथे विरघळून ते जाता

कशी पाण्याची खोली, मोजे हाता

आत्मभाव तुझा मापु न शकतो

माझा आत्मभाव तयात विरतो

एकरूप होता पाणी व लवण

कोण कोणा करी उपदेश जाण॥४६॥

 

नसे जिथे मी स्वतः, तुज जातो पाहू

आत्मरूपी लीन तूही, तुज कैसे पाहू॥४७॥

 

जागा राहुनिया निद्रेसि कसा पाहू

स्वरूपी एकरूप तुला कसा पाहू॥४८॥

 

अंधार असता प्रकाश नसे, परि

स्वतः असण्याची जाणीव उरी

अंधार दूर करि जरी सूर्यप्रकाश

पाहू न शके तो कधी अंधारास

जंव पाही मी तुजकडे चांगदेवा

मज दिसे केवळ आत्मस्वरूप ठेवा

मम स्वरूपे, पहावे तव स्वरूप

मम देह, तव देहाचे न पाही रूप

इंद्रियस्थ केवळ पाहणे, दिसणे

आत्मतत्वी भेटता, विरून जाणे॥४९॥

 

तव आत्मस्वरूपा मी शोधू जाता

माझे मीपण, तुझे तूपण नष्ट होता

अशा भेटी, अद्वैत आत्मतत्वांचे

घेशील सुख आत्मसाक्षात्काराचे॥५०॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नभ दाटलं दाटलं… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

नभ दाटलं दाटलं… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

आलं आभाळ भरून

नभ दाटलं दाटलं

धरित्रीच्या कुशीमधी

बियं बियाणं पेरलं —

 

वावरात बळीराजा

आस धरून बैसला

कृपा झाली वरूणाची

मनापासून हासला —

 

पिकतील मोती दाणं

काळ्या आईच्या पोटात

रोप लागतील डुलू

पीक येईल जोमात —

 

आल्या पावसाच्या धारा

सुटे थंडगार वात

तप्त धरा विसावली

झाला क्षोभ आता शांत —

 

सुकलेली पाने फुले

टवटवी त्यांना आली

नद्या निर्झर वाहती

सृष्टी पावसात न्हाली —

 

कृपा करी बा वरूणा

बरस तू चार मास

नको मारू कधी दडी

भरवी मायेने घास —

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कैफ ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ कैफ… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

कैफात रंगताना, पाऊल डगमगावे

तालात चालतांना, बेताल विश्व व्हावे

 

आरक्त नेत्र होता, स्नेहात विरघळावे

आकाश पुष्प ताजे, हलके खुडून घ्यावे

 

लाजून चांदण्यांनी, प्याल्यांत चिंब न्हावे

हरवून होष मी ही, प्याला पिवून जावे

 

प्राजक्त होवूनीया, चौफेर मी फुलावे

बेहोष त्या क्षणाला, जवळी कुणी नसावे

 

वाऱ्यातल्या स्वरांचे, धुंदीत वेध घ्यावे

हृदयातल्या सलांचे, संगीत गुणगुणावे

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सोंगटी… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– सोंगटी…– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

मीपण माझे मला माहिती

प्यादे मी तर समाजस्थानी

दर्पणात मी प्रतिमा पहाता

वजीर भासतो मीच दर्पणी

 आत्मसंमान जपता आपण

 आपसूक आत्मविश्‍वास  येतो

 खडतर जिवन रस्त्यावरती

  ठामपणाने जात राहतो

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॐ तत् सत्…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ॐ तत् सत्… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(७२५व्या ज्ञानेश्वरीस ज्ञानचरणनत् ज्ञानेश ज्ञानसमृध्दी शुभेच्छार्पण !)

त्रिगुणे त्रैलोक्यज्ञानी

ब्रम्हांड बीज सुखांनी

ज्ञान देई ज्ञानेश्वरी

ओवी-श्लोकादि मुखांनी.—

 

पसायदान श्रेष्ठ

संत ज्ञानेश ज्येष्ठ

देव लोक प्रसन्न

कृपासेवेशी पृष्ठ.—

 

ताटी उघडी तव

कष्ट जीवाशी डंक

मुक्ता होई माऊली

ऐसा ज्ञानी निःशंक.—

 

अठरा अध्यायादि

मोक्षप्रबंध वर

जन्म-मृत्यू रहस्य

टिका गीता सादर.—

 

सकळ मानवासी

कर्म-भक्ती साक्षात

प्रत्यक्ष लिही ज्ञाना

महात्म्य युगे बोलती

आम्ही बालके गुन्हा.——

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 155 – गुरूकृपा योग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 155 – गुरूकृपा योग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

सौभाग्ये लाभला।

गुरूकृपा योग।

सरतील भोग।

जन्मांतरी।।१।।

 

प्रेमे बाळकडू।

पाजते माऊली।

संस्कार सावली।

आद्यगुरू।।२।।

 

जीवनाचा वारू।

सावरण्या दृष्टी।

संगे प्रेमवृष्टी।

पितृछत्र।।३।।

 

ज्ञान विज्ञानाची।

उजळली ज्योत।

ज्ञानमयी स्रोत।

गुरूजन।।४।।

 

बहुव्यासंगी ते।

माझे गुरूजन।

ठेवा ज्ञानधन।

दिधलासे।।५।।

 

ज्ञान मकरंद।

असे चराचरी।

मधुमक्षी परी।

ध्येय हवे।।६।।

 

अनंत स्वरुपे।

गुरू माऊलीची।

वाट प्रकाशाची।

नित्य दावी।।७।।

 

गुरूपदी हवी।

श्रद्धा भक्ती खरी।

तेव्हा मुक्ती चारी

साधतील।।८।।

 

गुरूकृपा योग।

परीस दुर्लभ।

जीवन सुलभ।

सर्वार्थाने।।९।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ डोली… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ डोली… ☆ 🖋 मेहबूब जमादार

सालोसाल चढती गड 

जरी  तुटतात पाय

तुडविती   त्याच वाटा

सवे  लेक आणि  माय —

 

वारा  शहराचा  तसा 

इथं फिरलाचं नाही

दार  शाळेचे कुणीही 

त्यांना उघडले  नाही —

 

कधी भेटतो प्रवासी

किती अर्जव करून

दोन वेळेच्या  पोटाला

मिळे  भाकरी  कष्टून —

 

 त्यांनी पाहिलेच  नाही 

 जग वेगळे बाहेर

 डोलीतच  जीव  सारा 

 नाही वेगळं माहेर —

 

अशा  कित्येक पिढ्यांनी

फक्त डोलीच वाहिल्या

डोली वाहता वाहता

जशा आल्या  तशा गेल्या —

 

डोली वहायाची रोज 

डोली दिसते स्वप्नात

डोलीत बसलंय कोण 

त्यांना नसतं माहित —

 

दिसेना का  शासनाला

त्यांच्या हृदयाचा पीळ ?

 सारं  दिसले  तरीही 

त्याचा  नुसताच  खेळ — 

 

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #177 ☆ मनास वाचूया… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 177 – विजय साहित्य ?

 

☆ मनास वाचूया… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

चला लेखणी देखणी करूया

शब्द दर्पणी मनास वाचूया ||धृ ||

अनुभूतीचा रंग मनोहर

भाव भावना शब्द सरोवर

मनांगणीचे विश्व सजवूया… ||१||

वास्तवतेची, शब्द बांधणी

कल्पकतेची, कला अग्रणी

प्रतिभा शक्ती, अक्षर लिहूया… ||२||

कविता आहे, फुल बकुळीचे

अक्षय लेणे, गुलाब कळीचे

कथा, कविता, साहित्य निर्मूया…. ||३||

साहित्यातील , नवीन वळणे

शब्द संपदा, माणूस कळणे

नात्यामधले, बंधन जपूया… ||४||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print