श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ छंद हवा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
जगता जगता बदल हवा
मानव इथला सजग हवा
*
लाचारीचा विनय नको
स्वभाव थोडा कडक हवा
*
सामर्थ्याने लढणारा
बलशालीपण हात हवा
*
स्वप्ना साठी रोज नव्या
संघर्षाचा ध्यास हवा
*
सुंदर कायम दिसण्याला
माणुसकीचा साज हवा
*
धनको मोठा होताना
गाळायाला घाम हवा
*
प्रगती पुढची करताना
विचार काही ठाम हवा
*
उपभोगाया वैभव ही
मोजायाला दाम हवा
*
समरसतेचे ढोंगी नको
लागायाला छंद हवा
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈