सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

नभ दाटलं दाटलं… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

आलं आभाळ भरून

नभ दाटलं दाटलं

धरित्रीच्या कुशीमधी

बियं बियाणं पेरलं —

 

वावरात बळीराजा

आस धरून बैसला

कृपा झाली वरूणाची

मनापासून हासला —

 

पिकतील मोती दाणं

काळ्या आईच्या पोटात

रोप लागतील डुलू

पीक येईल जोमात —

 

आल्या पावसाच्या धारा

सुटे थंडगार वात

तप्त धरा विसावली

झाला क्षोभ आता शांत —

 

सुकलेली पाने फुले

टवटवी त्यांना आली

नद्या निर्झर वाहती

सृष्टी पावसात न्हाली —

 

कृपा करी बा वरूणा

बरस तू चार मास

नको मारू कधी दडी

भरवी मायेने घास —

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments