मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ डोली… ☆ 🖋 मेहबूब जमादार

सालोसाल चढती गड 

जरी  तुटतात पाय

तुडविती   त्याच वाटा

सवे  लेक आणि  माय —

 

वारा  शहराचा  तसा 

इथं फिरलाचं नाही

दार  शाळेचे कुणीही 

त्यांना उघडले  नाही —

 

कधी भेटतो प्रवासी

किती अर्जव करून

दोन वेळेच्या  पोटाला

मिळे  भाकरी  कष्टून —

 

 त्यांनी पाहिलेच  नाही 

 जग वेगळे बाहेर

 डोलीतच  जीव  सारा 

 नाही वेगळं माहेर —

 

अशा  कित्येक पिढ्यांनी

फक्त डोलीच वाहिल्या

डोली वाहता वाहता

जशा आल्या  तशा गेल्या —

 

डोली वहायाची रोज 

डोली दिसते स्वप्नात

डोलीत बसलंय कोण 

त्यांना नसतं माहित —

 

दिसेना का  शासनाला

त्यांच्या हृदयाचा पीळ ?

 सारं  दिसले  तरीही 

त्याचा  नुसताच  खेळ — 

 

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments