मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कविता #283 – फसली आशा…+ संपादकीय निवेदन – श्री अशोक श्रीपाद भांबुरे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

💐 अ भि नं द न 💐

ललित कला फाऊंडेशन ठाणे. आयोजित साहित्य पुरस्कार सोहळा दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी के. आ. बांठीया विद्यालय सिडको सेक्टर १८ नवीन पनवेल येथे संपन्न झाला. रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी, ज्येष्ठ साहित्यिक माननीय अशोक श्रीपाद भांबुरे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक सेवेच्या सन्मानार्थ, ललित कला साहित्य पुष्प पुरस्कार,  मा. ए. के. शेखमा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री अशोक श्रीपाद भांबुरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.! .💐

आज त्यांची कविता “फसली आशा” प्रकाशित करीत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 283 ?

☆ फसली आशा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

आज जीवनी उरली नाही कसली आशा

वाट पाहुनी किती उशीरा निजली आशा

*

तिला वाटले उद्या सुखाचा दिसेल तारा

दिव्यत्वाचे स्वप्न पाहुनी चुकली आशा

*

बरेच काही बोलायाचे होते बाकी

कुठे बोलली मुकाट होती बसली आशा

*

बोली होती तिची लागली या बाजारी

अर्ध्या किमती मधेच गेली विकली आशा

*

हिरवी झाली कधीच नाही शेतीवाडी

सुकून गेले स्वप्न बावरे सुकली आशा

*

मृगजळ दिसले धावत गेली त्याच्या मागे

आभासाच्या जलाशयाला फसली आशा

*

तारुण्याचा बहर तसा तर शिल्लक होता

तारुण्यातच अशी कशी ही खचली आशा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसाज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

 

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दसाज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(मेणकाः गालगागा गालगागा गालगा)

 साज लावीला सुराशी ताल बध्द

भाव साधीता मनाशी वाद्य वृंद.

*

काव्य मांडीले शब्दांना वाव छंद

ओठ गायीले स्वरांना घाव मंद.

*

तार छेडीता मधूरे नाद स्पंद

शारदेशी प्रार्थना हृदयात गंध.

*

बोल वेचीता अक्षर लेवून बंध

सार्थ सप्तकी बासरी कीशोर नंद.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वळीव… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वळीव… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

किती बाई हा उन्हाळा

अंगी सुटल्या घामधारा

ढग भरल्या आभाळा

पान्हा कसा फुटेना?

*

 आला आला वारा

 आली नाचत वीजबाई

ढग वाजवती ढोल

दाणादाण झाली बाई

*

लबाड हा पाऊस

फार फसवा वळीव

लख्ख पडता प्रकाश

अवचित पडे वळीव

*

 कसा कधी कुठे

 पडेल तेच कळेना

 सांभाळू कशी कुठे

 तेच मला कळेना

*

फार द्वाड हा वळीव

वार्‍यांसंगे फिरतो

जरी असे तो खट्याळ

मला फार आवडतो

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – कुणा न देणे घेणे… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कुणा न देणे घेणे… ? श्री आशिष  बिवलकर ☆

जाता जात नाही | त्यास म्हणे जात |

करतेच घात | व्यवस्थेचा ||१||

*
अठ्यात्तर वर्षं | झाली स्वातंत्र्यास |

तरी अट्टहास | जातींसाठी ||२||

*
शीरगणतीस | जातीची किनार |

पेरती विखार | जनतेत ||३||

*
गुणवान नको | जातीतला हवा |

मतांसाठी खवा | राजकीय ||४||

*
हिंदू धर्मीयांना | वाटूया जातीत |

घालूया मातीत | राष्ट्रहीत ||५||

*
जाणून जातीचा | किती आहे टक्का |

मग करू पक्का | उमेदवार ||६||

*
बिब्बा म्हणे नेते | टाकतील दाणे |

न देणे न घेणे | देशहीत ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आत्मबल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आत्मबल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मिथकामधल्या आधारावर

सभेत मारू नको भरारी

शब्दामधुनी व्यक्त व्हायला

स्वानुभवाची हवी शिदोरी

*

जिंकायाचा वाद तुलातर

हवी तेवढी ठेव तयारी

आवेगाने आवेशाने

मांडत मुद्दे सगळे भारी

*

वावरताना इकडे तिकडे

हिनकस बुद्धी नको अघोरी

राखत संयम शांतपणाणे

बनतजायचे पूर्ण विचारी

*

आत्मबलाची हवी मजबुती

नजर आणखी तशी करारी

पाजरलेली शस्त्रे अगणीत

जमवत जावी भवती सारी

*

विजयाने मग विनम्र व्हावे

मंजूळ व्हावा सूर बासरी

आनंदाचे येता भरते

स्थिती व्हायला नको बावरी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दोन कविता… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दोन कविता ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

(१)

तुझ्या डोळ्यांतले मेघ

निळे.. सावळे.. रुपेरी

कुणा काहीच ना कळे

ऋतू कोणता अंतरी

*

तुझ्या डोळ्यांतले मेघ

कधी कोरडे.. संपृक्त..

कुणा काहीच ना कळे

अनासक्त की अव्यक्त..

 (२)

नकळत हासलीस

नकळत गुंतलीस

नको नको म्हणताही

आणभाक घेतलीस

*

स्वप्न -पहाट संपता

जागे वास्तवाचे भान

जिथे उपाशीच भूक

आणि अतृप्त तहान….

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “पाणी आपले जीवन…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ पाणी आपले जीवन… सौ. वृंदा गंभीर

रंग नाही रूप नाही

तरी आहेस जीवन

ना आकार ना उकार

तरी आहेस जीवन

*

चव तुझी खरट गोड

वाहन्याला खळखळाट

प्रवाहा नुसार आकार

भरतात तुझ्याने घाट

*

भरले जलाशय जरी

लोक संख्या वाढली

कुठवर ठेवावं साठवून

धरणं कोरडी पडली

*

जमिनीना पडल्या भेगा

विहिरी रिकाम्या झाल्या

ध्यास तुझा लागला जगा

बायका हांडे वाहू लागल्या

*

अमृता समान पाणी

वाया घालवू नका कोणी

थेंवे थेंबे तळे साचे ठेवा मनी

जीवनास संपवू नका कोणी

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अनवाणी वार्धक्य चालले… – चित्र एक काव्ये तीन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के, सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी आणि श्री आशिष  बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अनवाणी वार्धक्य चालले … – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी 

सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

डोई पाणीभरला थंडावा

चटचटणारे भवती ऊन

अनवाणी वार्धक्य चालले

आधारा काठी घेऊन

*

चित्र पाहताच वाटे

आजीला आधार द्यावा

तिच्या डोईचा हंडा घेऊन

आपल्या माथी भार घ्यावा

*
उन्हात पोळत्या पायाखाली

पुढे होऊन सावली द्यावी

हात धरून घरी सुखरूप

पोहचवण्याची हमी घ्यावी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

कवयित्री : सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी

( २ ) 

जीवन..

हाती काठी, डोई हंडा

कशी चालली म्हातारी

पाणी तर हवेच ना?

चाले एकटी बिचारी

*
साडी चोळी साधीसुधी

केस थोडे पिकलेले

देहयष्टी सांगतसे

वृद्धपण हो आलेले

*
रस्ता आहे खडकाळ

ऊन सावलीचा खेळ

अनवाणी ती चालली

असे उन्हाचीच वेळ

*
हात हंड्याला आधार

काठी देह सावरते

जीव जगवण्यासाठी

वणवण चाले पाठी

*
निसर्गाचे चक्र चाले

अन्न, पाणी, हवा देतो

राखू समतोल त्याचा

हाच बोध यात घेतो

☆ ☆ ☆ ☆

कवयित्री : सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी

सातारा

☆ ☆ ☆ ☆

श्री आशिष  बिवलकर

(३)

डोईवर हंडा,

हातामध्ये काठी |

दाही दिशा वणवण,

हंडाभर पाण्यासाठी |

दर पाच वर्षांनी,

देऊन त्यांना ती संधी |

पाण्यासाठी भोग,

सरता सरले नाही कधी |

 *

डोळ्यात साचले पाणी,

पाणी नाही आले दारी |

पाण्यासाठी करावी लागते,

रणरणत्या उन्हात वारी |

 *

स्वातंत्र्य मिळून आता,

संपूर्ण आयुष्य लोटलं |

गोरे गेले काळे आले,

सूलतानागत सारं लुटलं |

 *

करोडोच्या योजना येई,

कागदी घोडे नाचवतात |

वरून आलेला निधी,

ढेकर देऊन पचवतात |

 *

सामान्य माणूस जगो की मरो,

त्याची राज्यकर्त्यांना नसते तमा |

लोकशाहीत जो बसतो खुर्चीवर,

भ्रष्टाचाराने धन करत राहतो जमा |

 *

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शेती माती… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “शेती माती…” ☆  डॉ. शैलजा करोडे

बरसल्या मृगसरी

शेती माती भिजविली

तळी विहीरी भरल्या

कळी मनाची खुलली

*

आनंदली वसुंधरा

अंगोपांगी बहरली

प्रिया मिलनाने सखी

रोम रोमी रोमांचली

*

दान उदरी झेलूनी

लेणे हिरवे ल्यायली

नवांकुर डोकावले

वसा सृजन वसली

*

लेक धरतीचा बळी

सेवा रात्रंदिन करी

पीक मोत्यांचे डोलता

हास्य त्याचे मुखावरी

*

गाडा विश्वाचा चालतो

धरतीच्या कुशीतून

शेती माती जीवजंतू

सारे जाती आनंदून

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोगरा फुलला…☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ मोगरा फुलला☆ सौ. सुचित्रा पवर ☆

आसमंती आज । गंध उधळला

मोगरा फुलला। अंगणात

*

पर्णसंभारात ।हळूच हसतो

नाचतो खेळतो।वेलीवर

*

टपोऱ्या कळ्या।लाजऱ्या बावऱ्या

साजिऱ्या गोजिऱ्या। अलवार

*

अवचित येतो।मंद गोड गंध

जीव होतो धुंद। वेडापिसा

*

रुक्मिणीमातेचा।सजता देव्हारा

कावरा बावरा। विठुराया

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares