श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दोन कविता ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

(१)

तुझ्या डोळ्यांतले मेघ

निळे.. सावळे.. रुपेरी

कुणा काहीच ना कळे

ऋतू कोणता अंतरी

*

तुझ्या डोळ्यांतले मेघ

कधी कोरडे.. संपृक्त..

कुणा काहीच ना कळे

अनासक्त की अव्यक्त..

 (२)

नकळत हासलीस

नकळत गुंतलीस

नको नको म्हणताही

आणभाक घेतलीस

*

स्वप्न -पहाट संपता

जागे वास्तवाचे भान

जिथे उपाशीच भूक

आणि अतृप्त तहान….

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments