मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 249 – दृष्टी…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 249 – विजय साहित्य ?

☆ दृष्टी…!

 

निसर्गाची दृष्टी ,

देई रवी जगताला ‌

जाग सृजनाला,

पदोपदी…! १

 *

वात्सल्याची दृष्टी ,

जणू मायबाप हाक.

नजरेचा धाक,

लेकराला…!२

 *

वासनेची दृष्टी

जोड व्यसनांची जडे

घरदार रडे

रात्रंदिस…!३

 *

आंधळ्यांची दृष्टी ,

दृकश्राव्य तिची भाषा .

जगण्याची  आशा ,

वागण्यात…!४

 *

कवितेची दृष्टी ,

तिचा सर्वत्र संचार .

व्यासंगी विचार ,

लेखनात…! ५

 *

दृष्टीहीन जन ,

लोटू नका दूर

गवसेल सूर ,

जीवनाचा…!६

 *

कलाकार  दृष्टी ,

तिचा सार्‍याना आदर .

होतेस सादर ,

रगमंची…!७

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साक्षीत्वाची आस… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

सुश्री प्राची जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ साक्षीत्वाची आस… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

साक्षीत्वाची आस नाचते मनात

हळूच ती थिरकते मनमंदिरात

*

साक्षीत्वाची आस रमते संसारात

भावबंध सुटताना दाटे अलिप्तता मनात

*

साक्षीत्वाची आस उमटते अंतरात

देव जागा करी मनातील स्पंदनात

*

साक्षीत्वाची आस करी उद्युक्त मनास

मनाला दटावूनी धरी अध्यात्माची कास

*

साक्षीत्वाची आस देवाचा मनात वास

आतील गाभाऱ्यात उजळला आत्मध्यास

*

साक्षीत्वाची आस देहाचा आत्मिक प्रवास

प्रवासात गवसे अंतरात्म्याचा निवास

*

देह आणि आत्म्याचे हे रेशमी कोडे

परमेशाच्या साक्षीने असे अलवार उलगडे….

©  सुश्री प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ शीर शीर कापावे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ शीर शीर कापावे… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

कसली पाशवी वृत्ती

कसला हा भ्याड हल्ला

धर्मांधतेचा बुरखा

निष्पाप जीवांवर बेतला

*

आता तरी जागे व्हावे

रण मैदानी ललकारावे

अग्नीचे लोळ उठवावे

उन्मत्त शीर शीर कापावे

*

परंपरा क्षात्रतेजाची

आठवुणी धरावे शस्त्र

रणनीती अशी आखावी

अन उगारावे अस्त्र

*

पेटुनी उठावा कणकण

शक्ती लावूनी पणाला

अतिरेकी हैवानांना

धाडावे यमसदनाला

*

इतिहास घडवावा पुन्हा

कृष्ण शिवबा राणा यांचा

मर्दुमकी अशी गाजवावी

फडकवावा झेंडा विजयाचा

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ का र वा ई ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ 🇮🇳🕺का र वा ई !🕺🇮🇳 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

घेतला बदला पहलगामचा

करून कारवाई “सिंदूर”

वेचून वेधून मध्यरात्री

केले ठार बिळातले उंदीर

*

किंमत भालीच्या कुंकवाची

तुम्हां कधी कळणार नाही

नरसंहार पहलगामीचा

देतो जगा त्याचीच ग्वाही

*

शमली नसेल अजून कंड

वाटेस पुन्हा बघा जाऊन

हळद अंगाची तुमची पुसून

मेहंदी काढू घरात घुसून

मेहंदी काढू घरात घुसून

© श्री प्रमोद वामन वर्तक

०७-०५-२०२५

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

? कवितेचा उत्सव ? 

☆ शब्द☆ सौ शालिनी जोशी

शब्द —

 शब्द सगुण शब्द साकार

 शब्दांचे मूळ असे ओंकार

 शब्दच गंध शब्दच सुमन

 शब्दच होती देवपूजे साधन

 शब्दच रत्न शब्दच धन

 शब्दच वित्त मानिती सज्जन

 शब्दच संगीत शब्दच तान

 शब्दच रमविती तन मन

शब्दच राग शब्दच ढोंग

शब्दच संतांचे होती अभंग

 शब्दच सौंदर्य शब्दच अलंकार

 शब्दच सुवर्ण आणि हार

शब्दच शस्त्र शब्दच बाण

 शब्दांचे योगे दुर्गुण हरण

 शब्दच शास्त्र शब्दच विज्ञान

 शब्दच कारण तरण्या जीवन

शब्दच संवाद शब्दच विसंवाद

 शब्दच निवारण करिती भेदाभेद

 शब्दच नेती परमार्थाच्या वाटे

 शब्दांना विसावा जेथे भेटे 🙏

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आता कशाला शोधावे ? ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आता कशाला शोधावे ? ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

शोध नात्याचा मी घेता,

नभी मेघ कसे आले.

मोर स्मृतींचे नाचून,

मन पावसाचे झाले.

वारा घालतो उखाणे,

कसे गर्भार वृक्षांना.

पुन्हा ऐकण्यास गाणे,

बोलवा ना त्या पक्षांना

घर बांधीन स्वप्नांचे,

त्याला चांदण्यांचे दार.

चंद्र आकाशी येइल,

जसा प्रेम अपरंपार.

आता कशाला शोधावे,

नाते नव्याने आपले.

भिंती अदृश्य आधार,

स्वप्नी सदृश्य जपले.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आस… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आस… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

या माझ्या मुले नातवंडांनो

मांडूया खेळाचा डाव जुना

या आपल्या गोजिर्‍या घरात

तुम्हाविण महाल हा सुना॥

*

सुना महाल सुनी मैफिल

सारे काही वाटे सुने सुने

सुना रमल्या पर देशात

आस ही दिस येतील जुने॥

*

पर लाऊन माझ्या मनाला

सदा तुमच्यापाशी मी येते

पर देश मला न सुखावे

परी ओढ तुमची असते॥

*

वाट पहाती घर झोपाळा

शेत नि तुमची वेडी आई

वाट म्हणता वाटण्या केल्या

त्याचे असेच पांग का बाई?

*

आस मन परिघाचा कसा

तुम्हा भोवताली फिरतसे

आस लागते जीवा तुमची

कळते तुम्हा न वळतसे॥

*

झुले कितीतरी आठवांचे

रोज हिंदोळती जागोजागी

झुले मन त्यासंगे भरारा

भोवळ जणू ही अंगोपांगी॥

*

सदाशिव हा एकटा जीव

पदोपदी समजवी मना

सदा शीव भावना गोधडी

तोच उबारा गं तुझ्या तना॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 271 ☆ सीता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 271 ?

(श्री राम आणि सीता यांचा राज्यभिषेक)

☆ सीता… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(६ मे २०२५ सीतानवमी)

जनक राजाची दुहिता

कोमल कन्या ती सीता

*

खूप प्रेमाने तिला वाढविले

उपवर होता स्वयंवर रचले

*

स्वयंवर रामने जिंकता

वैदेही झाली परिणिता

*

आयोध्देच्या महाराणीला

चौदा वर्षे वनवास घडला

*

सहनशीलता वैदेहेची न्यारी

अग्निपरीक्षा देण्याची तयारी

*

तरी दूषण लागे पतिव्रतेला

कोटी कोटी नमन भूमिकन्येला

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दांची आरास… ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆

सौ. सुरेखा कुलकर्णी  

☆ कवितेचा उत्सव ☆

☆ शब्दांची आरास… ☆ सौ. सुरेखा कुलकर्णी ☆ 

कल्पनेच्या पालखीत

अक्षरांची रास

आशयाने मांडलेली

शब्दांची आरास ॥

*

भाव दाटती मनात

वाटे व्यक्त व्हावे

विचारांच्या सरितेने

प्रवाहात यावे

शब्द शब्द जुळवून

काव्य व्हावे खास॥

*

कधी दुःख सलते उरी

काट्यासमान

मायबोली मूर्त रूप

कवितेचा मान

दाद द्यावी रसिकांनी

हीच मनी आस ॥

*

मनातील आनंदाचे

शब्द रूप मोती

कागदाच्या गालिचावर

लेखणीने ओती

अलंकारानी सजवून

प्रतिभा सुवास॥

अक्षरांची रास

शब्दांची आरास॥

© सौ. सुरेखा कुलकर्णी

सातारा 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नकळत… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ नकळत ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

नकळत

डोळ्यातुन,

वाट मोकळी करत.

ओघळणारा एक अश्रू,

नेमका सुखाचा की दुःखाचा.

कधी कधी हे सुध्दा,

नाही उमगत मनाला.

बाई- मनाच्या अशा संभ्रमात,

मी शोधत आहे,

एक क्षण घट्ट आधाराचा.

… काजव्यांच्या चमकण्यानी

रात ऊजाडत नाही,

याची पक्की खात्री असतानाही.

 

पण का?… कुणास ठाऊक.

© सौ.वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares