श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ वळीव… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

किती बाई हा उन्हाळा

अंगी सुटल्या घामधारा

ढग भरल्या आभाळा

पान्हा कसा फुटेना?

*

 आला आला वारा

 आली नाचत वीजबाई

ढग वाजवती ढोल

दाणादाण झाली बाई

*

लबाड हा पाऊस

फार फसवा वळीव

लख्ख पडता प्रकाश

अवचित पडे वळीव

*

 कसा कधी कुठे

 पडेल तेच कळेना

 सांभाळू कशी कुठे

 तेच मला कळेना

*

फार द्वाड हा वळीव

वार्‍यांसंगे फिरतो

जरी असे तो खट्याळ

मला फार आवडतो

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments