मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 185 ☆ अर्धस्वप्न… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 185 ?

अर्धस्वप्न… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(मृगचांदणी मधून…)

प्रतिबिंब आरशातले,

दिसते आजकाल,

प्रौढ….निस्तेज!

केसातली पांढरी बट

तारूण्य ढळल्याची साक्षी असते,

डोळ्या भोवतीचे काळे वर्तुळ

वय वाढल्याची नोंद घेते !

मन उदास पुटपुटते,

“गेले ते दिन गेले !”

पण तुझ्या डोळ्यात जेव्हा,

पहाते मी स्वतःला,

तेव्हा मात्र असते मी,

तुला पहिल्यांदा भेटले

तेव्हाची,

तरूण आणि टवटवीत!

या दोन्ही प्रतिबिंबातली

खरी कोण?

प्रसाधनाच्या आरशातली,

की तुझ्या डोळ्यातली ?

तुझ्या माझ्या नात्यातली,

सुकोमल तरुणाई,

बनवते तरुण मला,

तुझ्या डोळ्यातल्या प्रतिबिंबात!

माथ्यावर लिहून जातात

तुझे डोळे—-

“तू अर्धी स्त्री आणि अर्ध स्वप्न”

खरंच की रे —-

स्वप्न कधीच होत नाहीत म्हातारी,

त्यांना नसते मरण कधी,

स्वप्न असतात चिरंजीव,

म्हणूनच ती दोन्ही प्रतिबिंब,

होतात एकजीव!

सनातन….नित्यनूतन!

© प्रभा सोनवणे

(१ जानेवारी १९९९)

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तूच तू… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ तूच तू… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्वासाहून प्रिय तू,

सत्य तू अन् भास तू.

 

जीवन-मरण तूच तू,

तूच श्वास,ध्यास तू.

 

घुसमट तू, तूच वारा,

तू नभीचा स्थिर तारा.

 

नीरवता तू, तू कविता,

तूच दर्या जो उसळता.

 

तूच वृक्ष ,तूच सळसळ ,

पालवी तू ,तू पानगळ .

 

तूच वास्तव ,स्वप्न तू,

दृष्टी तू, दृष्टिकोन तू.

 

विसर्जित झालो कधीचा ,

मात्र केवळ तूच तू.

 

माझे-तुझे अद्वैत घडता,

मग,काय मी अन् काय तू? …

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रीधान्ये… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

 

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रीधान्ये… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

श्री धान्यांचे स्वागत करु या

चला तुम्ही या हो  |

 

     ‌रुक्ष भूमीला मान देऊया

     तृण धान्यासी पहा हो |

 

रागी,वरीची रास करु या

सारे संगे या हो  |

 

     ‌बाजरीलाही स्थान  देऊ या

     राळ्याचे गुण गा हो  |

 

पोषणास नि ऊर्जा द्याया

धान्य ही सिद्ध पहा हो  | 

 

        कणाकणांना इवल्याशा या

        आपण नमू चला हो |

 

मधुमेहाशी लढा देऊ या

रोडगा खाऊ चला हो |

 

    रक्तदाब ही स्थिर ठेवू या

    साथ तयांची घ्या हो |

 

श्रीधान्यांसह जीवनात या

मजा लुटू चला हो ||

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

हैदराबाद.

भ्र.९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #191 ☆ खडावा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 191 ?

☆ खडावा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

एकेक शब्द माझा भक्तीरसात न्हावा

हृदयात नांदतो रे कान्हा तुझाच पावा 

वारीत चालताना म्हणतात पाउले ही

देहात विठ्ठलाचा संचार साठवावा

रामास भरत म्हणतो सत्ता नकोय मजला

तू फक्त दे मला रे पायातल्या खडावा

पंडीत ज्या शिळेला पाषाण म्हणुन पाही

पाथरवटास त्यातच ईश्वर उभा दिसावा

काळ्याच चादरीवर आकाश पांघरोनी

झाडात भर दुपारी घेतोय कृष विसावा

ब्रह्मास्त्र काल होते अणुबॉम्ब आज आहे

युद्धामधील जहरी संहार थांबवावा

चातुर्य वापरावे उद्धारण्यास जीवन

भोंदूपणास कुठल्या थारा इथे नसावा

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆– रक्तामध्ये ओढ मातीची…– कवयित्री : श्रीमती इंदिरा संत ☆ संग्रहिका : सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

 वाचताना वेचलेले 

☆ – रक्तामध्ये ओढ मातीची– कवयित्री : श्रीमती इंदिरा संत ☆ संग्रहिका : सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

(काल साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने ..कवयित्री इंदिरा संत यांची एक सुंदर कविता. सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी या कवितेला सुरेख स्वरसाज चढवून ती सादर केलेली आहे)

५ जून, जागतिक पर्यावरण दिन…… आपला सभोवताल नयनरम्य करणार्‍या पर्यावरणातून आपण अनेक गोष्टी शिकतो, मनमुराद आनंद घेतो, आणि त्यावर मनापासून प्रेमही करतो….या पर्यावरणाशिवाय आपलं अस्तित्त्व नाही.. 

याच पर्यावरणाबद्दल वाटणारी कृतज्ञता जेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी त्यांच्या खालील कवितेतून व्यक्त केली आहे… त्या मातीचा एक भाग आपणही आहोत, याचं भान आपल्याला सतत असायला हवं आणि म्हणून पर्यावरणाचं संवर्धन आपण करायला हवं, हो ना !

रक्तामध्ये ओढ मातीची, 

मनास मातीचें ताजेपण,

मातींतुन मी आलें वरती, 

मातीचे मम अधुरें जीवन…..  

कोसळतांना वर्षा अविरत, 

स्नान समाधीमधे डुबावें; 

दंवात भिजल्या प्राजक्तापरी

ओल्या शरदामधि निथळावें; ….. 

हेमंताचा ओढुन शेला 

हळूच ओलें अंग टिपावें;

वसंतातले फुलाफुलांचें, 

छापिल उंची पातळ ल्यावें;….. 

ग्रीष्माची नाजूक टोपली,

उदवावा कचभार तिच्यावर;

जर्द विजेचा मत्त केवडा

तिरकस माळावा वेणीवर; ….. 

आणिक तुझिया लाख स्मृतींचे

खेळवीत पदरांत काजवे, 

उभें राहुनी असें अधांतरिं

तुजला ध्यावें, तुजला ध्यावें….

कवयित्री : श्रीमती इंदिरा संत

संग्रहिका : पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – कुष्ठरोग नाही भोग…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– कुष्ठरोग नाही भोग…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

कुष्ठरोग्याचे जीवन,

समाजाकडून सारखी उपेक्षा !

झडलेल्या हातांनाही असते,

मेहंदीने रंगण्याची अपेक्षा !

कोणी हिणवे तयास,

झालाय देवाचा कोप !

कोणी म्हणे गतजन्माच्या 

पापाचे आले आहे रोप !

समाजात जगताना,

पदोपदी भोगतात यातना !

हद्दपारीचे जीवन नशिबी,

वाळीत टाकल्याची भावना !

कोणी एक महात्मा येई ,

तयांच्या उद्धारासाठी !

बाबा आमटेंचे महात्म्य,

अधोरेखित या जगजेठी !

आनंदवनात चालू आहे,

अविरत सेवेचे महान कार्य !

पाहून जुळती कर दोन्हीही,

माणसातल्या देवाचे औदार्य !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रतीक्षा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रतीक्षा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तू केव्हाही ये … 

मी वाट पहातच आहे …. .

 

फक्त एक लक्षात ठेव,

फार उशीर लावू नकोस … 

कारण….

 

पांगारा पुन्हा फुलू लागला आहे

वेलीवर कुंदाची फुलं डुलू लागली आहेत 

गुलमोहोर सर्वांगानी खुलू लागला आहे….

 

कसं फुलायचं असतं

कसं डुलायचं असतं

कसं खुलायचं असतं

हे सारं पहायचं असेल तर …. .

…. फार उशीर लावू नकोस…… 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 134 ☆ अभंग – सूर्य ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 134 ? 

☆ अभंग – सूर्य ☆

मावळता सूर्य, घाईमध्ये होता

निघालाही होता, स्वस्थानाला. !!

 

त्याला मी बोललो, थांब ना रे थोडे

बोलणारे गडे, माझ्यासवे. !!

 

घाईत असता, बोलला तो सूर्य

अरे माझे कार्य, प्रकाशाचे. !!

 

जरी मी थांबलो, सर्व ही थांबेल

दोष ही लागेलं, माझ्या कार्या. !!

 

म्हणोनी न थांबणे, कार्य हे करणे

सदैव चालणे, नित्य-कार्या. !!

 

काल्पनिक भाव, माझा मी मांडला

त्यातून शोधला, गर्भ-अर्थ. !!

 

कवी राज म्हणे, शब्द अंतरीचे

आहे कल्पनेचे, साधे-शब्द. !!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नभ दाटलं दाटलं… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

नभ दाटलं दाटलं… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

आलं आभाळ भरून

नभ दाटलं दाटलं

धरित्रीच्या कुशीमधी

बियं बियाणं पेरलं —

 

वावरात बळीराजा

आस धरून बैसला

कृपा झाली वरूणाची

मनापासून हासला —

 

पिकतील मोती दाणं

काळ्या आईच्या पोटात

रोप लागतील डुलू

पीक येईल जोमात —

 

आल्या पावसाच्या धारा

सुटे थंडगार वात

तप्त धरा विसावली

झाला क्षोभ आता शांत —

 

सुकलेली पाने फुले

टवटवी त्यांना आली

नद्या निर्झर वाहती

सृष्टी पावसात न्हाली —

 

कृपा करी बा वरूणा

बरस तू चार मास

नको मारू कधी दडी

भरवी मायेने घास —

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कैफ ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ कैफ… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

कैफात रंगताना, पाऊल डगमगावे

तालात चालतांना, बेताल विश्व व्हावे

 

आरक्त नेत्र होता, स्नेहात विरघळावे

आकाश पुष्प ताजे, हलके खुडून घ्यावे

 

लाजून चांदण्यांनी, प्याल्यांत चिंब न्हावे

हरवून होष मी ही, प्याला पिवून जावे

 

प्राजक्त होवूनीया, चौफेर मी फुलावे

बेहोष त्या क्षणाला, जवळी कुणी नसावे

 

वाऱ्यातल्या स्वरांचे, धुंदीत वेध घ्यावे

हृदयातल्या सलांचे, संगीत गुणगुणावे

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares