श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– कुष्ठरोग नाही भोग…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

कुष्ठरोग्याचे जीवन,

समाजाकडून सारखी उपेक्षा !

झडलेल्या हातांनाही असते,

मेहंदीने रंगण्याची अपेक्षा !

कोणी हिणवे तयास,

झालाय देवाचा कोप !

कोणी म्हणे गतजन्माच्या 

पापाचे आले आहे रोप !

समाजात जगताना,

पदोपदी भोगतात यातना !

हद्दपारीचे जीवन नशिबी,

वाळीत टाकल्याची भावना !

कोणी एक महात्मा येई ,

तयांच्या उद्धारासाठी !

बाबा आमटेंचे महात्म्य,

अधोरेखित या जगजेठी !

आनंदवनात चालू आहे,

अविरत सेवेचे महान कार्य !

पाहून जुळती कर दोन्हीही,

माणसातल्या देवाचे औदार्य !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments