मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 153 ☆ मज आवडे एकांत… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 153 ? 

☆ मज आवडे एकांत… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(अष्टअक्षरी…)

मज आवडे एकांत

नको वाटतो लोकांत

वेळ पुरेसा मिळता

होई जप भगवंत.!!

मज आवडे एकांत

कृष्ण देव आठवतो

रूप त्याचे मनोहर

मनी माझ्या साठवतो.!!

मज आवडे एकांत

क्षण माझा मी जोपासे

धूर्त ह्या जगाची कधी

भूल पडे त्याच मिसे.!!

मज आवडे एकांत

शब्दाचे डाव मांडतो

नको कुणा व्यर्थ बोल

मीच मला आवरतो.!!

मज आवडे एकांत

राज हे उक्त करतो

शब्द अंतरीचे माझे

प्रभू कृपेने लिहितो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मला इतकेच म्हणायचे आहे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

मला इतकेच म्हणायचे आहे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

जेंव्हा घरभेदी भिंतीनीच

नात्यागणगोतात भिंती उभ्या

केल्या  . .

कराकरा मिटली निष्ठुर दारं . .

बंदीच झालो घरातल्या –

कारागृहात. .नजरकैद भोगणारे

कैदीच. . .!

खिडकीतल्या गजावर तटतटून

माझे असहाय्य अपयशी हात. .

आणि बाहेर नुसताच काळोख

तेंव्हाही कवितांनीच केली

ना, टकटक . .

आपुलकीची सहिष्णू दस्तक. .

आणि डोळ्यातील ओलीचा –

आश्वासक पाऊस. .

अगदीच एकाकी नसतो आपण. .

मला इतकेच म्हणायचे आहे. .

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिव्याची कैफियत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🕯️🪔 दिव्याची कैफियत !  🕯️🪔 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

गरीब बिचारा मी बापुडा

असे वैर माझे अंधाराशी,

पण वाहून गर्वाने समीरा

ज्योत माझी तू विझवशी !

अंधार सारा दूर सारण्या

मी आयुष्य माझे वेचतो,

निष्ठुर असा कसा तू

माझ्या ज्योतीस वेधतो ?

असेल ताकद तुझ्यात

विझवण्या सहस्त्र ज्योती,

पण एकदा कधीतरी

दाव पेटवून एक तू पणती !

दाव पेटवून एक तू पणती !

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “चालत राहीन असेच आता…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “चालत राहीन असेच आता…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

गर्द हिरवाई दोन बाजूंनी

पायाखाली आपली वाट

चालत राहीन असेच आता 

जिथे घडेल त्याची  गाठ ।।

आयष्यातील सुखदुःखाला

सवे घेतले बांघून गाठ

तेच ओझे पाठीवर  घेऊन 

चालत राहीन अशीच ताठ ।।

जन्मासह तो प्रगट जाहला

अंती भेटीचा क्षण ठरलेला

हिरवाई आहे भवती तोवर

भेटावा वाटे आर्त  मनाला ।।

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चयन… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ चयन… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

काट्याच्या फांदीवरती

रक्तफुले बोलत होती

दु: ख झुल्याचे झेलत

काट्यासवे झुलत होती

 

फुलपाखरु रुतले

निवडुंगी झुडपात

फडफडत पंखात

अंगाई बोले रात

 

नागफणी खोडी काढी

पाल्याची  सळसळ

येता झोका वा-याचा

काटेफांदी सोसे कळ

 

बगळ्याचे चुकले थवे

आसमंती फिरतात

चांदणं झेलत झेलत

फेसाटी झुडूपी शिरतात

 

खळखळ झरा पाण्यात

खेकडे सेना फळतांना

भयभीत मासे कल्लोळी

रातकिडे चित्कार राना

 

पायवाटा फसवतांना

हसतात इवले गवत

रानगाय चरतां चरता

गावताचे करते रवत

 

रक्तफुले सोसता सोसता

टिपकते रक्ताश्रू नयन

शल्य ह्दयी झेलत झेलत

जीवनाचे नसे हाती चयन

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “जेव्हा मी हरते…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “जेव्हा मी हरते…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

जेव्हा मी हरते

क्षणभर थांबते

कुठं मी चुकते

पाहत मग राहते….

 

एकच चूक पुनःपुन्हा करते

स्वतः आधी जगाला पाहते

एकटेपणाला थोडी घाबरते

जगाच्या पसाऱ्यात अडकून पडते…

 

चांगले वाईट अनुभव

वेचत मग बसते

सुख दुःखाचा

न्याय निवाडा करून टाकते…

 

व्यक्ती ,वस्तू ,परिस्थिती

सगळ्यांना दोष दूषणे

यश अपयश यांच्यामुळे

असते का ओ खरे?

 

पुन्हा एक जाणीव

नव्याने होते

आपल्या आयुष्याची जबाबदारी

आपलीच असते…

 

मानले तर जग सारे

आपले असते

नाहीतर कोणी

कोणाचेच नसते….

 

स्व सोबत राहणे

असेल खरे जगणे

जग सारे निमित्त मात्र

त्याच्याशिवाय आयुष्य कसले?

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 201 ☆ अनुभूती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 201 – विजय साहित्य ?

☆ अनुभूती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

आई नावातच आहे

ईश्वराचा सहवास

वात्सल्याची अपुर्वाई

आई माहेराचा श्वास..! १

 

आई जगते जन्मते

लेकरांच्या पाठोपाठ

कुटुंबाच्या स्वास्थासाठी

सात जन्म बांधी गाठ..! २

 

आई हाक काळजाची

आई हळवेला‌ सूर

कसा कोण‌ जाणे येतो

झणी आठवांना पूर…! ३

 

आई आशिर्वादी हात

संस्कारांची जपमाला

आई शब्दांचे जीवन

देते विश्व जगायाला..! ४

 

आई अशी आई तशी

औक्षवंत करी बाळा

तिच्या‌ दिठीत भरला

सुख सौभाग्याचा चाळा..! ५

 

आई आहे अनुभूती

ज्याने‌ त्याने जपलेली

भावनांच्या काळजात

सुखेनैव लपलेली…! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्वास… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ श्वास… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

श्वास घेऊनी जन्मा येतो ,

   एक जीव तो जगण्यासाठी!

अखंड त्याची सोबत असते,

   ‘ मी कोण ‘ हे जाणण्यासाठी!….१

 

 जेव्हा कधी  कोंडतो तेव्हा,

  जाणीव  त्याची जगण्यामध्ये!

 विसरलेल्या”श्वासास” शोधतो,

   आपण आपल्या देहामध्ये ….२

 

 पंचप्राण हे चालू रहाती,

   श्वासाचे आंदोलन असे !

 फुकाच आहे देह बापडा,

   श्वासाविण त्या अस्तित्व नसे!…३

 

 दिली बासरी देहाची ही,

   ईश्वराने अपुल्या हाती!

 हवा लागते फुंकायाला,

   तेव्हा होतसे स्वर निर्मिती!….४

 

 स्वर मधुर बासरीचा येई,

  त्या श्वासाच्या हिंदोळ्यातून!

नसते जेव्हा साथ हवेची ,

  श्वास थबकतो अंतरातुन….५

 

 कृपा तुझी ही देवा आगळी,

   एकेका श्वासातून पाझरते !

तूच आधार या देहाचा ,

  सत्य मनास तेव्हाच उमगते !….६

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #181 ☆ संत परिसा भागवत… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 181 ☆ संत परिसा भागवत…!! ☆ श्री सुजित कदम ☆

संत परिसा लाभला

आद्य शिष्याचा रे मान

पंढरीत सांगतसे

कथा भागवत छान…! १

 

संत नामदेवांचा हा

पट्टशिष्य अनुयायी

भक्ती शक्ती गुरुभाव

पदोपदी याचे ठायीं…! २

 

ब्राम्हण्याचा अहंकार

नामदेवे निर्दाळीला

निजबोध करूनिया

संत परीस जाणीला…! ३

 

दिला वर रक्मिणीने

चित्त भजनात दंग

वैचारिक प्रगल्भता

रामकृष्ण सरि संग..! ४

 

वेद उपनिषदांचा

होता अभ्यास सखोल

संत श्रेष्ठ विचारांचा

अभंगात होता बोल…! ५

 

विविधांगी व्यक्तीमत्व

वेद विद्या पारंगत

स्तूती महात्म्य गौरव

सांगतसे भागवत….! ६

 

होता परीस अमोल

दैवी कृपे लाभलेला

नामदेव राजाईने

चंद्रभागे फेकलेला…! ७

 

संत परीसाचा हट्ट

नामदेवे पुरविला

ओंजळीत दगडांचा

रत्न साठा दडविला…! ८

 

लंका दर्शनाची कथा

केला दूर अहंकार

नामदेव परीसाचा

निरूपणी साक्षात्कार….! ९

 

नाना धर्म ग्रंथातून

शिष्योत्तम आकारिला

भक्तीभाव अध्यात्मात

ब्रह्म सुखे साकारीला..! १०

 

संत सकल गाथेत

आहे संवादी अभंग

नामदेव विचारांना

आहे परीसाचा ढंग..! ११

 

नामदेव कृतज्ञता

भावोत्कट चेतोहारी

संत परीसाचे काव्य

प्रासादिक  शब्द वारी..! १२

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाहण्यास तुम्ही या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पाहण्यास तुम्ही या… ? सुश्री वर्षा बालगोपाल 

आवाहन हे ज्योतिबांना या

सावित्रीबाई सवे तुम्ही या

विद्यापीठ पाहण्यास तुम्ही या |

केली तुम्ही ही ज्ञान सावली

परी प्रेमावीन सुके झावळी

नवे ज्ञान देण्यास तुम्ही या

विद्यापीठ पाहण्यास तुम्ही या |

स्वप्नांस पूर्ण करण्या असे

भव्य विद्यापीठ साद घालते

मातृनाव कोरले भाळी या

विद्यापीठ पाहण्यास तुम्ही या |

ज्ञानी होऊनी नारी हासती

जिद्दीने पुढे चालती

कृतज्ञतेची देतो पावती  घ्या

विद्या पाहण्यास तुम्ही या |

भरारी घेती कर्तृत्व पक्षी

ज्ञानवृक्ष हे तयास  साक्षी

झुळूक शिक्षणाची अनुभवण्या या

विद्यापीठ पाहण्यास तुम्ही या |

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print