सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “जेव्हा मी हरते…” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

जेव्हा मी हरते

क्षणभर थांबते

कुठं मी चुकते

पाहत मग राहते….

 

एकच चूक पुनःपुन्हा करते

स्वतः आधी जगाला पाहते

एकटेपणाला थोडी घाबरते

जगाच्या पसाऱ्यात अडकून पडते…

 

चांगले वाईट अनुभव

वेचत मग बसते

सुख दुःखाचा

न्याय निवाडा करून टाकते…

 

व्यक्ती ,वस्तू ,परिस्थिती

सगळ्यांना दोष दूषणे

यश अपयश यांच्यामुळे

असते का ओ खरे?

 

पुन्हा एक जाणीव

नव्याने होते

आपल्या आयुष्याची जबाबदारी

आपलीच असते…

 

मानले तर जग सारे

आपले असते

नाहीतर कोणी

कोणाचेच नसते….

 

स्व सोबत राहणे

असेल खरे जगणे

जग सारे निमित्त मात्र

त्याच्याशिवाय आयुष्य कसले?

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments