श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

मला इतकेच म्हणायचे आहे… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

जेंव्हा घरभेदी भिंतीनीच

नात्यागणगोतात भिंती उभ्या

केल्या  . .

कराकरा मिटली निष्ठुर दारं . .

बंदीच झालो घरातल्या –

कारागृहात. .नजरकैद भोगणारे

कैदीच. . .!

खिडकीतल्या गजावर तटतटून

माझे असहाय्य अपयशी हात. .

आणि बाहेर नुसताच काळोख

तेंव्हाही कवितांनीच केली

ना, टकटक . .

आपुलकीची सहिष्णू दस्तक. .

आणि डोळ्यातील ओलीचा –

आश्वासक पाऊस. .

अगदीच एकाकी नसतो आपण. .

मला इतकेच म्हणायचे आहे. .

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments