कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 201 – विजय साहित्य ?

☆ अनुभूती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

आई नावातच आहे

ईश्वराचा सहवास

वात्सल्याची अपुर्वाई

आई माहेराचा श्वास..! १

 

आई जगते जन्मते

लेकरांच्या पाठोपाठ

कुटुंबाच्या स्वास्थासाठी

सात जन्म बांधी गाठ..! २

 

आई हाक काळजाची

आई हळवेला‌ सूर

कसा कोण‌ जाणे येतो

झणी आठवांना पूर…! ३

 

आई आशिर्वादी हात

संस्कारांची जपमाला

आई शब्दांचे जीवन

देते विश्व जगायाला..! ४

 

आई अशी आई तशी

औक्षवंत करी बाळा

तिच्या‌ दिठीत भरला

सुख सौभाग्याचा चाळा..! ५

 

आई आहे अनुभूती

ज्याने‌ त्याने जपलेली

भावनांच्या काळजात

सुखेनैव लपलेली…! ६

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments