मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 155 – गुरूकृपा योग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 155 – गुरूकृपा योग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

सौभाग्ये लाभला।

गुरूकृपा योग।

सरतील भोग।

जन्मांतरी।।१।।

 

प्रेमे बाळकडू।

पाजते माऊली।

संस्कार सावली।

आद्यगुरू।।२।।

 

जीवनाचा वारू।

सावरण्या दृष्टी।

संगे प्रेमवृष्टी।

पितृछत्र।।३।।

 

ज्ञान विज्ञानाची।

उजळली ज्योत।

ज्ञानमयी स्रोत।

गुरूजन।।४।।

 

बहुव्यासंगी ते।

माझे गुरूजन।

ठेवा ज्ञानधन।

दिधलासे।।५।।

 

ज्ञान मकरंद।

असे चराचरी।

मधुमक्षी परी।

ध्येय हवे।।६।।

 

अनंत स्वरुपे।

गुरू माऊलीची।

वाट प्रकाशाची।

नित्य दावी।।७।।

 

गुरूपदी हवी।

श्रद्धा भक्ती खरी।

तेव्हा मुक्ती चारी

साधतील।।८।।

 

गुरूकृपा योग।

परीस दुर्लभ।

जीवन सुलभ।

सर्वार्थाने।।९।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ डोली… ☆ मेहबूब जमादार ☆

मेहबूब जमादार 

? कवितेचा उत्सव ?

☆ डोली… ☆ 🖋 मेहबूब जमादार

सालोसाल चढती गड 

जरी  तुटतात पाय

तुडविती   त्याच वाटा

सवे  लेक आणि  माय —

 

वारा  शहराचा  तसा 

इथं फिरलाचं नाही

दार  शाळेचे कुणीही 

त्यांना उघडले  नाही —

 

कधी भेटतो प्रवासी

किती अर्जव करून

दोन वेळेच्या  पोटाला

मिळे  भाकरी  कष्टून —

 

 त्यांनी पाहिलेच  नाही 

 जग वेगळे बाहेर

 डोलीतच  जीव  सारा 

 नाही वेगळं माहेर —

 

अशा  कित्येक पिढ्यांनी

फक्त डोलीच वाहिल्या

डोली वाहता वाहता

जशा आल्या  तशा गेल्या —

 

डोली वहायाची रोज 

डोली दिसते स्वप्नात

डोलीत बसलंय कोण 

त्यांना नसतं माहित —

 

दिसेना का  शासनाला

त्यांच्या हृदयाचा पीळ ?

 सारं  दिसले  तरीही 

त्याचा  नुसताच  खेळ — 

 

© मेहबूब जमादार

मु. कासमवाडी,पोस्ट -पेठ, ता. वाळवा, जि. सांगली

मो .9970900243

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #177 ☆ मनास वाचूया… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 177 – विजय साहित्य ?

 

☆ मनास वाचूया… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

चला लेखणी देखणी करूया

शब्द दर्पणी मनास वाचूया ||धृ ||

अनुभूतीचा रंग मनोहर

भाव भावना शब्द सरोवर

मनांगणीचे विश्व सजवूया… ||१||

वास्तवतेची, शब्द बांधणी

कल्पकतेची, कला अग्रणी

प्रतिभा शक्ती, अक्षर लिहूया… ||२||

कविता आहे, फुल बकुळीचे

अक्षय लेणे, गुलाब कळीचे

कथा, कविता, साहित्य निर्मूया…. ||३||

साहित्यातील , नवीन वळणे

शब्द संपदा, माणूस कळणे

नात्यामधले, बंधन जपूया… ||४||

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खु र्ची ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🤠 खु र्ची ! 😎 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

गल्लीपासून दिल्लीपर्यंत

चाले माझाच बोलबाला,

जळी स्थळी काष्ठी पाषाणी

असे मजवर नेत्यांचा डोळा !

 

‘आराम’ नावाची माझी बहीण

कुठे हरवली कळत नाही,

आजच्या “गोल” भगिनींना

तिची कुठलीच सर नाही !

 

माझ्यावाचून सर्व नेत्यांचा

जीव सदा अडकतो घशात,

मज मिळवण्या जिवलगांचा

करती कधीही विश्वासघात !

 

रोज जगभरात मजसाठी

चाले नवे नवे राजकारण,

जनतेला कळणार नाही

त्या मागले खरे अर्थकारण !

 

सर्व जगात एकच भारी

आहे नशा माझी विखारी,

शेवटी उतरते एकदाची 

नेता जाता देवाघरी !

नेता जाता देवाघरी !

 

© प्रमोद वामन वर्तक

११-०२-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #163 ☆ संत कनक दास… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 163 ☆ संत पुरंदर दास☆ श्री सुजित कदम ☆

कर्नाटक पितामह

संत पुरंदर दास

व्यासराये गोरविले

हाची खरा  हरीदास..! १

 

शास्त्र शुद्ध संगीताचे

अवगत केले ज्ञान

आदिगुरू पितामह

प्राप्त केला बहुमान…! २

 

श्रीनिवास नायक हे

मुळ नाव या संतांचे

सराफीचा व्यवसाय

बडे व्यापारी मोत्यांचे…! ३

 

धनवान  असे जरी

वृत्ती कंजूष तयाची

आला पांडुरंग दारी

घेण्या परीक्षा दासाची…! ४

 

आला पांडुरंग दारी

नथ पत्नीची घेऊन

ब्राह्मणाच्या रूपांमध्ये

गेला परीक्षा घेऊन…! ५

 

दान देई ब्राम्हणाला

दास पत्नी सरस्वती

दान वस्तू विकूनीया

शिकविली जगरीती…! ६

 

केला दासां उपदेश

सोडी हव्यास धनाचा

दान केले धन सारे

मार्ग वैष्णव धर्माचा…! ७

 

आला विजय नगरी

पांडुरंग दुष्टांताने

पंथ वैष्णव माधव

वाटचाल संगीताने…! ८

 

ग्रंथ विठ्ठल विजय

कथा जीवनाची सारी

आत्मा चरीत्र सुरस

सुख दुःख घडे वारी..! ९

 

उगाभोग नी‌ सुळादी

काव्य प्रकार दासाचे

माया मालव गौळ हे

राग दैवी संगीताचे…! १०

 

भक्ती रचना विपुल

पदे कानडी भाषेत

भजनाचे अनुवाद

झाले विविध भाषेत…! ११

 

स्वरसाज अभंगाला

केले अभंग गायन

सुर ताल संगीताने 

मुग्ध होती प्रजाजन…! १२

 

 

राजा कृष्ण देवराय

भक्त झाला या संतांचा

केले कार्य सामाजिक

कळवळा गरीबांचा….! १३

 

दास मंडप  प्रसिद्ध

तिरूपती मंदिरात

देई मंडप बांधून

कृष्णदेव उत्साहात…! १४

 

कर्नाटक प्रांतांमध्ये

केला प्रचार प्रसार

संत पुरंदर दास

संकीर्तन सेवाधार….! १५

 

पुरंदर विठ्ठल ही

नाममुद्रा अभंगात

हंपी गावी कार्य थोर

ईश भक्ती अंतरात…! १६

 

आहे टपाल तिकीट

गौरवार्थ हा सन्मान

पुण्यतिथी या दासाची

हंपी गावी  सेवा दान…! १७

 

आहे जीवन संगीत

संत पुरंदर दास

संत साहित्य विश्वात

मोती अनमोल खास…! १८

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – नाच गं घुमा… – ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – नाच गं घुमा… – ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कपाळावर लाल कुंकवाचा टिळा

 गळ्यात काळ्या मण्यांचं डोरलं 

हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा 

हेच तुझं रूप समाजाने कोरलं…१

 तुझ्या जीवनाच्या दोऱ्या

 त्यांनी घेतल्या हातात 

झालीस एक कठपुतळी

 राहिलीस त्यांच्या धाकात …२

नाच ग घुमा नाच ग घुमा

आखलं तुझं रिंगण

 याच्या त्याच्या तालावर 

नाचताना हरवलं भावांगण …३

दार उघड बयो दार उघड 

उभा होता उंबरठ्यात नवा विचार 

उचल ती कातर कापून टाक दोर

 होऊन जाऊ दे तुझ्या मुक्तीचा प्रचार ..४

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 184 ☆ मर्मबंधातली ठेव ही… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 184 ?

🌸 मर्मबंधातली ठेव ही… 🌸 सुश्री प्रभा सोनवणे ☆

तुला पाहिलं एका कार्यक्रमात,

त्याच्या बरोबरच!

प्रेमलग्न का  ?

विचारलं त्याला—

तसं छानसं हसून,

‘हो’ म्हणाला !

खूप छान वाटली,

तुमची जोडी!

नंतर….

कुठल्याशा लग्नात…

छान सजलेली तू …

एखाद्या स्वप्नसुंदरी…सारखीच !

तू असायचीच त्याच्याबरोबर,

असलीस, नसलीस तरीही…

अपूर्णच दोघे,

एकमेकांशिवाय!

“मेड फॉर

  इच अदर”

अशीच जोडी ‐—-

तरीही–

दोघांचं स्वतंत्र अस्तित्व!

तुझ्या कसोटीच्या

 क्षणीही,

 त्यानं तुला असं हळूवार

जपताना पाहून ,

जाणवून जातं,

नुसतीच तनामनाची,

नाती नसतातच ही…

नजरच सांगून जाते…

प्राण ओतलेला असतो

एकमेकांत!

तुमच्या दोघांविषयी वाटणारं,

जे काही…दुसरं -तिसरं ,

काही नाही …

 ही ठेव मर्मबंधातली !

© प्रभा सोनवणे

२५ मे २०२३

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “त्या” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “त्या” ☆ श्री आशिष मुळे ☆

किती आल्या अन किती गेल्या

काही घुटमळल्या, काही थांबल्या

काही बोलल्या, काही बुजल्या

काही हसल्या अन काही रडल्या ।

 

थांबणाऱ्या नंतर आबोल झाल्या

जाणाऱ्या न बोलता बोलून गेल्या

हसणाऱ्या हसत हसत रडवून गेल्या

रडणाऱ्या नंतर हास्यास्पद झाल्या ।

 

काही मात्र जिवाभावाच्या झाल्या

जणू माझेच प्रतिबिंब झाल्या

काही हवा करून गेल्या

काही हवेत विरून गेल्या ।

 

पण….

 

सगळ्याच काहीतरी शिकवून गेल्या

प्रगतीत माझ्या हातभार झाल्या

आयुष्याच्या रखरखीत उन्हात

माझ्या ‘कविता‘ माझी सावली झाल्या ।

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वाक्षरी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वाक्षरी… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

(पादाकुलक)

तुझ्यातले ते झपाटलेले

शमू दे वेड्या सुसाट वादळ

तू आता हो नि:शब्द सळसळ !

 

घनव्याकुळ ना उरले कोणी

कोणास्तव हे दाटुन येणे

टपटप झरणे प्राण उधळणे ?

 

अपार होते परंतु मिथ्या

त्या गगनाने दिधले पंख

त्या गगनाचा जन्मा डंख !

 

कितिदा त्यांनी बळी घेतला

तरी क्रूस हा तुजला प्यारा

तुझ्या जगाचा न्यायच न्यारा !

 

कुठवर लढशिल रण एकाकी

पत्कर तूही दुनियादारी

आणि तहावर करी स्वाक्षरी !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #190 ☆ सराव… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 190 ?

☆ सराव… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

दुःखांत पोहण्याचा इतका सराव आहे

वाट्यास खूप छोटा आला तलाव आहे

मी सोसल्या उन्हाचे दुःख का करावे ?

त्या तप्त भावनांशी माझा लगाव आहे

केला विरोध जेव्हा मी भ्रष्ट यंत्रणेचा

नाठाळ एक झाले आला दबाव आहे

मारून त्या बिचाऱ्या गेले टवाळ सारे

आता सभोवताली जमला जमाव आहे

उपवास नित्य शनिचा केला जरी इथे मी

हट्टी ग्रहा तुझा रे वक्री स्वभाव आहे

दारी तुझ्या प्रभू मी याचक म्हणून आलो

झाली तुझी कृपा अन् सरला तनाव आहे

यात्रा करून येथे थकलेत पाय माझे

दारात ईश्वराच्या पुढचा पडाव आहे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares