श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “त्या” ☆ श्री आशिष मुळे ☆

किती आल्या अन किती गेल्या

काही घुटमळल्या, काही थांबल्या

काही बोलल्या, काही बुजल्या

काही हसल्या अन काही रडल्या ।

 

थांबणाऱ्या नंतर आबोल झाल्या

जाणाऱ्या न बोलता बोलून गेल्या

हसणाऱ्या हसत हसत रडवून गेल्या

रडणाऱ्या नंतर हास्यास्पद झाल्या ।

 

काही मात्र जिवाभावाच्या झाल्या

जणू माझेच प्रतिबिंब झाल्या

काही हवा करून गेल्या

काही हवेत विरून गेल्या ।

 

पण….

 

सगळ्याच काहीतरी शिकवून गेल्या

प्रगतीत माझ्या हातभार झाल्या

आयुष्याच्या रखरखीत उन्हात

माझ्या ‘कविता‘ माझी सावली झाल्या ।

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments