श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🤠 खु र्ची ! 😎 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

गल्लीपासून दिल्लीपर्यंत

चाले माझाच बोलबाला,

जळी स्थळी काष्ठी पाषाणी

असे मजवर नेत्यांचा डोळा !

 

‘आराम’ नावाची माझी बहीण

कुठे हरवली कळत नाही,

आजच्या “गोल” भगिनींना

तिची कुठलीच सर नाही !

 

माझ्यावाचून सर्व नेत्यांचा

जीव सदा अडकतो घशात,

मज मिळवण्या जिवलगांचा

करती कधीही विश्वासघात !

 

रोज जगभरात मजसाठी

चाले नवे नवे राजकारण,

जनतेला कळणार नाही

त्या मागले खरे अर्थकारण !

 

सर्व जगात एकच भारी

आहे नशा माझी विखारी,

शेवटी उतरते एकदाची 

नेता जाता देवाघरी !

नेता जाता देवाघरी !

 

© प्रमोद वामन वर्तक

११-०२-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments