मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🌴 मनं पाखरू ! 🌿  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

मनं पाखरू पाखरू

परी हलके पिसागत,

जाई साता सुमद्रापार

क्षणी बेभान वेगात !

 

मनं पाखरू पाखरू

सारा सयीचा खजिना,

इथे दुःखी जखमांना

कधी जागाच पुरेना !

 

मनं पाखरू पाखरू

घर बांधे ना फांदीवर,

नेहमी शोधित फिरे

वृक्ष साजिरा डेरेदार !

 

मनं पाखरू पाखरू

पंख याचे भले मोठे,

दृष्टीआडचे सुद्धा

कवेत क्षणात साठे !

 

मनं पाखरू पाखरू

वारा प्यालेले वासरू,

बसे ना कधी वेसण

सांगा कसे आवरू ?

© श्री प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनुबंध… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अनुबंध 💦 सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

अनुराग तुझा नी माझा|

कि बंध हा रेशमाचा |

जो कधी न तुटायाचा|

विश्वास मनी मम साचा|१|

 

शत चांदण्या या  वेचून|

तव केशकलापी माळून|

केतकीच्या गंधात भिजून|

गेलो तव नजरेत गुंतून|२|

 

मध भिजल्या चांदणराती|

जागल्या धुंद त्या किती!

 तव मलमली तनूवरती|

नक्षत्रे सजली तरी किती!

|३|

 

श्वासात श्वास मिसळून|

स्वप्न नयनी हे रेखून |

किती रंगबावरे होऊन|

अनुबंध आले हे जुळून|४|

 

अचानक काय हे घडले|

मम मनाची झाली शकले |

संशय का मनी हे आले|

प्रीतीचे फूल कसे सुकले?

|५|

 

बंध असे तुटून जरी गेले|

आशेचे मनी या इमले|

ते सजवाया परी आपुले|

वळतील तुझी पाऊले |६|

 

मज भासतेस तू जवळी|

येशील अधिऱ्या वेळी|

प्रीतीचासागरउसळी

अनुरक्त गोजिरी कळी|७||

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 98 ☆ सांगना केव्हा येणार तू… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 98 ? 

☆ सांगना केव्हा येणार तू… ☆

आठवतात दिवस

आजही मला ते

ओल्या वाळूतले

खेळण्याचे ते…

 

तुझा लटका राग

आजही आठवतो

तुझा तो अबोला

मी मनात साठवतो

 

असा हा तुझा ध्यास

माझ्या रोम रोमात

तुझ्या-विना मी,

असतो फक्त शून्यात…

 

तुझे प्रेमळ बोलणे

स्मरणात आहे मला

सांग तू आहेस कुठे

कसा शोधू गं तुला…

 

अंगणातल्या जागी

आजही पारिजात उभा

विचारतो सतत मला

कुठे आहे तुझी प्रभा…

 

त्यास मी काय सांगू,

न कळलेच तेव्हा

प्रिये सोडणं अबोला,

सांगणं तू येणार केव्हा…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्लेषवृक्ष… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ क्लेषवृक्ष… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

शोधतो आजन्म, दिसेच ना मूळ

शोधूनही कूळ.. सापडेना

 

तोडाव्यात फांद्या, तितके अंकूर

फोफावे भेसूर..क्लेषवृक्ष

 

भक्कम हे खोड, फांद्यांचा विस्तार

छाया सर्पगार…साहवेना

 

पाखरांचा टाहो, पानांपानातून

फांदीसही जून…फुटे कोंभ

 

रात्रंदिन चाले, आर्त सळसळ

भोगतो मी छळ..अंतर्यामी

 

जन्मांचीया खोल, मातीमध्ये मूळ

जणू की अटळ… नियती ही

 

आता मज नाही, कुठलीच खंत

मन हे दिगंत…होऊ पाहे

 

सोसण्याचे तप, होईल सफळ

क्लेषवृक्षा फळ… आनंदाचे

 

अन्य जन्माठायी, नको याचे मूळ

व्हावया व्याकूळ… क्षीण.. दीन

 

हीच एक माझी, पुरी व्हावी आस

मुळांचा प्रवास…. संपवी बा

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मंदिर… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

    जगी या जन्मा यावे

      मन पाखराचे घ्यावे

    पंख गरुडाचे असावे

   मुंगी होऊनी जगावे !

 

   नको मारणे टोचींचे

  दंतव्रण जिव्हारीचे

  पोळयामधून मधाचे

 थेंब थेंब निथळावे !

 

 जीवनाची अर्धी भाकरी

 कोर त्याची चंद्र चकोरी

 वाढत वाढत जाणारी

 जीवनाची ही शिदोरी !

 

 नको होवो चंद्र पूर्ण

 कलंक तो मागे लागे

 चंद्रकोरीसम निखळ

जीवन मम असावे !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – प्रतीक्षा – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – प्रतीक्षा – ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

 

माझ्या मनातल्या स्नेहलहरी

आत अंतरात उचंबळतात

आठव येती भरती ओहोटीचे

माझिया मनाचिया सागरात..

तू नभीचा तळपता भास्कर

पार करशील का अवघे अंतर ?

दूर जरी तू इतुका माझ्यापासून

पोहचतील का चार किरणें उबदार..?

तू दूर असणारा तो रजनीकांत

करशील रुपेरी स्नेहाची बरसात ?

परि कसे बहरतील प्रितीचे क्षण

अन् प्रतिक्षेतली ती पुनवेची रात?

मनोमनी आठवता तुज क्षणार्धात

स्मृतीसुमने ही फुलूनी उमलतात

मिळत रहाते एक अनामिक आशा

ओंजळीत फुलतो गंधित पारिजात..

असे वाटते मम केव्हातरी कधी

कुठूनही बघता सामोरा येशील

निळ्याशार विशाल अंबरासम

निळ्या बाहूंत मजशी सामावशील..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

ठाणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अस्तांचल ☆ कवी स्व वसंत बापट

कवी स्व वसंत बापट

(25 जुलाई 1922 – 17 सितम्बर 2002)

? कवितेचा उत्सव ?

☆ अस्तांचल ☆

सूर्य अस्तगिरीवरती, क्षितिजावर रंग गूढ,

वृक्ष्यांसह, पक्ष्यांसह वाराही मौनमूढ !

 

क्षण सरतील चारदोन, नंतर अंधार मात्र,

सूर्यासह बुडणारच माझे अस्तित्वपात्र !

 

मावळत्या रंगछटा पूर्वेवर उमटतात,

अस्तांचलि असता मी पूर्वस्मृती प्रकटतात !

 

अक्षय ते पाथेयच अंतीम मम यात्रेस्तव

दिवस नवा आल्यावर जननान्तर स्मृतिवैभव !

 

एक एक बीजातून एक एक गीत नवे,

मरणातही उरणारा तूच भाग्यवंत , कवे ,!

(चित्र साभार लोकमत https://www.lokmat.com/maharashtra/todays-memorial-day-vasant-bapat/)

कवी स्व वसंत बापट

मो. 9403310170,   e-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 120 – बाळ गीत – अंगत पंगत  ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 120 – बाळ गीत – अंगत पंगत 

अंगत पंगत छान छान

झाडाखाली वाढले पान ।। धृ।।

वारा आलाय गार गार ।

जेवणाची ती रंगत फार।

गप्पागोष्टी धमाल छान ।।१।।

पिठले भाकरी गरम-गरम ।

दशमी पोळी नरम-गरम ।

घट्ट दह्याची रंगत छान ।।२।।

आंबट वरण लज्जतदार ।

लोणचे चटणी चटकदार ।

पुलाव पाहून भरले मन।।३।।

पापड भजी कुरुम कुरुम

साजूक तुप साखर वरून।

कोशिंबीर ने सजले पान।।४।।

गप्पागोष्टी केल्या खूप ।

ताईने मधून आणले सूप।

वरून सोडली मलाई छान।।५।।

जेवणासोबत खेळले खेळ ।

कळेना कसा गेला वेळ ।

पोटा सोबत भरले मन ।६।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही बोलायचे आहे ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

 ? कवितेचा उत्सव ?

☆ काही बोलायचे आहे ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

काही बोलायाचे आहे, अनिवार्य आहे सांगणे.

कुणास ठाऊक, वेळ किती मज,

कधी येईल बोलावणे.

 

रुतलेले शब्द ह्रदयी, दाटून आला गळा,

मोकळे होऊन जावे,

का उगा सोशीशी कळा?

 

मनीचे स्वच्छ बोलायलाही लागते ताकद, हिंमत.

स्वच्छ मनाने समज तूही,

नसावे मनी गैरमत.

 

बोलण्यानेच वाढेल प्रेम, अन् संपेल दुरावाही अल्पसा.

चांदणे बरसेल राती,जर मन पारदर्षी आरसा.

© निलिमा ताटके

ठाणे.

मोबाईल 9870048458

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवे झोके… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ नवे झोके… ☆ श्रीशैल चौगुले ☆

ऋतू सरुन गेल्यावर

व्यर्थ बहर का यावा

ऊगी जखमाःच्या व्रणांवर

निरर्थ आक्षेप का घ्यावा.

 

वचने नसतात खरी

कल्पनेत सारे मोह

मेहंदीचा रंग पुसतो

रमलरेषांची चाह.

 

वेळेत घडावे सापेक्ष

क्षितीज सहज कवेत

परंतु जाऊ द्या,कल्पना

कशाला वेदना हवेत.

 

गत् काळांची भावगीते

स्पंदनाना देतील स्मृती धोके

अमानुषी दुनिया स्वार्थी

आयुष्या पुरतील नवे झोके.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print