मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #157 ☆ खडा मिठाचा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 157 ?

खडा मिठाचा

तो आकाशी भिरभिरणारा पतंग होता

रस्त्यावरती आला झाला भणंग होता

 

मठ नावाचा महाल त्याने उभारलेला

काल पाहिले तेव्हा तर तो मलंग होता

 

गंमत म्हणुनी खडा मारुनी जरा पाहिले

क्षणात उठला त्या पाण्यावर तरंग होता

 

काय जाहले भाग्य बदलते कसे अचानक

तरटा जागी आज चंदनी पलंग होता

 

चार दिसाची सत्ता असते आता कळले

आज गुजरला खूपच बाका प्रसंग होता

 

माझी गरिबी सोशिक होती तुझ्यासारखी

मुखात कायम तू जपलेला अभंग होता

 

घरात माझ्या तेलच नव्हते फोडणीस पण

खडा मिठाचा वरणामधला खमंग होता

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नंदादीप… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नंदादीप … ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

अंधाराचा नाश करून

दिवा देतो प्रकाश

यासाठी तो पूजनीय,वंदनीय

अंधारात कसे चालावे?

धडपडणार नाही का आपण?

सरळ रस्ता सोडून

जाऊ की हो भलत्याच मार्गावर!…

दाटला अंधार माणसाच्या मनात

दिसत नाही त्याला

काय चांगले काय वाईट.

भरकटत जातो मग

आणि पडतो की हो खड्यात…

महाराष्ट्राची परंपरा मोठी

लावले त्यांनी ज्ञानदीप

माणसाला प्रकाश देण्यासाठी

पंत संत तंत

वाटा उजळविल्या त्यांनी

सुश्लोक वामनाचा

ओवी ज्ञानेशाची

अभंग तुकयाचा

आर्या मयूरपंताची

हीच पणती मिणमिणती,

हीच समई नि हाच लामणदिवा…

ज्ञानेशांचा ज्ञानदिवा

अखंड तेवत आहे

सामान्यांना परमात्म्याचे

ज्ञान वाटत आहे.

असीम त्यांचे शब्दभांडार

जीवनातील द्दृष्टांत देऊन

आत्मज्ञानाचा प्रकाश टाकत आहे

मनावरची मळभे दूर सारत आहे…

तुकाराम,नामदेव,जनाबाई

संत प्रत्येक जातीतले

संसाराच्या दरेक वस्तूत

दिसला त्यांना साक्षात परमेश्वर

वाट दाखविली भक्तीची

महिमा वर्णिला समर्पणाचा

अंधःकार दूर झाला

माणसाच्या मनातला…

संसार करता करता

ठेचकाळला माणूस अंधारात

विसरला त्याचा धर्म,त्याची कर्तव्ये

दासांनी दिला बोध प्रापंचिकाला

दिवटी धरून हातात सन्मार्ग दाखविला…

सुभाषितांनी केले ज्ञानाचे वाटप

शिकविला भल्या बुर्‍यातला फरक

कोणा वंदावे कोणा निंदावे

जाणिले सज्जन आणि दुर्जनांना

सतत तेवत आहे हा नंदादीप…

आभार ह्या दीपाचे कसे मानावे?

त्याने दाखविलेल्या वाटेने चालावे

हीच त्याची पूजा हीच कृतज्ञता…

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 99 ☆ तूच आहे मनोहरा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

 

?  हे शब्द अंतरीचे # 99 ? 

☆ तूच आहे मनोहरा… ☆

कृष्णा केशवा माधवा,

आलो शरण मी तुला

नको अंत पाहू माझा

घोर लागला जीवाला…०१

तूच आहे मनोहरा

माझा सदैव कैवारी

नको मला काही दुजे

बहू त्रासलो संसारी…०२

किती जन्म वाया गेले

माझे मला न कळले

गणित अवघड पहा

नाही कोडे, कधीच सुटले…०३

चालू जन्म माझा कृष्णा

तुझ्याचं लेखी लागावा

राज जीवनाचे कठीण

धाव मोहना, समयाला…०४

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ औचित्य… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ औचित्य… ☆ श्री शरद कुलकर्णी

घेउनी संदेश मेघांचे सहिष्णू,

वारा कांही बरळतो आहे.

आठवांच्या लाटांचा दर्या अनावर ,

थेंब होउन डोळ्यात तरळतो आहे.

पाखरं उडून गेली म्हणून इथे,

वृक्ष थोडाच रडणारआहे.

रानावनाला माहीत आहे,

पाऊस हमखास पडणार आहे.

चिंब होण्या सरीत बरसत्या,

पाऊस एक निमित्त आहे.

जीवघेण्या पावसाचे आवेग समजण्या,

भिजून जाणे हे खरे औचित्य आहे

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भिजकी वही… ☆ अरूण कोलटकर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ भिजकी वही… ☆ अरूण कोलटकर ☆

ही वही कोरडी नकोस ठेवू

माझी वही भिजो

शाई फुटो

ही अक्षरं विरघळोत

माझ्या कवितांचा लगदा होवो

या नदीकाठच्या गवत खाण-या म्हशींच्या दुधात

माझ्या कवितांचा अंश सापडो

 

 – अरूण कोलटकर

अरुण बालकृष्ण कोलटकर (नोव्हेंबर १, १९३२ – सप्टेंबर २५, २००४) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

☆ भेट… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

निळी जांभळी

मेघ डंबरी

चंद्र पोर्णिमा

रात साजिरी

 

सुटता कोडे

आठव सारे

भाव रंगात

रंगले मी रे

 

ओंजळीत त्या

गंध भरला

निळा खग ही

मंद हसला

 

आदिमाया ती

हळू जोजवी

नव स्वप्नांची

रचून ओवी

 

इथेच पुन्हा

श्याम भेटले

ब्रह्मवेळेत

सुख गोंदले

 

स्वर मधुर

स्निग्ध एकांती

मनमोहन

सवे भ्रमंती

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

२३/८/२०२२.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आस तुझ्या भेटीची ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? आस तुझ्या भेटीची ? ☆ सुश्री निलिमा ताटके ☆ 

आस तुझ्या भेटीची, आठवत होते तुला, मनातल्या मनात.

कळले नाही मला, कधी घेतला कॅनव्हास, नि चितारले तुला क्षणात.

इतके जिवंत चित्र झाले की माझे सुटले रे भान.

डोळ्यात डोळे मिसळता, तुझ्यामध्ये माझे प्राण.

मला भेटण्याची इतकी घाई झाली तुला.

एका हाताने हलकेच जवळ ओढले तू मला.

रंगब्रश पॅलेटही मेजावरती तशीच अजुनी पडुनी आहे.

अलौकिक आपुली ही प्रेमभेट, चित्रात कैद, दुनिया पाहे…

छायाचित्र  – सुश्री निलिमा ताटके.

© निलिमा ताटके

27.8.2022.

ठाणे.

मोबाईल 9870048458

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग रचना ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ राधाकृष्ण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(पंचाक्षरी)

 कृष्ण सावळी,

 राधा बावरी !

 खेळत होती,

 यमुना तीरी !

 

    कदंब वृक्षी,

    फांदी वरती!

    कृष्णसख्याची,

    वाजे बासरी!

 

 मुग्ध होऊनी,

 मनी तोषूनी!

 राधा गुंगुनी ,

 गेली मन्मनी!

 

     घर विसरे,

     मन विसरे !

     एकरूप ते,

     चित्त साजरे!

 

 राधा कृष्णाची,

 रास रंगली!

 गोकुळात ती,

 टिपरी घुमली !

 

   सारे गोकुळ,

   गाऊ लागले!

   नाचू लागले,

   तद्रुप झाले!

 

कृष्ण किमया,

वृंदावनी त्या ,

कालिंदी काठी,

अवतरली !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पितृपक्ष… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? कवितेचा उत्सव ?

☆ पितृपक्ष… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

नेहमीचाच कावळा तो, नेहमीसारखाच आला

पितृपक्ष असल्याने तो, रुबाब दाखवत बसला

नेहमीचे रुपडे काढून, बापाचा मुखडा घातला

ताटातले पदार्थ बघत, मिश्किल हसत म्हणाला

 

जिवंत असतांना काही, गोडधोड नाही दिलेस

म्हातारपणी माझे काही, लाड नाही केलेस

नको आता तुझी ती, जिलेबी आणि बासुंदी

पूर्वी कायम ठेवलीस मला, खायला ती बंदी

 

कशाला रे आता हा पानाचा दिखावा

बस कर आता हा काव काव चा धावा

गरज होती म्हातारपणी, आला नाहीस तेंव्हा

नको करुस आता ही, मेल्यानंतरची सेवा

 

डोळे लाऊन बसायचो रे, तुझ्या वाटेवरी

काय तरी घेऊन येशील, वाटे दरवेळी

वाटणीचा कागद घेऊन, आलास कोर्टाचा

शिक्का मारलास माझा, शाईच्या अंगठ्याचा

 

जिवंतपणी दाखवलास, मला वृद्धांचा आश्रम

आता कशाला घेतोस पोरा, पान दाखवायचे श्रम

म्हातारपणी वेळ देऊन, दिले असतेस लक्ष

रोज साजरा केला असता आपण, पितृपक्ष

रोज साजरा केला असता, आपण पितृपक्ष

रोज साजरा केला असता, आपण पितृपक्ष

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 121 – बाळ गीत – आजोळची गोडी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 121 – बाळ गीत – आजोळची गोडी 

किती वर्णावी वर्णावी माझ्या आजोळची गोडी।

जसा मायेचा सागर मजा चाखू चला थोडी ।।धृ।।

 

आजी आजोबा म्हणती आम्हा दधुाची ही साय।

लाड मावशी मामाचे आम्हा ऊणे तिथे काय ।

ओसंडते प्रेम भारी असे छोटे जरी वाडी।।१।।

 

लख्ख अंगणात कशी आजी रेखीते रांगोळी ।

परसात फुले कशी फुलबाग ही आगळी।

सुगंधात धुद होई चन्द्रमोळी ही झोपडी ।।२।।

 

भेटायला येती मज चिऊ काऊ मनी माऊ ।

तृप्त सारे मनी होती खावूनिया गोड खाऊ।

माझ्या आजीच्या हाताला, अमृताची असे गोडी ।।३।।

 

चिंचा बोरे फळे सारी रानमेवा अतं नाही ।

ऊस के ळी डाळिंबाला खावेकिती ना गणती ।

सोबतीला फौज मोठी आम्ही सारे खेळगडी ।। ४।।

 

नाचू खेळू गोष्टी गाणी चिंता नसे मुळी काही ।

अभ्यासाची कुरघोडी येथे डोकावत नाही

स्वर्ग सुखा परि सारी सुट्टीला या तोड नाही।।५।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print