श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 121 – बाळ गीत – आजोळची गोडी 

किती वर्णावी वर्णावी माझ्या आजोळची गोडी।

जसा मायेचा सागर मजा चाखू चला थोडी ।।धृ।।

 

आजी आजोबा म्हणती आम्हा दधुाची ही साय।

लाड मावशी मामाचे आम्हा ऊणे तिथे काय ।

ओसंडते प्रेम भारी असे छोटे जरी वाडी।।१।।

 

लख्ख अंगणात कशी आजी रेखीते रांगोळी ।

परसात फुले कशी फुलबाग ही आगळी।

सुगंधात धुद होई चन्द्रमोळी ही झोपडी ।।२।।

 

भेटायला येती मज चिऊ काऊ मनी माऊ ।

तृप्त सारे मनी होती खावूनिया गोड खाऊ।

माझ्या आजीच्या हाताला, अमृताची असे गोडी ।।३।।

 

चिंचा बोरे फळे सारी रानमेवा अतं नाही ।

ऊस के ळी डाळिंबाला खावेकिती ना गणती ।

सोबतीला फौज मोठी आम्ही सारे खेळगडी ।। ४।।

 

नाचू खेळू गोष्टी गाणी चिंता नसे मुळी काही ।

अभ्यासाची कुरघोडी येथे डोकावत नाही

स्वर्ग सुखा परि सारी सुट्टीला या तोड नाही।।५।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments