पहाटेच्या गार वाऱ्यातअर्धोंमिलीत माझ्या डोळ्यातअन् शिणलेल्या माझ्या मनातदिसलीस तू सूर्यकिरणांच्या तेजात..किती वर्ष झाली तुला दूर जाऊनकाळही गेला आता वेळ विसरूनदिसलीस का मग अशी अचानकजाताना तर गेली होतीस तुझं मन सावरून..विचारायला जमलं नाही तुलाही अन मलाहीपण आज विचारायला हरकत नाहीमाझ्यातली हिंमत आजही तीच आहेपण तुझ्यातली भीती काही गेलेली दिसत नाही..म्हणून विचारतो, खरंच काय मिळवलस?जनरिती समोर तेव्हा झुकूनआणि विचार कर काय गमावलसवादळात माझा हात सोडून..दोष नाही देत तुला, डोळ्यातून पाणी काढू नकोसआता तरी मनातलं, जिभेवर आणायला लाजू नकोसआजही मित्रच आहे तुझा, तुझ वाईट कधी चिंतणार नाहीदुखलं तुला काही तर आजही डोळ्यात पाणी थांबणार नाही..आज मीही लूजर नाही आणि तूही विनर नाहीयाचा मला खरंच आसुरी आनंद होत नाहीकारण जातानाही तू मला काही देऊनच गेलीसजिंकायच्या ऊर्मीला माझ्या ज्वाळा बनवून गेलीस..त्याच आगीवर आजही जगतो आहेजगता जगता इतरांनाही ऊर्जा देतो आहेआता परत येऊ नकोसअन भडकलेली माझी चिताअशी मधूनच विझवू नकोस…
ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – १ ते ३ इंद्र; ४ ते ६, ८, ९ मरुत्; ५ ते ७ इंद्रमरुत्; १० – इंद्र
—मधुछन्दस वैश्वामित्र ऋषींनी पहिल्या मंडळातील सहाव्या सूक्तात इंद्र आणि मरुत् या देवतांना आवाहन केलेले आहे. तरीही हे सूक्त इंद्रसूक्त म्हणूनच ज्ञात आहे. याच्या गीतरूप भावानुवादाच्या नंतर दिलेल्या लिंकवर क्लिक केले म्हणजे हे गीत ऐकायलाही मिळेल आणि त्याचा व्हिडीओ देखील पाहता येईल.