श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 136 ☆ संत निवृत्ती नाथ… ☆ श्री सुजित कदम ☆

दिली गहिनीनाथांनी

दिक्षा निवृत्ती नाथांस

बंधू थोरले ज्ञानाचे

गुरू लाभले सर्वांस…! १

 

धन अध्यात्मिक सारे

दिले निवृत्ती नाथांनी

दिला आदेश ज्ञानाला

लिही गीता दृष्टांतांनी…! २

 

जगामध्ये गांजलेले

सुखी केले हीन दीन

संत निवृत्तीनाथांची

सिद्धयोगी  कर्मवीण…! ३

 

ज्ञाना सोपान मुक्ताई

केला सांभाळ स्नेहाने

आधाराची कृपाछाया

दिली निवृत्ती नाथाने…! ४

 

कृष्ण तत्व गीता सार

अभंगांचे मुळ रूप

कार्य निवृत्ती नाथांचे

परब्रम्ह निजरूप…! ५

 

ग्रंथ निवृत्ती ‌साराने

गीता टीकेस उत्तर

ग्रंथ निवृत्ती देवी हा

अद्वैताचे मन्वंतर…! ६

 

योगमय अद्वैताची

गाथा कृष्ण‌भक्तीपर

तीन चारशे अभंग

हरीपाठ सुखकर…! ७

 

हस्त लिखितांची ठेव

आहे कैवल्याचे लेणे

संत निवृत्तीनाथांचे

आहे आशीर्वादी देणे….! ८

 

वारकरी संप्रदाय

असे समता संदेश

वसा विश्व कल्याणाचा

देई निवृत्ती निर्देश…! ९

 

ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी

शोकाकुल परीवार

नाथ निवृत्त जाहले

संजीवन निरंकार…! १०

 

ब्रम्हगिरी पर्वताच्या

पायथ्याशी अंतर्धान

नाथ समाधी मंदिर

वैष्णवांचे श्रद्धास्थान…! ११

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments