☆ शाळा सुटता, पुस्तक मिटता, सुट्टी लागता… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
आपल्यापैकी खास करून आई, बाबा, आजी, आजोबा अन इतर सर्वाना प्रेमळ प्रणिपात, नमन, आणखीन खूप खूप शुभेच्छा, बस आत्ता इतकच! (आणखीन एक नम्र निवेदन, तुमच्या घरातल्या छोट्या मंडळींना साष्टांग नमस्कार, विचारा का? हा लेख शेवटपर्यंत वाचा, म्हणजे आपोआपच कळेल!)
शाळकरी मुलांची कुठलीही सुट्टी, म्हणजे पालक किंवा तत्सम मंडळींचा बहुदा घातवार असा अलिखित नियम असावा! त्यात सर्वात मोट्ठी सुट्टी म्हणजे उन्हाळी सुट्टी, खरे पाहिले तर ही सरकारी योजना असून, ती नेहमीप्रमाणे फेल का होत नाही, हा प्रश्न अत्यंत वाजवी आणि समयोचित आहे! पण त्याची अंमलबजावणी करायला शाळेचे प्रिन्सिपॉल आणि शिक्षक तत्पर असतातच. शाळेतील शिक्षकांना देखील ब्रेक हवा, त्यांना पण घरची कामे असू शकतात, हे लक्ष्यात घ्याल की नाही! ती मंडळी या निमित्याने त्यांच्या मुलांच्या सुट्टीचे व्यवस्थापन करणार की! म्हणून एरवी शाळेत धुमाकूळ घालणाऱ्या मुलांच्या समस्त घराला सुट्टीत मुलांचा ब्रेथलेस परफॉर्मन्स बघणे हे क्रमप्राप्तच!
शाळेत नियोजनबद्ध गोष्टींसाठी नियत अवधी असतो, मात्र शाळा नसेल तर मग आपल्या घरात असे सुसंवाद घडत असतीलच!
“आई, उद्या सकाळी उठवू नकोस प्लीज़, मी उठेन तेव्हा उठेन (म्हणजे कदाचित दुपार होईल)”
“आई, आज ऑफिसला जाऊ नकोस! घरीच मस्त वेळ घालवू (म्हणजे तू मस्त काही बाही कुकिंग कर अन मी खाईन)”
“आई, आज जरा घर नीट आवरून ठेव, अन मस्त स्नॅक्स, कोल्ड-ड्रिंकचे प्रिपरेशन कर (माझे फ्रेंड्स येणार आहेत अन आम्ही एन्जॉय करणार आहोत)”
“आई, आत्ता कुठे सुट्टी लागली, अभ्यास करून कंटाळा आलाय, मी आधीच सांगतो/सांगते, मी जरा रिलॅक्स होणार आहे( घरची कुठलीच कामे करणार नाहीये)”
“आई, आज तू दमली असशील ना, आज किचनला सुट्टी! कित्ती करतेस ग आमच्यासाठी, आज तू आराम कर बरं! (आज मस्त बाहेरच लंच, डिनर करायचं)”
दृश्य १९५५ आणि पुढचा उन्हाळी काळ- स्थळ नागपूर, पहाटे ५ वाजता, आमच्या वडिलांची एकच हाक, अन काही मिनिटं जाता जाता आम्ही तयार, घरापासून २.५ मैल अंतर कापायला, अंबाझरी तलावाची सैर करायला! तिथले तलावा काठीचे भटकणे, बागेत फिरणे, अन झुल्यावर झुलणे, तहान लागली तर तिथल्याच नळाचे पाणी पिणे. परत येतांना रस्त्याच्या काठी माठातली नीरा मिळायची. सकाळी ७ पर्यंत परत येणे, हा ठराविक कार्यक्रम असायचा.
आता पर्याय भरपूर आहेत, मुलांना सकाळी उठवण्याचा कार्यक्रम जमला की पुढचे सगळे सोप्पे असते! फक्त स्वच्छ स्वछंद हवा, हिरवीगार झाडे, मोकळी मैदाने, स्वच्छ पाणी, हे शोधायचा अवकाश की सुट्टीचे प्लानिंग झालेच समजा!
सुट्टीचे दिवसागणिक, आठवड्यागणिक अन महिन्यागणिक नियोजन करणे, म्हणजे तारेवरची कसरत! यात (किमान) दोन प्रकार असू शकतात. एक, मुलांच्या सोबत बसून प्लानिंग करा किंवा मुलांना वगळून ते (शांतपणे) करा! अर्थात हे सर्व मुलांकरता असल्यामुळे त्यांचा सहभाग असावा, हे मान्य, पण त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीपुढे पालक किती टिकणार हे दोन्ही पक्ष् किती ताकदीचे बाहुबली आहेत त्यावर वैयक्तिकपणे ठरवावे. या व्यतिरिक्त वेळेवर येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्लॅन बी ते प्लॅन झेड ठरवावा. (कांही काळापूर्वी कोरोना आला आणि आपले कित्येक प्लॅन धुळीला मिळाले!)
आता आपण मुलांसाठी सुट्टीत बहुसंख्य वेळा कशा-कशाचे नियोजन करतो ते बघू. यात मुलांना हे आवडेल हे गृहीत धरलेलेच आहे, शिवाय गुगल आणि इतर वेबसाइट्स आहेतच मदतीला! पिझ्झा पार्टी, पाजामा पार्टी, थीम पार्टी, उन्हाळी शिबीरे (यांचे विषय अनंत!), मॉलला भेट, मल्टिप्लेक्स मध्ये सिनेमे बघणे, वॉटर पार्क, अम्युझमेंट पार्कला भेटी देणे हे सर्वांचे सर्वकालीन सर्वप्रिय कार्यक्रम!
वरील सफरीं व्यतिरिक्त मी इथे काही पर्यायांचा विचार मांडते, बघा तुम्हाला आवडताहेत का?
*आपल्या शहरातील संग्रहालय, तारांगण, ऐतिहासिक वास्तू , गड, किल्ले आणि जंगले यांना भेटी, तसेच निसर्गाच्या सानिध्यात पक्षी, प्राणी, झाडे, वृक्ष आणि वेलींचे निरीक्षण करणे: या जागांना भेट देण्याआधी जर इंटरनेट आणि इतर स्त्रोतातून माहिती गोळा केली तर निरीक्षण आणखी चांगले करता येईल. तिथे गेल्यानंतर माहितीपुस्तिका देखील वाचता येईल. भेट दिल्यानंतर माहितीत भर घालून आपले सामान्य ज्ञान समृद्ध करावे! घरच्या वडीलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन असेल तर अत्युत्तम! याने मुलांची निरीक्षण शक्ती, जिज्ञासा आणि अभ्यासू वृत्ती वाढेल! तसेच हे मुलांनी लिहिले अन तेही मातृभाषेत, तर खूपच मजा येईल
*जवळपासच्या गावात राहून ग्राम्य जीवनाचा आनंद घेणे: नदीकाठी फिरणे आणि गावातील मुलांशी संवाद साधणे, तिथल्या जेवणाचा आस्वाद घेणे, सूर्योदय, सूर्यास्त आणि रात्री निरभ्र आकाशात चंद्र, ताऱ्यांचे निरीक्षण करणे, गावांत प्रदूषण बरेच कमी असल्याने हे जास्त आनंददायी असते. हे गाव मामाचे असेल तर आनंदाला काय तोटा?
*अनाथाश्रमाला आणि वृद्धाश्रमाला भेटी देणे, जमेल तसे दान करणे आणि तिथे वेळ देणे: मला वाटते सद्य परिस्थितीची जाणीव होण्याकरता, तसेच आपण किती सुस्थितीत आहोत याची मुलांना जाणीव व्हावी याकरता पालकांनी मुलांबरोबर या भेटी अवश्य द्याव्यात.
* बालनाट्य बघणे, लहान मुलांसाठी असलेले चित्रपट बघणे (मला असे वाटते की, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये तयार होणाऱ्या नाटकांना बालप्रेक्षकांनी आणि त्यांच्या पालकांनी भरघोस प्रतिसाद देणे आवश्यक आहे).
याच संदर्भात कांही मोजक्या आठवणी परत जाग्या करते!
साधारण १९५७-१९५८ चा काळ: स्थळ नागपूर मधील एक सिनेमागृह: बालप्रेक्षक आणि अति बालप्रेक्षकांच्या पालकांनी ते तुडुंब भरलय. सकाळी ९ ची वेळ! सिनेमा आहे “शामची आई”. पुस्तक वाचले होते, पण ती कहाणी रजतपटावर बघतांना कधी नव्हे इतके प्रेक्षक भावविवश झाले होते. मी तर आजवर इतर कुठलाही चित्रपट बघितल्यावर इतके रडल्याचे मला आठवत नाही. घरी आल्यावर देखील त्या सिनेमाचा आफ्टर इफेक्ट जाण्यासाठी खूप दिवस जावे लागले!
साधारण १९९८ चा काळ: तेच दृश्य, नागपूर मधील एक सिनेमागृह बालप्रेक्षक आणि पालकांनी तुडुंब भरलय. सकाळी ९ ची वेळ. सिनेमा आहे छोटा चेतन (३D) व त्याकरता खास रंगीत चष्मा घेण्याकरता लागलेली लांब रांग! सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली! मी पण मुलांसोबत मुद्दाम सिनेमा बघायला आलेय, मित्रांनो अशा वेळेस सिनेमाच्या व्यतिरिक्त बालप्रेक्षकांचा प्रतिसाद बघण्याचा आनंद काही वेगळाच!
साधारण २०१८ चा मे महिना: आता मी ठाण्यात नातीबरोबर आलेय, एक सुपर हिट नाटक अर्थातच “अलबत्या गलबत्या” बघायला! चिंची चेटकिणीची वाट बघता-बघता आली एकदाची!!! तिचे मंत्र-तंत्र, तिचे घाबरवणे अन तिचा ऍक्शनने भरगच्च भरलेला अन भारून टाकणारा फेमस डायलॉग “किती ग बाई मी हुश्शार, किती ग बाई मी हुश्शार!” इतकी गोड, लव्हेबल अन गुणाची (?) चेटकीण! मीच काय सर्वच तिच्या प्रेमात पडलेत! आधी वैभव मांगले अन आता निलेश गोपनारायण, तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा!!! हे चेटकिणीचे लोभस आऊटफिट अन अभिनयाचं आव्हान लीलया स्वीकारलेय तुम्ही अन विलक्षण ताकदीने पेलले!
मित्रांनो! काळ कुठलाही असू द्या, सिनेमा अन नाटकांना बालप्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद जवळपास सारखाच! बडबड, गप्पा आरडाओरडा, धमाल, कधी घाबरणारे अन कधी आनंदाचे चीत्कार, हसणे खिदळणे, वाहवा!
मोहोरून टाकणाऱ्या फुलांचे ताटवे, रंगीबेरंगी फुलपाखरांचे बागडणे, मोराचा मोरपंखी नाच, मनमोहक हास्याची दिलखुलास कारंजी अन मधुर, निरागस व लोभस बालपणाचे नयनरम्य दर्शन एकाच ठिकाणी हवे आहे का? मग कोणत्याही भाषेत बालनाट्य सुरु असलेल्या एखाद्या रंगमंदिराला जरूर भेट द्या, अँड don’t worry! भावनेला भाषेचा अडसर कधीच भासत नाही!!!
चला तर मंडळी, सुट्टीत धम्माल मज्जा करू या!!!
तूर्तास तुमची रजा घेते, एका बालनाटकाचे अर्जंट बुकिंग करायचे आहे!
☆ केमो तिची… थेरपी कोणाची?…भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
(पूर्णतः सत्य घटनेवर आधारित)
ती – एक मध्यमवर्गीय मुंबईकर. हम दो, हमारे दो – आदर्श सुखी संसार. निर्व्यसनी कुटुंब. चारचौघींसारखी नोकरी केली. मुला मुलीची लग्नं करून दिली. वयानुसार ती आणि नवरा निवृत्त झाले. And they lived happily ever after. सगळं कसं छान चाललं होतं.
नोकरीनिमित्त लेक नुकताच बंगळुरूला गेला होता, सूनबाई आणि नात अजून मुंबईलाच होत्या. लेकीचंही लग्न झालेलं, जावई – नातू गुणी होते.
सगळं कसं छान चाललं होतं, आणि हिलाच कोणाची तरी दृष्ट लागली. निमित्त झालं रात्री सारखं उठून बाथरूमला जावं लागण्याचं. एकानंतर एक वैद्यकीय तपासण्यांचा ससेमिरा लागला, निदान झालं आणि डॉक्टरांनी बोलावून घेतलं.
उठून बाथरूमला जावं लागण्याचं. एकानंतर एक वैद्यकीय तपासण्यांचा ससेमिरा लागला, निदान झालं आणि डॉक्टरांनी बोलावून घेतलं.
गंभीर आवाजात सांगितलं – ”वाईट बातमी अशी आहे की तुमच्या गर्भाशयावर कॅन्सरची एक छोटीशी गाठ आहे, पण चांगली बातमी ही आहे की गाठ अगदी छोटी आहे, कॅन्सर प्राथमिक अवस्थेतलाच आहे आणि एका छोट्या ऑपरेशनने ती गाठ काढून टाकता येईल.”
रोगाचं निदान समजल्यावर लेक बंगळूरूहून तडकाफडकी मुंबईला निघून आला, मुलगी माहेरी आली. रोगाचं नावच असं जबरदस्त होतं की सगळ्यांचे चेहरे शोकाकूल होते.
सगळ्यांचे म्हणजे ही सोडून.
तीन तीन आठवड्यांच्या अंतराने केमोथेरपीचे एकूण तीन डोस द्यायचे, त्यानंतर गाठीचे स्वरूप पहायचे आणि मग गरज पडली तर शस्त्रक्रिया आणि मग पुन्हा तसेच केमोचे तीन डोस असं उपचारांचं वेळापत्रक ठरलं.
चौकशीअंती ‘नाना पालकर स्मृती समिती’च्या केंद्रात केमोथेरपी घ्यायची हे ठरलं, आणि आपल्या दोन्ही मुलांसह appointment घेऊन ही केंद्रातील डॉक्टरांना भेटायला हजर झाली.
डॉक्टर खूप छान होते, त्यांचं नावच तिला खूप भावलं – डॉ विजय शरणागत. कॅन्सरवर विजय मिळवण्याचा संकेत आणि शरणागत भाव – नावातली ही अर्थगर्भ जोडगोळी तिला सुखावून गेली, आश्वस्त करून गेली.
तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा, संयतपणा मात्र डॉक्टरांना गोधळवून गेला. न राहवून त्यांनी विचारलंच – “पेशंटला का नाही आणलंत ?”
ती मनापासून हसली, म्हणाली, “ही काय, मी आले आहे की.”
आश्चर्याच्या धक्क्यातून सावरल्यावर, सोप्या शब्दांत काय झालं आहे, काय आणि कसं करायचं हे डॉक्टरांनी विस्ताराने समजावून सांगितले. केमोचे औषध कसे दिले जाते, औषध घेताना आणि नंतर काय त्रास होऊ शकतो तेही सांगितले आणि विचारलं, “सहा सात तास लागतात एक डोस घ्यायला. मग कधीपासून उपचारांना सुरूवात करू या ? या आठवड्यात का पुढच्या ?”
“नंतर कशाला ? आज करता येईल ना सुरुवात ? मग आजच करू या की.” ती.
“अगं आई, आपण जरा दोन मिनिटं बोलू या का ? घरी बाबांना सांगूया आणि …” मुलगा या तडकाफडकी निर्णयापासून आईला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होता.
“अरे, बघ. आज डोस घेतला की तू दोन चार दिवस थांब. मग तुला बिनघोर रुजू होता येईल कामावर. उगाच उशीर कशाला तुला ?
बरं, आज नाही तर चार दिवसांनी, हीच treatment घ्यायची आहे ना ? मग उगाच उशीर कशाला ?” तिचा practical approach.
केमोचा पहिला डोस झाला, दुसऱ्या दिवशी घ्यायचं इंजेक्शन समितीच्या केंद्रातून न घेता तिनं तिच्या फॅमिली डॉक्टरांकडून टोचून घेतलं, मग समिती केंद्रात आठवड्याभरानंतरचा फॉलो अप झाला. बघता बघता आणखी दोन आठवडे भुर्रदिशी उडून गेले आणि दुसऱ्या केमोची वेळ आली. पुन्हा दुसऱ्या दिवशीचे इंजेक्शन – या वेळी मात्र आग्रहाने समितीच्या केंद्रातच, पुन्हा फॉलो अप.
दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी मुलाला एक गोष्ट जाणवली होती की नर्सेस असोत वा डॉक्टर्स वा अन्य कोणी स्टाफ, ते आईकडे अंमळ जास्तच वेळ थांबत होते.
का बरं असेल असं?
सांगताना तर अगदी minor आहे, काळजीचं काहीच कारण नाही, असं सांगत होते. पण अन्य पेशंटकडे मिनिट दोन मिनिटांत चौकशी करून, सल्ला देऊन पुढे जात होते, आणि हिच्या पलंगाशी मात्र पंधरा वीस मिनिटे डेरा ठोकून बसले असायचे सगळे !
काय प्रकार काय आहे हा नक्की ?
त्याने ही शंका बायकोला, बहिणीला बोलून दाखवली. पुढच्या वेळी त्यांनीही पाहिलं, आणि खरंच होतं त्याचं observation.
दुसऱ्या केमो आणि त्याच्या फॉलो अपच्या वेळीही हाच सीन राहिल्यावर मात्र लेकीच्या काळजाचा ठाव सुटला, डोळ्यांत छप्पन सशांची व्याकुळता घेऊन ती डॉक्टरांकडे धडकली.
☆ “कशाला द्यायचे आपण १५० कोटी रुपये ?”… लेखक – श्री सतीश खाडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
“ कशाला द्यायचे आपण १५० कोटी रुपये रशियाला ? आपण पाच कोटी रुपयात तेजस (LCA ) वेपन सिस्टिम बनवू शकतो !”
भारताला त्यावेळी संरक्षण व्यवस्थेसाठी तेजस वेपन सिस्टिम घायची होती. जगात त्यावेळी मोजक्याच देशात ती बनवली जात होती. त्या दिवशी रशियाचे शिष्टमंडळ भारतात होते. दुसऱ्या दिवशी, भारत व रशिया यांच्यात खरेदी विषयी करार होणार होता. वेपन सिस्टिम अँड मिसाईल ईंटेग्रेशनची किंमत ₹ १५० कोटी सांगितली होती. उद्या करार होणार म्हणून पंतप्रधानाचे तत्कालीन प्रमुख सल्लागार डॉक्टर कलाम साहेबांनी भारतातील त्या संबंधित प्रमुख लोकांची बैठक घ्यायला सांगून मतं कळवायला सांगितले होते.
त्या बैठकीत तेजस वेपन सिस्टिम विषयी सर्व माहिती ऐकल्यावर एक शास्त्रज्ञ उभा राहिला ….त्याने आत्मविश्वासपूर्वक सांगितले की “ कशाला द्यायचे १५० कोटी रुपये? ह्याच गुणवत्तेची वेपन सिस्टिम मी व माझा विभाग पाच कोटी रुपयात बनवून देऊ.” – सगळी सभा स्तब्ध झाली !!
ही चर्चा डॉक्टर कलाम सरांना कळवली गेली. त्यांनी या शास्त्रज्ञाला तातडीने भेटायला बोलावले. हा शास्त्रज्ञ त्यांना जाऊन भेटला आणि त्याने सर्व शंकांचे निरसन केले. डॉक्टर कोटा हरिनारायणा ( LCA -तेजस प्रोग्रॅम डायरेक्टर ) यांनाही त्या सर्व तंत्रज्ञान व नियोजनावर विश्वास बसला. ते म्हणाले, “ तू लाग कामाला.”.. …दुसऱ्या दिवशी करार होणार होता तो चक्क रद्द करण्यात आला. भारतभरातील सर्व संबंधितांच्या भुवया उंचावल्या गेल्या. रशियन शिष्टमंडळाला तर मोठा धक्का होता.
पुढे दोन ते तीन वर्षातच या शास्त्रज्ञाने शब्द दिल्याप्रमाणे वेपन सिस्टिम बनवली आणि मिसाईल चाचणी तेजस Aircraft वरून यशस्वी केली. त्याबद्दल त्या शास्त्रज्ञाला ‘DRDO Scientist of the year’ हा पुरस्कारही मिळाला.
तेजस fighter ने आतापर्यन्त २००० हून अधिक weapon release चाचण्या यशस्वी करून नवीन विश्वविक्रम केला आहे.– नंतर त्या शास्त्रज्ञाची २०१६ मध्ये नॅशनल ऐरोस्पेस लॅबोरेटरी (NAL )येथे डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली. त्याने धडाडीने ७ वर्ष थांबलेला १४ सीटर सारस पॅसेंजर aircraft प्रोजेक्ट revive करून, दोन वर्षात तो ट्रॅक वर आणून विमानाने जानेवारी २०१८ मध्ये पहिले उड्डाण केले. सरकारने आता NAL ला १९ सीटर रिजनल ट्रान्सपोर्ट aircraft डेव्हलपमेंट ची मंजुरी दिली आहे. हे विमान २०२३ मध्ये उड्डाण घेईल.
आणि आता तर आणखी कमाल केली त्याने…. जगातील सर्वात कमी किमतीचा, तंत्रज्ञानात कोणतीही उंची कमी नसलेला हंसा ट्रेनर aircraft बनवलाय फक्त एक कोटी रुपयात !! ….. गेल्याच आठवड्यात त्याचेही राष्ट्रार्पण झाले आहे ……..
तो शास्त्रज्ञ आहे ‘प्रवरा इंजिनीयरिंग कॉलेजच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थीआमचा लाडका मित्र “जितेंद्र जाधव” !!
मित्रा तुझा खूप खूप अभिमान वाटतो!!! देशाला व जगाला अभिमान वाटावा इतके उत्तुंग यश तू संपादन केले आहेस. त्रिवार नाही हजारदा अभिनंदन !!!
— श्री सतीश खाडे
प्रेसिडेंट, माजी विद्यार्थी संघ, प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रकाशक – मिलिंद राजाज्ञा, नवदुर्गा प्रकाशन, कोल्हापूर.
पृष्ठे – २८०
किंमत – ५१० रु .
☆ मनोगत – सौ. नीला देवल ☆
माझी अग्निशिखा ही ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित झाली आहे त्यात तिचे हे मनोगत.
गुजरात मधील राजकुमारी आणि देवगिरीच्या शंकर देवांची राणी देवल देवी हिचे काळजाला भिडणारे चरित्र यामध्ये आहे.
इतिहासातील अज्ञात अनेक वीरांगणा पैकी ही एक देवल देवी जी अनंत आपदा संकटे अंगावर झेलते. प्रचंड स्व धर्माभिमानी, राष्ट्राभिमानी, मुच्छद्दी, धोरणी अशी स्त्री अल्पकाळ का होईना भारताची सम्राज्ञी म्हणून दिल्ली सिंहासनाधिष्ठित होते. अखंड भारताचे स्वप्न साकारते. अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वप्नांचा चक्काचूर करून.
अशा शूरवीर, धुरंदर स्त्रिया ज्या अज्ञात इतिहासातील पानापानात दडलेल्या. आहेत. पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी नारी शक्तींची ही चरित्रे जी भारतीय ना अज्ञात आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी देवल देवीची ही कथा नक्कीच प्रेरणादायी होऊन अनेक लेखिका अशा ऐतिहासिक स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्युक्त होतील. तेच या कादंबरीचे यश होईल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकातील देवल देवी व खुशरूकान या वरच्या स्वतंत्र प्रकरणावरून प्रेरणा मिळवून केवळ त्या प्रकरणाचा विस्तारित भाग म्हणजे ही कादंबरी आहे. स्वदेशासाठी जोहार करणाऱ्या रजपूत स्त्रिया इतकी प्राणपणाने स्वधर्म व स्वदेश राष्ट्र रक्षणारी राजकारणी, मुच्छद्दी आदर्श आशा स्त्रीचे चरित्र म्हणजे ही कादंबरी आहे.1857
सारखेच खुशरूकान व देवलदेवीने केलेले हे स्वातंत्र्य समरच आहे.
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है एक भावप्रवण एवं विचारणीय सजल “मनोज के दोहे…”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “चेहरा और किताब“।)
अभी अभी ⇒ चेहरा और किताब… श्री प्रदीप शर्मा
जो किताब पढ़े, वह रीडर, और जो चेहरा पढ़े, वह फेस रीडर। किताब कोई खत का मजमून नहीं, कि बिना खोले ही पढ़ लिया। किताब पढ़ने के लिए पढ़ा लिखा होना जरूरी होता है लेकिन चेहरा तो कोई भी आसानी से पढ़ सकता है, उसके लिए कौन से ढाई अक्षर पढ़ना जरूरी है।
सुना है, चेहरे को दिल की किताब कहते हैं। यानी यह भी सिर्फ सुना ही है, किताबों में नहीं पढ़ा।
न जाने क्यों हम सुनी सुनाई बातों पर विश्वास कर लिया करते हैं। जब कि हमारे कबीर साहब जानते हैं क्या फरमा गए हैं ;
तू कहता कागद की लेखी
मैं कहता आंखन की देखी;
यानी किताबों में लिखा झूठ, और आंखों देखा सच। अजीब उलटबासी है भाई ये कबीर की वाणी। ।
किताबों में किस्से कहानियां होती हैं, चलिए मान लिया, तस्वीर भी हो सकती है, लेकिन आपको किताब खोलनी पड़ती है, किताबों के पन्ने पलटना होता है किताब को पढ़ना पड़ता है, जब कि कुछ चेहरे तो बिलकुल मानो, खुली किताब ही होते हैं। कोई किताबों में डूबा हुआ है, तो कोई किसी के चेहरे को ही पढ़ता चला जा रहा है।
उधर पन्नों में आंखें गड़ाई जा रही है और इधर झील सी आंखों में गोते लगाए जा रहे हैं। हम भी डूबेंगे सनम, तुम भी डूबोगे, सनम। कोई थोड़ा ज्यादा तो कोई थोड़ा कम। कभी कोई किताब, तो कभी की किसी का चेहरा, पढ़ते हैं हम।।
हम कोई गोपालदास नीरज तो नहीं कि शौखियों में शबाब और फूलों में शराब को मिलाकर प्यार का नशीला शर्बत तैयार कर दें, लेकिन चेहरे और किताब की कॉकटेल बनाकर पेश जरूर कर सकते हैं। जी हां, फेसबुक वही कॉकटेल तो है, जहां हर चेहरा एक खुली किताब है।
स्कूल कॉलेज में कॉपी किताबें होती थीं, उनके पन्ने होते थे। फेसबुक एक ऐसी चेहरे वाली किताब है, जिसमें चेहरों वाले पन्ने ही पन्ने हैं। किसी का भी चेहरा निकालो, और पढ़ना शुरू कर दो। हुई ना यह चेहरों वाली किताब। ।
किसी के लिए यह एक चलता फिरता, घर पोंच वाचनालय है तो किसी के लिए एक छापाखाना। यहां कहीं खबरें बिखरी हैं तो कहीं गप्पा गोष्ठी और साहित्य विमर्श हो रहा है।
यहां अभ्यास मंडल भी है और संसद का शून्य काल भी।
किसी ने अपने घर में ताला लगा रखा है तो कहीं प्रवेश निषेध है। सबसे बड़ी खूबी इसमें यह है कि यह 24×7 मुक्त विश्वविद्यालय यानी एक ओपन यूनिवर्सिटी है। कुछ लोग यहां पढ़ने पढ़ाने, तो कुछ टाइम पास करने भी आते हैं। ।
कितनी किताबें, कितने पन्ने और कितने चेहरे ! यहां हर चेहरा कुछ कहता है। एक दूसरे के सुख दुख में शामिल होता है। वह यहां अपनी कहता है, तो दूसरों की सुनता भी है। हंसता, मुस्कुराता, खिलखिलाता है। आज अगर मुकेश होते तो शायद वे भी यही गुनगुनाते ;
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
श्री संजय भारद्वाज
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही💥
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈