मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आंधळा ☆ श्री रवींद्र सोनावणी

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ आंधळा ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

 आंधळा होतास मनुजा, आजही तू आंधळा,

पाऊले चंद्रावरीं, पण तू मनाने पांगळा ||धृ||

 

वास्तवाशी खेळता तू, आंधळी कोशिंबीरी,

अंधश्रद्धा जोजवितो, आपल्या मनमंदीरी,

चालल्या वाटा पुढे, अन तूच मागे चालला  ||१ ||

 

भूवरी ग्रह तारकांची, झेलूनी तू सावली,

धरुनिया वेठीस त्यांना, मांडितो तू कुंडली,

देव दैवा शोधणारा, तू कसा रे वेंधळा?||२||

 

सोडूनी वाटा रूढींच्या, जाऊ या क्षितिजाकडे,

सप्तपाताळात गाडू , अंधश्रध्देचे मढें,

जोडूनी नाते भ्रमाशी, तू कशाला थांबला?||३||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लक्ष्मण रेषा ☆ कवयित्री पद्मा गोळे

? कवितेचा उत्सव ?

☆ लक्ष्मण रेषा ☆ कवयित्री पद्मा गोळे ☆ 

सीतेपुढे  एकच ओढली रेषा

लक्ष्मणाने

तिने ती ओलांडली

आणि झाले

 रामायण

आमच्या पुढे दाही दिशा

लक्ष्मंणरेषा

ओढाव्याच लागतात

रावणांना सामोरे जावेच लागते

एवढेच कमी असते

कुशीत घेत नाही

भुई दुभंगून.

 कवयित्री पद्मा गोळे

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 89 – आनंदाने नाचू या ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 89 – आनंदाने नाचू या ☆

 

आनंदाने नाचू या।

खूप खूप मज्जा करू या।।धृ।।

 

आज शाळेला सुट्टी लागली।

झिलमिल दिव्यांची दिवाळी आली।

दोस्त सारे जमवू या।।१।।

 

दिव्या दिव्यांनी ज्योत पेटवू।

रांगोळ्यांनी अगण सजवूं ।

आकाशी कंदील लावू या।।२।।

 

तेल, सुगधी उटणे लावू।

मोती साबण अगं ण  लावू।

नवीन कपडे घालू या।।३।।

 

सुंदर तोरण दारा लावू।

मातीचे रे किल्ले बनवू।

लक्ष्मी पुजन करू या।।४।।

 

चकली करंज्या शकंरपाळी।

चिवडा लाडू पुरण पोळी।

छान छान फराळ खाऊ या ।।५।।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आठवणीतील शाळा ☆ सौ .कल्पना कुंभार

सौ .कल्पना कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ आठवणीतील शाळा ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

आठवणीतील शाळा

आज आठवणीतच भरली

घंटा वाजू लागता

वर्गातील रेलचेल वाढली..

 

भेटले सगळे सवंगडी

त्याच हसऱ्या चेहऱ्याने..

किलबिलाट सुरू झाला

भिजले क्षण आनंदाने..

 

किती निरागस होते ते दिवस

आता समजतंय..

बालपणच चांगलं होतं

हे पुरतं उमजतय..

 

गुरफटले गेलोय आता सगळेच

आभासी जगात..

पुन्हा जाऊन बसता येईल का

मित्रांसमवेत  त्याच वर्गात..??

 

© सौ .कल्पना कुंभार

?मनकल्प ?

इचलकरंजी

मोबाईल नंबर : 9822038378

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 113 – भावगंध…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 113 – विजय साहित्य ?

☆ भावगंध…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

पांडुरंग सदाशिव

साने कुलोत्पन्न मूर्ती

साहित्याने जोपासली

देशभक्ती आणि स्फूर्ती……!

 

जन्म दिनी आज वाहे

आठवांची शब्द माला

देण्या विचार साधना

जन्म गुरूजींच्या झाला….!

 

कर्मभूमी खान्देशची

संस्था आंतर भारती

अभिजात साहित्याचे

साने गुरुजी सारथी……!

 

बाल मनावर केली

संस्कारांची रूजवात

आई श्यामची नांदते

प्रत्येकाच्या अंतरात….!

 

जातीभेद, अस्पृश्यता

घणाघाती केले वार

भूमिगत होऊनीया

केला स्वातंत्र्य प्रचार…..!

 

गोष्टी अमोल लिहिल्या

पत्रे श्यामची गाजली

मुले धडपडणारी

हाक कर्तव्याची भली…..!

 

सोन्या मारुती,आस्तिक

क्रांती, इस्लामी संस्कृती

सती,संध्या त्रिवेणीने

केली विश्वात जागृती…..!

 

स्वप्न आणि सत्य कथा

शेला रामाचा विणला

मानवांचा इतिहास

अंतरंगी त्या भिनला….!

 

केले चरीत्र लेखन

हिमालय विचारांचे

स्वर्गातील माळ शब्दी

दिले ज्ञान गीतांचे…….!

 

गोष्टीरूप विनोबाजी

सोनसाखळीचे रंग

तत्त्वज्ञानी हळवेला

वास्तवाचा भावगंध…..!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गंध अक्षरांचा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ गंध अक्षरांचा… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

आली अक्षरे जीवनी गंध रानीवनी गेला

बंध जुळती रेशमी पांघरला जणू शेला

नाती मुलायम किती जणू प्राजक्त बहरे

अक्षरांशी जडे नाते असे नाजुक गहिरे…

 

अक्षरांच्या कुंदकळ्या रातराणी बहरते

जाईजुई तावावर अलगद उतरते

कोरांटीची शुभ्र फुले जणू अक्षरे माळते

पिवळी पांढरी शेवंती रोज मला मोहवते ..

 

दरवळ केवड्याचा माझ्या अक्षरांची कीर्ति

मोतीदाणे झरतात अशी अक्षरांची प्रीती

अनंताचे अनमोल फुल उमलते दारी

रोज घालते जीवन माझ्या अक्षरांची झारी …

 

लाल कर्दळ बहरे चाफा मनात गहिरा

मांडवावर दारात मधुमालती पहारा

गुलाबाच्या शाईने मी कमलाच्या पानांवर

उतरतात अक्षरे पहा रोज झरझर…

 

वर्ख शाईने लावते मोती दाणे हिरेमोती

झोपाळ्यावर अंगणी माझी अक्षरेच गाती

बाळगोपाळांच्या मुखी केली अक्षर पेरणी

गंध आला अक्षरांना दरवळली हो गाणी…

 

काना कोपऱ्यात गेली जणू फुलला पळस

गुलमोहराचा टीळा केशराचा तो कळस

निशिगंध नि मोगरा माझ्या अक्षरांची रास

रोज घालते ओंजळ तुम्हासाठीच हो खास …

 

© प्रा.सौ.सुमती पवार 

नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 99 – कॅनव्हास…. ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #99  ?

☆ कॅनव्हास…. 

मी कॅनव्हास वर अनेक सुंदर

चित्र काढतो….

त्या चित्रात. . मला हवे तसे

सारेच रंग भरतो…

लाल,हिरवा,पिवळा, निळा

अगदी . . मोरपंखी नारंगी सुध्दा

तरीही

ती.. चित्र तिला नेहमीच अपूर्ण वाटतात…

मी तिला म्हणतो असं का..?

ती म्हणते…,

तू तुझ्या चित्रांमध्ये..

तुला आवडणारे रंग सोडून,

चित्रांना आवडणारे रंग

भरायला लागलास ना. .

की..,तुझी प्रत्येक चित्रं तुझ्याही

नकळत कँनव्हास वर

श्वास घ्यायला लागतील…

आणि तेव्हा . . .

तुझं कोणतही चित्र

अपूर्ण राहणार नाही…!

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आधीच आलिंगन द्या…. कवी : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

आधीच आलिंगन द्या…. कवी : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

बॉडी डेड होण्या आधीच आलिंगन द्या

कवी : प्रा.विजय पोहनेरकर

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू

डोक्यात राख भरल्यावर

फुटणार कसं हसू ?

 

अहंकार बाळगू नका

भेटा बसा बोला

मेल्यावर रडण्यापेक्षा

जिवंतपणी बोला

 

नातं आपलं कोणतं आहे

महत्वाचे नाही

प्रश्न आहे कधीतरी

गोड बोलतो का नाही ?

 

चुकाच शोधत बसाल तर

सुख मिळणार नाही

चूक काय बरोबर काय

कधीच कळणार नाही

 

दारात पाय ठेऊ नको

तोंड नाही पहाणार

खरं सांगा असं वागून

कोण सुखी होणार ?

 

तू तिकडे आम्ही इकडे

म्हणणं सोपं असतं

पोखरलेलं मन कधीच

सुखी होत नसतं

 

सुखाचा अभास म्हणजे

खरं सुख नाही

आपलं माणूस आपलं नसणे

यासारखे दुःख नाही

 

नातं टिकलं पाहिजे असं

दोघांनाही वाटावं

कधी गायीने कधी वासराने

एकमेकाला चाटावं

 

तुमची काहीच चूक नाही

असं कसं असेल

पारा शांत झाल्यावरच

सत्य काय ते दिसेल

 

ठीक आहे चूक नाही

तरीही जुळतं घ्या

बॉडी डेड होण्या आधीच

आलिंगन द्या

 

स्मशानभूमीत चांगलं बोलून

काय उपयोग आहे

जिवंतपणी कसे वागलात

जास्त महत्वाचं आहे

 

माझ्या कवितेत कोणतंही

तत्वज्ञान नाही

तुम्ही खुशाल म्हणू शकता

कवीला भान नाही

 

ठीक आहे तुमचा आरोप

मान्य आहे मला

माझं म्हणणं एवढंच आहे

वाद नको बोला

 

कवी : प्रा.विजय पोहनेरकर

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसुमनांजली: श्रद्धांजली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

⭐ शब्दसुमनांजली ? श्रद्धांजली ! ? ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

लखलखता सूर्य सुरांचा

आज अस्तास गेला,

ताला सुरांचा खजिना

सारा रिता करून गेला !

 

झाले पोरके सप्तसूर

झाली संगीतसृष्टी पोरकी,

सोडून जाता गानसरस्वती

झाली संवादिनीही मुकी !

 

उभे ठाकले यक्ष किन्नर

स्वागता स्वर्गाच्या दारी,

हात जोडूनि उभे गंधर्व

येता स्वरसम्राज्ञीची स्वारी !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

०६-०२-२०२२

संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसुमनांजली: स्वरलतास श्रद्धांजली ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दसुमनांजली: स्वरलतास श्रद्धांजली ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

शब्द भावना दाटल्या,

 काहूर माजले अंतरंगी!

सोडून गेली काया ,

 लताचे सूर राहिले जगी!

 

स्वर लता होती ती ,

 दीनानाथांची कन्या !

सूर संगत घेऊन आली,

 या पृथ्वीतलावर गाण्या!

 

जरी अटल सत्य होते,

 जन्म-मृत्यूचे चक्र !

परी मनास उमजेना,

 कशी आली मृत्यूची हाक!

 

जगी येणारा प्रत्येक,

  घेऊन येई जीवनरेषा!

त्या जन्ममृत्यूच्या मध्ये,

 आंदोलती आशा- निराशा!

 

मृत्यूचा अटळ तो घाला,

 कधी नकळत घाव घाली!

कृतार्थ जीवन जगता जगता,

  अलगद तो उचलून नेई !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print