डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय आठवा — अक्षरब्रह्मयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

।। अथाष्टमोऽध्याय: ।।

अर्जुन उवाच :

किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।

अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते ।।१।।

कथित अर्जुन

केशवा कथिले मज ब्रह्म अध्यात्म कर्म आहे काय

अधिदैव कशाला म्हणताती अधिभूत आहे काय ॥१॥

*

अधियज्ञ: कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन ।

प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभि: ।।२।।

*

अधियज्ञ कोण केशवा वास्तव्य देही कसे तयाचे

अंतःकाळी युक्तचित्त पुरुषा ज्ञान होते कसे तुमचे ॥२॥

*

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।

भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञित: ।।३।।

*

परब्रह्म अविनाशी स्वरूपस्थिती अध्यात्म नाव

जीवभावा निर्मितो विसर्ग त्याग कर्म तयाचे नाव ॥३॥

*

अधिभूतं क्षरो भाव: पुरुषश्चाधिदैवतम् ।

अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर ।।४।।

*

उत्पत्ती-नाश बंध जयासी जीव ते अधिभूत

देहात जीव अधिदैव तर मी अधियज्ञ कायेत ॥४॥

*

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।

य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशय: ।।५।।

*

देहत्याग समयी जो करी माझे स्मरण

निःसंशये तो होत मम स्वरूपी विलीन ॥५॥

*

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।

तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावित: ।।६।।

*

अंतकाळी जागृत ज्या भावना मनी

त्यांचीच प्राप्ती  तया देहास त्यागुनी

जीवनभर जयांचे सदैव करितो चिंतन 

अखेरच्या क्षणी त्यासी तयांचे स्मरण ॥६॥

*

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च ।

मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ।।७।।

*

जाणूनी वर्म मतीस पार्था करी माझे स्मरण

करशील प्राप्त मम करोनी मनप्रज्ञा मम अर्पण ॥७॥

*

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना ।

परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ।।८।।

*

भगवद्ध्यान अभ्यासपूर्ण योग अर्जुन 

एकाग्र चित्त मम ठायी माझेची चिंतन 

दिव्य पुरुषाप्रती होता एकरूप ध्यान

मजसी प्राप्त तो खचित हेचि विश्वज्ञान ॥८॥

*

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्य: ।

सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमस: परस्तात् ।।९।।

*

प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।

भ्रूवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ।।१०।।

*

सर्वज्ञ अनादि सकल नियंता अचिंत्यस्वरूप

अविद्यातीत तमारी आदित्यवर्ण प्रकाशरूप 

सूक्ष्मात सूक्ष्म असुनी धारक-पोषक सर्वांचा

सदैव करितो स्मरण जो अशा शुद्ध परमात्म्याचा

आज्ञाचक्रे सुस्थापित अंतकाले योगे प्राणाला

निरुद्धचित्ते करित तो प्राप्त दिव्य परमात्म्याला ॥९,१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments