मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आकाशझुला… श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
सुश्री विभावरी कुलकर्णी
अल्प परिचय
पुणे महानगर पालिकेच्या शाळेत ३७ वर्षे प्राथमिक शिक्षिका व मुख्याध्यापक पदावरून २०२१ साली सेवा निवृत्त. सेवेत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नवनवीन कल्पना अमलात आणल्या. विविध प्रशिक्षणात मार्गदर्शन केले.
रेकी मास्टर असून मेडिटेशन व समुपदेशन करीत असते.
कलश मासिकात लेख व कविता प्रसिद्ध झाले आहेत.
विविध माध्यमातून समाजकार्य सुरू असते.
पुस्तकावर बोलू काही
☆ आकाशझुला... श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
निखळ वाचनाचा आनंद घ्या...
विश्वकर्मा प्रकाशन, पुणे यांनी विश्वास देशपांडे यांचं 'आकाशझुला' हे पुस्तक प्रकाशित केलंय . या पुस्तकात विश्वास देशपांडे यांनी विविध विषयावर हलक्याफुलक्या भाषेत केलेलं ललित लेखन असलेले एकूण ५३ विविध लेख वाचायला मिळतात. सगळे लेख मनाला आनंद देणारे असे विविध विषयांवरचे आहेत. लेखकाची भाषा ओघवती, साधी सोपी आहे. कुठेही भाषेचं किंवा शब्दांचं अवडंबर नाही. त्यामुळे वाचताना निखळ आनंद मिळतो. प्रत्येक लेख अगदी दीड ते दोन पानांचा. साधारणपणे तीन मिनिटात वाचून होणारा. हे सरांचे दुसरे पुस्तक आहे. आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या पुस्तकातील कोणतेही पान काढून आपण वाचू शकतो.
सरांचे अनुभव विश्व समृद्ध आहे हे वाचताना विशेष जाणवते....