मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #156 ☆ संस्कार सावली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 156 – विजय साहित्य ?

☆ संस्कार सावली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(4 जानेवारी – कै सिंधुताई सापकाल स्मृतीदिवस दिना निमित्त)

अनाथांची माय

करुणा सागर

आहे भोवताली

स्मृतींचा वावर…!

 

ममतेची माय

आदर्शाची वाट

सुख दुःख तिच्या

जीवनाचा घाट..!

 

परखड बोली

मायेची पाखर

आधाराचा हात

देतसे भाकर…!

 

जगूनीया दावी

एक एक क्षण

संकटाला मात

झिजविले तन…!

 

पोरकी जाहली

माय ही लेखणी

आठवात जागी

मूर्त तू देखणी…!

 

दु:ख पचवीत

झालीस तू माय

संस्कार सावली

शब्द दुजा नाय..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १३ (आप्री सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १३ (आप्री सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १३ (आप्री सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – आप्री देवतासमूह 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बाराव्या सूक्तात मधुछन्दस वैश्वामित्र या ऋषींनी अग्निदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री

सुस॑मिद्धो न॒ आ व॑ह दे॒वाँ अ॑ग्ने ह॒विष्म॑ते । होतः॑ पावक॒ यक्षि॑ च ॥ १ ॥

यज्ञामध्ये अग्निदेवा हवी सिद्ध जाहला

प्रदीप्त होऊनी आता यावे स्वीकाराया हविला

हे हविर्दात्या सकल देवता घेउनी सवे यावे 

पुण्यप्रदा हे  अमुच्या यागा पूर्णत्वासी न्यावे ||१|| 

मधु॑मन्तं तनूनपाद्य॒ज्ञं दे॒वेषु॑ नः कवे । अ॒द्या कृ॑णुहि वी॒तये॑ ॥ २ ॥

प्रज्ञानी हे अग्निदेवा स्वयंजात असशी

अर्पण करण्या हवीस नेशी देवांच्यापाशी

मधुर सोमरस सिद्ध करुनिया यज्ञी ठेविला

यज्ञा नेवूनी देवतांप्रति सुपूर्द त्या करण्याला ||२||

नरा॒शंस॑मि॒ह प्रि॒यम॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये । मधु॑जिह्वं हवि॒ष्कृत॑म् ॥ ३ ॥

मधुर अतिमधुर जिव्हाधारी हा असा असे अग्नी

अमुच्या हृदया अतिप्रिय हा असा असे अग्नी

स्तुती करावी सदैव ज्याची असा असे अग्नी

पाचारण तुम्हाला करितो यज्ञा या हो अग्नी ||३||

अग्ने॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ दे॒वाँ ई॑ळि॒त आ व॑ह । असि॒ होता॒ मनु॑र्हितः ॥ ४ ॥

आम्हि अर्पिल्या हवीस अग्ने देवताप्रती नेशी

तू तर साऱ्या मनुपुत्रांचा हितकर्ता असशी

सकल जनांनी तुझ्या स्तुतीला आर्त आळवीले

प्रशस्त ऐशा रथातुनी देवांना घेउनी ये ||४||

स्तृ॒णी॒त ब॒र्हिरा॑नु॒षग्घृ॒तपृ॑ष्ठं मनीषिणः । यत्रा॒मृत॑स्य॒ चक्ष॑णम् ॥ ५ ॥

लखलखत्या दर्भांची आसने समीप हो मांडा

सूज्ञ ऋत्विजांनो देवांना आवाहन हो करा

दर्शन घेऊनिया देवांचे व्हाल तुम्ही धन्य 

त्यांच्या ठायी दर्शन होइल अमृत चैतन्य ||५||

वि श्र॑यन्तामृता॒वृधो॒ द्वारो॑ दे॒वीर॑स॒श्चतः॑ । अ॒द्या नू॒नं च॒ यष्ट॑वे ॥ ६ ॥

उघडा उघडा यज्ञमंडपाची प्रशस्त द्वारे 

सिद्ध कराया यागाला उघडा विशाल दारे

त्यातुनि बहुतम ज्ञानी यावे यज्ञ विधी करण्या

पवित्र यज्ञाला या अपुल्या सिद्धीला नेण्या ||६||

नक्तो॒षासा॑ सु॒पेश॑सा॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये । इ॒दं नो॑ ब॒र्हिरा॒सदे॑ ॥ ७ ॥

सौंदर्याची खाण अशी ही निशादेवीराणी

उषादेवीही उजळत आहे सौंदर्याची राणी

आसन अर्पाया दोघींना दर्भ इथे मांडिले

पूजन करुनी यज्ञासाठी त्यांसी  आमंत्रिले ||७|| 

ता सु॑जि॒ह्वा उप॑ ह्वये॒ होता॑रा॒ दैव्या॑ क॒वी । य॒ज्ञं नो॑ यक्षतामि॒मम् ॥ ८ ॥

दिव्य मधुरभाषी जे सिद्ध अपुल्या प्रज्ञेने 

ऋत्विजांना हवनकर्त्या करितो बोलावणे

पूजन करितो ऋत्विग्वरणे श्रद्धा भावाने

हवन करोनी या यज्ञाला तुम्ही सिद्ध करावे ||८||

इळा॒ सर॑स्वती म॒ही ति॒स्रो दे॒वीर्म॑यो॒भुवः॑ । ब॒र्हिः सी॑दन्त्व॒स्रिधः॑ ॥ ९ ॥

यागकृती नियमन करणारी इळा मानवी देवी

ब्रह्मज्ञाना पूर्ण जाणते सरस्वती देवी

त्यांच्या संगे सौख्यदायिनी महीधरित्री देवी 

आसन घ्यावे दर्भावरती येउनीया त्रीदेवी ||९|| 

इ॒ह त्वष्टा॑रमग्रि॒यं वि॒श्वरू॑प॒मुप॑ ह्वये । अ॒स्माक॑मस्तु॒ केव॑लः ॥ १० ॥

विश्वकर्म्या सर्वदर्शी तुम्ही सर्वश्रेष्ठ

केवळ अमुच्यावरी असावी तुमची माया श्रेष्ठ

अमुच्या यागा पावन करण्या तुम्हास आवाहन

यज्ञाला या सिद्ध करावे झणी येथ येऊन ||१०|| 

अव॑ सृजा वनस्पते॒ देव॑ दे॒वेभ्यो॑ ह॒विः । प्र दा॒तुर॑स्तु॒ चेत॑नम् ॥ ११ ॥

वनस्पतिच्या देवा अर्पण देवांसी हवि  करी

प्रसन्नतेच्या त्यांच्या दाने कृतार्थ आम्हा करी 

यजमानाला यागाच्या या सकल पुण्य लाभो

ज्ञानप्राप्ति होवोनीया तो धन्य जीवनी होवो ||११||

स्वाहा॑ य॒ज्ञं कृ॑णोत॒नेन्द्रा॑य॒ यज्व॑नो गृ॒हे । तत्र॑ दे॒वाँ उप॑ ह्वये ॥ १२ ॥

यजमानाच्या गृहात यज्ञा इंद्रा अर्पण करा

ऋत्वीजांनो यज्ञकर्त्या प्रदान पुण्या करा 

सर्व देवतांना आमंत्रण यज्ञी साक्ष करा

देवांना पाचारुनि यजमानाला धन्य करा ||१२|| 

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.

https://youtu.be/U2ajyRxxd-E

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 13 Marathi Geyanuvad :: ऋग्वेद मंडळ १ सुक्त १३ मराठी गेयानुवाद

Rugved Mandal 1 Sukta 13 Marathi Geyanuvad :: ऋग्वेद मंडळ १ सुक्त १३ मराठी गेयानुवाद

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #142 ☆ संत जनाबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 142 ☆ संत जनाबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

गोदावरी तीरावर

गंगाखेड जन्मगाव

दमा करूंडाची लेक

जनाबाई तिचे नाव. . . . ! १

 

दामाशेट शिंप्याकडे

जीवनास घाली टाके

झाली नामयाची  दासी

सार्थ अभिमान दाटे. . ! २

 

ओवी आणि अभंगात

जनाबाई जाणवते

घरा घरातली बाई

पहा दळण दळते…! ३

 

वात्सल्याची जणू ओवी

त्यागी, समर्पण वृत्ती

पूर्ण निष्काम होऊनी

विठू रूजविला चित्ती. . . . ! ४

 

तत्कालीन संतश्रेष्ठ

अभंगात आलंकृत

संत जीवन आढावा

काव्य पदी सालंकृत….! ५

 

प्रासादिक संकीर्तन

कधी देवाशी भांडण

संत जनाबाई करी

सहा रिपूंचे कांडण…! ६

 

संत सकल गाथेत

ओवी अभंगाचे देणे

संत जनाबाई जणू

काव्य शारदेचे लेणे…! ७

 

जनाबाई अभंगांने

मुक्तेश्वरा मिळे स्फूर्ती

भाव भावना निर्मळ

साकारती भावमूर्ती…! ८

 

बोली भाषा ग्रामस्थांची

जनाबाई वेचतसे

विठू तुझ्या दालनात

सुख दुःख सांगतसे….! ९

 

साडे तीनशे अभंग

कृष्णजन्म थाळीपाक

प्रल्हादाच्या चरीत्राने

दिली  ईश्वराला हाक. . . . ! १०

 

हरीश्चंद्र आख्यानाचा

आहे  आगळाच ठसा

बालक्रीडा अभंगात

जना पसरते पसा. . . . ! ११

 

द्रौपदीचे स्वयंवर

अभंगाने दिली कीर्ती

मुक्तेश्वर नाथनातू

तया लाभली रे स्फूर्ती. . . . ! १२

 

नामदेव गाथेमध्ये

जनाबाई एकरूप

अभंगात  भक्तीभाव

विठ्ठलाचे निजरूप.. . ! १३

 

परमार्थ वेचियेला

संत विचारांचा ठेवा

नामदेवा केले गुरू 

केली पांडुरंग सेवा …! १४

 

आषाढाची त्रयोदशी

पंढरीत महाद्वारी

समाधीस्त झाली जना

करे अंतरात वारी…! १५

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेच्या उत्सव ☆ निरोप देताना… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

? कवितेच्या उत्सव ?

☆ निरोप देताना… ☆ सौ. जयश्री पाटील ☆

वर्षा मागून सरतील वर्षे

सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर

रात्री मागून येईल पहाट

नित्य जीवनाच्या रहाटावर

 

निरोप देता सरत्या वर्षाला

किंतु परंतु मनी न राहावा

करता येईल कोणासाठी

काही विचार हा मनी यावा

 

आठवणींना जपून ठेवत

विसरून सारे झाले गेले

अनुभवांच्या आधारावर

भविष्याचेच बांधू इमले

 

चाहूल नवीन वर्षाची

तयारी करू स्वागताची

क्षणभर वळून मागे आता

फळी उभारू माणुसकीची

 

शिकवून गेले सारे सारेजण

सकारात्मकता मनी ठेवून

इच्छाशक्तीची उंच भरारी

नव्या आशेचे पंख लावून

 

© सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तू तर आनंदाची लकेर… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– तू तर आनंदाची लकेर – ? ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

माथी नाही छप्पर

नाही विसावा नाही घर

खळखळते हास्य तुझे

मजसाठी तू आनंदाची लकेर । १ ।

सपसप चालती कर

झपझप चालती पाय

निर्झरासम गुंजन तुझे

मजसाठी तू आनंदाची लकेर । २ ।

माथ्यावरी कष्टाची पाटी

वणवण भाळी पोटासाठी

डोळे तुझे जणू भ्रमर

मजसाठी तू आनंदाची लकेर । ३ ।

नाही गिरवले मी अक्षर

तरी असेन तुजसाठी तत्पर

करेन तुज मी साक्षर

मजसाठी तू आनंदाची लकेर । ४ ।

चित्र साभार –सौ. दीपा नारायण पुजारी

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी, फोन.नं. ९६६५६६९१४८

दिनांक – १३/१२/२०२२।

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवे वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नवे वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

दिनदर्शिका पाहता-पाहता

वर्ष सरते  डिसेंबर सरता

 

कडु-गोड आठवणींनी

फेर धरला दाट विणींनी

सुख-दु:खाच्या या धाग्यांनी

स्मरण  होई तरल मनी

 

वर्षातील या प्रसंगातुनी

कटुतेलाही ही दूर सारुनी

आठवू गोडी माधुर्यातुनी

आप्त-स्वकिया सवे घेऊनी

 

 निरोप देऊ मोद मानुनी

 ओंजळीतल्या बकुळ फुलांनी

 गंधासह त्या धुंद होऊनी

 गतवर्षाला  मनीच स्मरुनी

 

कालचक्र हे नित स्मरुनी

स्वागतास ही सज्ज होऊनी

वाट  पाहू या अधिर होऊनी

नव वर्षाच्या रम्य क्षणी.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 163 ☆ मनी दाटे हूरहूर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 163 ?

☆ मनी दाटे हूरहूर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 

पक्षी जाता दूरदूर

मनी दाटे हूरहूर

 

चार दिसांसाठी येती

आणि उडुनिया जाती

 

लेक सून नातवंड

स्रोत प्रीतीचे अखंड

 

दूरदेशी राहण्यास

परी नित्य आसपास

 

   असो सुखात कुठेही

मोकळ्या या दिशा दाही

 

विस्तारल्या कक्षा आणि

   घरोघर ही कहाणी

 

मायबाप मायदेशी

पिले उडती आकाशी

 

असे क्षेम  दोन्ही कडे

आनंदच चोहिकडे

 

परी वाटे हूरहूर

परतून जाता दूर

© प्रभा सोनवणे

(३ जानेवारी २०२२)

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सरणारे वर्ष मी” – कविवर्य मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ “सरणारे वर्ष मी” – कविवर्य मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

मी उद्या असणार नाही,

असेल कोणी दूसरे !

मित्रहो सदैव राहो,

चेहरे तुमचे हासरे

 

झाले असेल चांगले,

किंवा काही वाईटही !

मी माझे काम केले,

नेहमीच असतो राईट मी

 

माना अथवा नका मानु,

तुमची माझी नाळ आहे !

भले होओ, बुरे होओ,

मी फक्त “काळ” आहे

 

उपकारही नका मानु,

आणि दोषही देऊ नका !

निरोप माझा घेताना,

गेट पर्यन्त ही येऊ नका

 

उगवत्याला “नमस्कार”,

हीच रीत येथली !

विसरु नका “एक वर्ष”,

साथ होती आपली

 

धुंद असेल जग उद्या,

नव वर्षाच्या स्वागताला !

तुम्ही मला खुशाल विसरा,

दोष माझा प्राक्तनाला

 

शिव्या, शाप, लोभ, माया,

यातले नको काही !

मी माझे काम केले,

बाकी दूसरे काही नाही

 

निघताना “पुन्हा भेटु”,

असे मी म्हणनार नाही !

“वचन” हे कसे देऊ,

जे मी पाळणार नाही

 

मी कोण ?

सांगतो..

“शुभ आशिष” देऊ द्या,

“सरणारे वर्ष” मी,

आता मला जाऊ द्या !!

 

— कविवर्य मंगेश पाडगावकर 

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ क्रांती… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ क्रांती…  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

क्रांतीची ज्वाला असो की

ज्योत मंदशी तेवती –

पाय माघारी न घेणे

हेच दोघी सांगती —

 

ज्वालेत जळती किती समीधा

गणती कधी करता न ये –

त्यानेच परि त्या क्रान्तीला

अंती पहा साफल्य ये —

 

ज्योत त्याहुनी सानुली

तरी काम करते क्रांतीचे –

रुजवते मनामनात

बीज उज्ज्वल प्रगतीचे —

 

सातत्य गतीचे राखते

मन निश्चयाशी बांधते –

ती ज्योत क्रांतीची जपा

मग प्रगती खचितच साधते —

 

विचारात, प्रवृत्तीत आणि

सद् भावातही होवो क्रान्ती –

क्रांतीचा नित हेतू हाच

‘ विश्वात भरूनी राहो शांती‘ —

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संकल्प… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ संकल्प… ☆ सौ राधिका भांडारकर

सरले हे वर्ष मनुजा

स्वागत करुया नववर्षाचे

किती बेरजा किती वजा

क्षण आठवू सुखदु:खाचे..

 

कालचक्र हे अखंड चाले

 पुन्हा  न येते गेली वेळ

झटकू आळस कष्ट करु

जीवनाची फुलवू वेल..

 

ध्यानी असू दे एक तत्व

आयुष्या नसतो लघुमार्ग

नसते सुट्टी ना आराम

यत्ने अंती फुलेल स्वर्ग…

 

करा संकल्प नववर्षाचा

एक कूपी करा रिकामी

सुगंध नवा त्यात भरा

झटकून टाका जे निकामी..

 

नव्या पीढीचे तुम्ही स्तंभ

आण बाळगा सृजनाची

युद्ध नको शांती हवी

जगास द्या हाक  प्रेमाची…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares