सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ क्रांती…  ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

क्रांतीची ज्वाला असो की

ज्योत मंदशी तेवती –

पाय माघारी न घेणे

हेच दोघी सांगती —

 

ज्वालेत जळती किती समीधा

गणती कधी करता न ये –

त्यानेच परि त्या क्रान्तीला

अंती पहा साफल्य ये —

 

ज्योत त्याहुनी सानुली

तरी काम करते क्रांतीचे –

रुजवते मनामनात

बीज उज्ज्वल प्रगतीचे —

 

सातत्य गतीचे राखते

मन निश्चयाशी बांधते –

ती ज्योत क्रांतीची जपा

मग प्रगती खचितच साधते —

 

विचारात, प्रवृत्तीत आणि

सद् भावातही होवो क्रान्ती –

क्रांतीचा नित हेतू हाच

‘ विश्वात भरूनी राहो शांती‘ —

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments