मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संध्याकाळ… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ संध्याकाळ… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

दिशा कोंडल्या,सूर्यही लपला,                  क्षितिजाच्या पाठी

संधिकाल तेजाळून उठला,                        झगमगली सृष्टी

सोनपाऊली हळूच आली,                       सुरेख संध्याकाळ

गळा शोभते तिच्या साजिरी,                   बगळ्यांची माळ

पक्षी फिरले, गुरे परतली,                              हंबरती वासरे

दीप उजळले घराघरातून,                        भक्तीभाव पाझरे

रात्रीसाठी सांज मावळे,                         हृदय किती थोर

मावळतीचे मनात माझ्या,                          निनादती नुपूर

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 209 ☆ धुकं (बारा वर्षापूर्वीचं) ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 209 ?

धुकं (बारा वर्षापूर्वीचं) ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

महाबळेश्वरचा मस्त पाऊस,

तसं महाबळेश्वर कुठल्याही

ऋतूत मस्तच!

 

भर पावसात मुलांनी,

महाबळेश्वरला जायची टूम काढली,

त्यांची इच्छा,

आम्हीही जावं,

त्यांच्या समवेत,

मुलं, सूना, नातवंडं…..

आणि झिम्माड पाऊस!

 

जाणवलं होतं तेव्हाही,

कालचक्र वेगात फिरतंय!

 

 

चिकन रस्सा,गरम घावन….

आणि पाऊस!

आहा ऽऽऽ मस्तच!

 

दुसऱ्या दिवशी पहाटे,

प्रतापगडला जाताना…

सर्वदूर पसरलेलं धुकंच धुकं!

“धुक्यात हरवली वाट”

असंच काहीसं …..

 

अशात ड्रायव्हिंग करणं,

धाडसाचंच!

जीव मुठीत धरून

आम्ही दोघेच!

तरूणाई, शैशव– मस्त मजेत!

 

आयुष्यात अनेकदा,

धुकं अनुभवलं ते महाबळेश्वरातच!

गड चढताना आठवलं होतं  ,

तारूण्यातलं महाबळेश्वर ….

अंहं….हनीमून नाही,

लेकुरवाळी असतानाचं,

कुटुंब कबिल्यासह,

देवीदर्शन!

डोईवर पदर, हातभार बांगड्या!

आणि समोर  साक्षात जगदंबा !!

 

कित्येक वर्षानंतरही…

निशिगंधाच्या मंद सुवासाने

दरवळणारा  तोच गाभारा,

 देवीच्या छायेतली मुलं,सूना,     

 नातवंडं!

 आशिर्वादीत होऊन,

गड उतरताना,

धुकं….पूर्ण नाहीसं झालेलं!

 

तीन पिढ्यांनी अनुभवलेलं,

ते धुरकट धुकं आणि लख्ख उजळणंही…

भर पावसातलं !!!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जन्म आशा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ जन्म आशा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

तुझे ओठ आता थरथरणेही बंद

हे मौन का ,मज सांगशील का ?

जुन्या आठवणीत रमुया त्याच पुन्हा

त्या भाव क्षणांनी पांगशील का ?

किती शब्द जिव्हाळे वचनात बांधले

तेच सूर घेऊन रंगशील का ?

तुझे रुप हसरे दुःख सर्व तारले

तेच सुख जीवनी सांगशील का ?

जळी खळखळ आयुष्य तेच निर्मळ

तीरावरले पक्षी ऊडून गेले

नभी पंख गीतांच्या दंगशील का ?

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #216 ☆ वाच चेहरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 216 ?

वाच चेहरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वाच चेहरा कळेल तेव्हा कोडे आहे

सुटले कोडे म्हणणारे बाताडे आहे

भांडण आणिक तंटा गावी होतच नाही

झुंजीसाठी पुष्ट पाळले रेडे आहे

मी रक्ताच्या थारोळ्यातच पडून होतो

टांगा पलटी फरार झाले घोडे आहे

गरीब घरची उपवर झाली लेक लाडकी

बाप झिजवतो दारोदारी जोडे आहे

लग्न करूनी घरी आणली आम्ही दासी

लोखंडाचे तिला घातले तोडे आहे

मोठे घर अन् पोकळ वासे वापरलेले

श्रीमंतांचे असेच सारे वाडे आहे

नसा नसातुन वीज वाहते नाव काढता

छत्रपतींचे गातो मी पोवाडे आहे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जय जय रामकृष्ण हरी ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– जय जय रामकृष्ण हरी – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

फुलला मोगरा | ज्ञानियाच्या दारी |

सुगंध ईश्वरी | देऊनिया ||१||

मिटूनिया चक्षु  | ध्यान ज्ञानेश्वर |

प्रकटे ईश्वर | ज्ञान योग ||२||

ब्रम्हानंदी लागे | ज्ञानियाची  टाळी |

भावार्थाच्या ओळी | लिहूनिया ||३||

भावार्थ दीपिका | एक एक ओवी |

स्व अनुभवावी | ज्ञानेश्वरी ||४||

कैवल्य पुतळा | झाली ही माऊली |

ज्ञानाची सावली | उद्धारासी ||५||

एक एक ओवी |  अमृता समान |

मराठी सन्मान | मायबोली ||६||

भागवत धर्म  | रचलिया पाया |

समाधीस्त काया | तेजोमय ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 166 – “इधर आँख में थमें नहीं…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत  इधर आँख में थमें नहीं...)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 166 ☆।। अभिनव गीत ।। ☆

☆ “इधर आँख में थमें नहीं...” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

पहुँची उन्हें विदेश, मृत्यु की

खबर, पिता जी की

है पहाड़ दुख का पर दोनों

कहें नहीं जी की

 

बड़ा भाई बोला छोटे से-

इधर जर्मनी में

मिलें छुट्टियाँ बहुत अल्प

छत्तीस महीने में

 

ऐसा करो अभी तुम

भारत-वर्ष स्वयम् जाओ

मैं जाऊँगा माँ के टाइम

समझो बारीकी

 

छोटा बोला ड्यू हैं मेरी

बाइफ की जाँचें

आप अगर घर से आयी

चिट्टी को जो बाँचें

 

कुछ हिदायतें, गर विदेश के

घर में कुछ अड़चन

तो मत आना, शोक सभा

करने को तुम फीकी

 

दोनों ही उधेड़ बुन में थे

जायें ना जायें

पर वे जाना नहीं चाहते

थे क्या बतलायें

 

इतना पैसा फ्लाईट का

बेकार खर्च होगा

चार पाँच महिने घर में

छायेगी तारीकी

 

इधर आँख में थमें नहीं

आँसू बुढ़िया माँ के

ऐसे क्या टूटा करते

सम्बंन्धों के टाँके

 

और अंत में माँ को

दोनों बेटों ने सूचित-

किया-  ” नहीं आसकते

करना तेरहवीं नीकी

©  श्री राघवेन्द्र तिवारी

08-10-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देह माझा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ होरा☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(आनंदकंद) 

माझा अजून माझ्या दिलबर मनात आहे

त्यांच्याच आठवांचे मी गीत गात आहे

 

चंद्रा समान त्याच्या  नाजूक चेह-याचे

हसणे मला जरासे फुलवून जात आहे

 

हरवून मीच माझ्या आलो  प्रकाश वाटा

माझ्या सभोवताली काळोख रात आहे

 

मिरवू कसे कळेना गर्दीत गौरवाच्या

शृंगारली व्यथानी माझी वरात आहे

 

वाहून खूप ओझे गेली थकून गात्रे

पाळून रीत साधी जगणे जगात आहे

 

कापूर मौन माझे आलेय आरतीला

पण ज्योत अंतरीची जळते उरात आहे

 

ओंकार वास्तवाचा घुमतोय आत माझ्या

मिसळून सूर त्याच्या गेला सुरात आहे

 

माझी खरी समाधी मागेच बांधली मी

तेथेच देह माझा रमतो सुखात आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जेजुरीच्या खंडेराया… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

जेजुरीच्या खंडेराया… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

सूडाचा अग्नी कसा विझवायाचा सांग रे

मत्सराचा कंद कसा उपटायाचा सांग रे

आनंदाने जगायची रीत भली दाव रे

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

‘येळकोट येळकोट’ व्हावा सदा गजर

श्रद्धेचा अन् मुक्तीचा मनी व्हावा जागर

‘मी’पणाचा छंद आता मोडूनी काढ रे

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

बिल्वपत्र वाहूनी , भंडाराही उधळू रे

षड् रिपूतून मुक्ती होता जगणे सोने होई रे

सोनेरी या जगण्याची गोडी तूच दाव रे

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

मणीमल्लांपासूनी तारिशी तू अवनी

सत्यधर्मारक्षण्या तू अधर्मा संहारीले

भक्तांसाठी नाना रूपे तूची साकारीले

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

नरजन्मा सार्थककरण्या मार्ग मला दाव रे

चरणी तुझ्या आले आता तूची मज उद्धार रे

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सा  ध  ना ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ सा  ध  ना ! 🩷 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

करा आसनस्थ होऊनी

ॐकाराची ध्यानधारणा,

आजार जाती पळूनी

म्हणती त्या योग साधना !

राहून गुरुकुलात चेले

करती तपश्चर्या रागांची,

गुरुविण कोण दावी वाट

तयांना गान साधनेची ?

वेचून आपले आयुष्य

देती ज्ञान यज्ञा चेतना,

होऊन गेले ज्ञानमहर्षी

ती होती ज्ञान साधना !

वनात करूनी वसती

देवांची करती आराधना,

ऋषि मुनी शिकवून गेले

जी होती तप साधना !

अखंड करूनी वाचन

सोसून कधी आलोचना,

लेखक, कवी करी लेखन

तीच त्याची शब्द साधना !

तीच त्याची शब्द साधना !

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “अस्तित्वाचा जागर…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “अस्तित्वाचा जागर…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

अथांग सागर भवताली

त्यात झोपडी इवली इवली

वाटेवरूनी चालत जावे

वाटे आत्ता याच पाऊली

मन आवरू कशास अवखळ

मिठीत घ्यावे सागर वादळ

आधाराला असेल ना तो 

सागरात एखादा कातळ

 पाय रोवूनी कातळावरी

 विश्वासाने उभे रहावे

 गाजेच्या संगीतासह अन 

 अंगावरती मुरवून  घ्यावे

  संगीतासह गाजचैतन्य

  मुरता देही..  देहच सागर

  चैतन्यमय त्या लाटा ,पाणी,  

  अस्तिवाचा पुरता जागर

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print