मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ त्या देशीचा सुगंध घेवुन… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ त्या देशीचा सुगंध घेवुन… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

त्या देशीचा सुगंध घेवुन, फुलांत इथल्या दरवळतो

झरता झरता घननीळातुन, मातीमधुनी घमघमतो

*

सूर्यफूल मी सूर्याचे अन् चंद्रकमल मी चंद्राचे

असो उन्ह वा असो चांदणे, जीवनगाणे गुणगुणतो

*

मायावी ह्या रानी चकवा, चळतो ढळतो कधी कधी

वणव्यामधुनी मग पतनाच्या, ओघ कांचनी लखलखतो

*

कुणाकुणाला ह्रदयी घ्यावे, हतभाग्यांची काय कमी

उत्तररात्री त्यांच्यासाठी, अश्रू माझा झुळझुळतो

*

किती कुंपणे अवतीभवती, मण मण पायी बेड्याही

तरी सिद्ध मी व्यूह भेदण्या, दिगंत होण्या तळमळतो

*

दावित दावित जगा आरसा, अवचित दिसतो मीच तिथे

आत्मचिंतनी कबीर कोणी, दोहा होवुन घणघणतो!

(हरिभगिनी)

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ या वळणावर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

या वळणावर…  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

उभी आहे मी एका वळणावर..

वाट पुढची‌ अनोळखी!

कशी शोधू मी माझी मला,

झाले मी  तुम्हास पारखी!..१

*

झाली नव्हती मनाची तयारी!

रहावे लागेल तुमच्या विना!

समजूत घालून जगते आहे,

साथ दे रे माझ्या मना!…२

*

सप्तपदी चाललो आपण,

साथ होती जन्मांतरीची!

सात जन्माची गाठ बांधली,

वचने  दिली तू निष्ठेची !..३

*

सोडून गेलात अचानक,

विसर पडला  माझा तुम्हांस !

जग रहाटीस सामोरे जाण्या,

मन करते मी घट्ट आज !..४

*

कठीण आहे वाट पुढची,

समजावते मी मनाला!

तुम्ही पाठीशी आहात माझ्या,

देत आधार थकल्या मनाला!…५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “प्रमोदिनी ही घाली मोहिनी…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– “प्रमोदिनी ही घाली मोहिनी…” – ? ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर☆

फुलूनी आल्या पहा खुळ्या

वेली वरती धुंद कळ्या

वारा येऊन लटके छेडी

गंधाळून गेल्या सगळ्या

*

फूल टपोरे पाना मागे

बहरून आले पहा कसे

प्रमोदिनी ही मोहिनी घाली

चैत्राची चाहूल सांगतसे

*

मल्लिगेस या गुंफुनी केला

वळेसार मी मनमोही

कुरळे कुंतल सळसळणारे

पहा शोभती आरोही

*

वेड लावितो जीवाला

श्वेतरंग भुलवी मजला

ओंजळ भरुनी इरावंतिगे

भगवंताच्या चरणतला

(इरावंतिगे म्हणजे मोगरा (कानडी भाषेत), मल्लिगे म्हणजे मोगरा (कानडी), प्रमोदिनी म्हणजे मोगरा (संस्कृत)) 

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 228 ☆ मॅडम ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 228 ?

☆ मॅडम ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(स्मृति शेष – प्रोफेसर वंदना जोशी, नासिक)

ते काॅलेजचे फुलपंखी दिवस,

 नेहमीच आठवतात,

मॅडम, तुमच्या घरी जागवलेली,

हरतालिका!

कुणी कुणी म्हटलेली गाणी!

माया नं म्हटलेलं,

“आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे “

लक्षात राहिलंय!

मला ते काॅलेज सोडावं लागलं,

मधेच—–

पण तुम्ही भेटत राहिलात,

नंतरही,

कुठल्या कुठल्या कविसंमेलनात!

 

“तू माझी विद्यार्थिनी आहेस,

याचा खूप अभिमान वाटतो “

 असं म्हणायचा नेहमी,

 

मॅडम कविता त्याच काॅलेजात गवसली,

कुठे ? कशी आणि का?

ते सांगायचं मात्र राहून गेलं….

कधीतरी निवांत भेटू….

“काही प्रश्न विचारायचे आहेत”

म्हणालात!

 

“सगळ्या आवडत्या विद्यार्थिनींचं गेट-टुगेदर

घेऊया शिरूरच्या माझ्या “मन्वंतर” बंगल्यात!”

दोन महिन्यांपूर्वीच म्हणालात,

 

आणि अशा कशा निघून गेलात?

न परतीच्या प्रवासाला ?

माझा अर्धवट सोडवलेला पेपर,

मी आता कुणाकडे पाठवू…

तपासायला??

 

परत एकदा,

मी निरुत्तर… अनुत्तीर्णच,

परिक्षा न देताच!!!!

© प्रभा सोनवणे

३० मे २०२३

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कामगार दिन… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ कामगार दिन… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

घाम गाळूनी काम करिशी तू

काय तुला तो दाम मिळे

तुझ्या कारणे जागोजागी 

 इमल्यावर उठती इमले

*

जिथे म्हणून दिसते उत्पादन

तिथे तुझे श्रमदान असे उभारणीला

नव-निर्मितीला तुझ्याविना पूर्णत्व नसे

*

मजल्यावरती चढवून मजले

तुच भिड विशी गगनाला

तुला निवारा झोपडीमध्ये

काय म्हणावे दैवाला

*

तुझ्या श्रमाचे मोल उमगले

शासनास जागृती आली  

कष्टक-यांना अन् मजुरांना

मानाची वंदना दिली

*

तव घामाला गंध गवसला

मिळे प्रतिष्ठा कष्टाला

“कामगार दिन” हा तव गौरव

 “मे” च्या पहिल्या दिवसाला

*

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुटके क्षण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ तुटके क्षण ☆ श्रीशैल चौगुले ☆

हा कागद फाटलेला

कि पतंग तुटलेला

परंतु दोहोत कुठे

माझा स्पंद साठलेला.

*

वाटते जोडावे पान

धागा ओढावा तुटका

वादळासंगे लुटता

कंठ उगा दाटलेला.

*

पुन्हा अक्षरे कोरावी

उंच उडावा पतंग

आशा असते जिंदगी

स्मृती संग भेटलेला.

*

एकटे हसावे मन

तेंव्हा जुन्याच स्पर्शात

तेच जगणे असावे

कुणी भाव काटलेला.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #235 ☆ फसवा गोडवा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 235 ?

☆ फसवा गोडवा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

काजव्यांनो राज्य तुमचे चालवा

चांदण्यांचा मागतो मी जोगवा

*

अंधकाराचे पडूदे पोपडे

छानपैकी रंग लावूया नवा

*

घातले पाणी तिने वृंदावनी

अंतरी माझ्या फुलावा मारवा

*

संयमाने दाह होता सोसला

दूध झाले तापल्यावरती खवा

*

पाहुनी ओसाड धर्ती विनवतो

या धरेला शालू हिरवा नेसवा

*

सत्व आहे भाकरीतच आजही

बेकरी मालात फसवा गोडवा

*

जीवघेणे धर्म आम्ही पोसले

या सनातन धर्म आता वाचवा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आभाळमाया… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– आभाळमाया – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

रखरखते ऊन,

पिलांवर आईची सावली |

स्वतः झळा सोसून,

पिलांचे रक्षण करते माऊली |

*

आई ती आईच असते,

अगणित सोसते कळा |

तक्रार तिच्या अंगी नसते,

मातृत्वाचा जपते लळा |

*

दाही दिशा करते,

चारापाण्यासाठी वणवण |

चोचित साठवते दाणा,

उदरी करत नाही भक्षण |

*

उंच उंच झेप घेते,

जिद्द करते आकाशाशी |

कुठेही असली जगी,

चित्त तिचे पिलांपाशी |

*

स्वर्ग ही ठेंगणा वाटावा,

इतकी आईची आभाळमाया |

जीवात जीव असेपर्यंत,

पिलांसाठी झिजवते काया |

*

आईची थोरवी सांगताना,

शब्दच  पडतात अपुरे |

वासल्य सिंधू, प्रेम स्वरूप,

आईविना जीवन अधुरे |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पडझड… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ पडझड☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

वा-यावरती भरकटलेला पतंग धरणे अवघड आहे

नकाच समजू कधी कुणीही बाब जराशी वरकड आहे

*

सुटले वादळ तुटला परिसर नियंत्रणाचा उपाय सरला

खूप साजवल्या  इमारतीची झाली सगळी पडझड आहे

*

भ्रमात अविरत वावरताना ताल तोलही उरला नाही

दुसरे तिसरे नाही कारण विचारातली  गडबड आहे

*

मीच जगाचा शककर्ताया अशी भावना कशी ठेवता

वा-यावरती विरणारीही उगीच फुसकी बडबड आहे

*

प्रवासातल्या वाटा चुकल्या कळले तेव्हा पडला चकवा

आता सोबत काळजातली सतावणारी धडधड आहे

*

चुकून चुकले आणि हबकले मन झुरणारे छळू लागले

हाती केवळ क्षमायाचना करणारीही धडपड आहे

*

आशादायी असतो मानव संधीचे पण सोने करण्या

पकडायाची नजाकतीने तिला चालली  धडफड आहे

*

काळ यायचा तसाच आला रंग उधळुनी निघून गेला

उदासवाण्या आयुष्याची उरली मागे धडपड आहे

*

गणगोतांचा प्रकाश गेला काळोखाचा पडला विळखा

विसकटलेल्या घरट्यामधल्या व्यर्थ पिलाची फडफड आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 171 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 171 ? 

☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

कृष्णाचिया गावा, मोक्ष आहे खरा

नका वाहू भारा, अन्य भक्ती.!!

*

अनन्य भक्तीचे, वळण असावे

स्व-हित कळावे, ज्याचे त्याला.!!

*

श्रद्धा समर्पावी, फुलवावा मळा

आनंदी सोहळा, प्राप्त करा.!!

*

कवी राज म्हणे, कृष्णानंद हेतू

किंतु नि परंतू, सोडूनि दया.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print