सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 228 ?

☆ मॅडम ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(स्मृति शेष – प्रोफेसर वंदना जोशी, नासिक)

ते काॅलेजचे फुलपंखी दिवस,

 नेहमीच आठवतात,

मॅडम, तुमच्या घरी जागवलेली,

हरतालिका!

कुणी कुणी म्हटलेली गाणी!

माया नं म्हटलेलं,

“आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे “

लक्षात राहिलंय!

मला ते काॅलेज सोडावं लागलं,

मधेच—–

पण तुम्ही भेटत राहिलात,

नंतरही,

कुठल्या कुठल्या कविसंमेलनात!

 

“तू माझी विद्यार्थिनी आहेस,

याचा खूप अभिमान वाटतो “

 असं म्हणायचा नेहमी,

 

मॅडम कविता त्याच काॅलेजात गवसली,

कुठे ? कशी आणि का?

ते सांगायचं मात्र राहून गेलं….

कधीतरी निवांत भेटू….

“काही प्रश्न विचारायचे आहेत”

म्हणालात!

 

“सगळ्या आवडत्या विद्यार्थिनींचं गेट-टुगेदर

घेऊया शिरूरच्या माझ्या “मन्वंतर” बंगल्यात!”

दोन महिन्यांपूर्वीच म्हणालात,

 

आणि अशा कशा निघून गेलात?

न परतीच्या प्रवासाला ?

माझा अर्धवट सोडवलेला पेपर,

मी आता कुणाकडे पाठवू…

तपासायला??

 

परत एकदा,

मी निरुत्तर… अनुत्तीर्णच,

परिक्षा न देताच!!!!

© प्रभा सोनवणे

३० मे २०२३

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments