श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 235 ?

☆ फसवा गोडवा ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

काजव्यांनो राज्य तुमचे चालवा

चांदण्यांचा मागतो मी जोगवा

*

अंधकाराचे पडूदे पोपडे

छानपैकी रंग लावूया नवा

*

घातले पाणी तिने वृंदावनी

अंतरी माझ्या फुलावा मारवा

*

संयमाने दाह होता सोसला

दूध झाले तापल्यावरती खवा

*

पाहुनी ओसाड धर्ती विनवतो

या धरेला शालू हिरवा नेसवा

*

सत्व आहे भाकरीतच आजही

बेकरी मालात फसवा गोडवा

*

जीवघेणे धर्म आम्ही पोसले

या सनातन धर्म आता वाचवा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments