मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुणा थांग लागे कवीच्या मनाचा…? ☆ सुश्री अर्चना देवधर ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ कुणा थांग लागे कवीच्या मनाचा…? ☆ सुश्री अर्चना देवधर ☆

(वृत्त-भुजंगप्रयात, लगागा लगागा लगागा लगागा, अक्षरे-१२,मात्रा-२०)

कुणा थांग लागे कवीच्या मनाचा?

तिथे खेळ रंगे नव्या कल्पनांचा

जशी माउली भोगते जन्मवेणा

कवी सोसतो निर्मितीच्या कळांना

 

जसे लाभती गर्भसंस्कार बाळा

 तसा बुद्धिला भावनांचा उमाळा

कधी शब्दगंगा खळाळून वाहे

परीक्षा कधी ती कवीचीच पाहे

 

निसर्गातली मोहवी दिव्य शोभा

कधी चन्द्र सूर्यातली तेज आभा

कधी रंगतो मंदिरी वा शिवारी

कवी मुक्त व्योमात घेई भरारी

 

कधी दुःखितांच्या व्यथांनी दुखावे

सुखाच्या कधी जाणिवांनी सुखावे

कधी शब्दशस्त्रे खुबीने उगारी

कधी वेदनेच्या झळांना झुगारी

 

कधी वृत्तबंधात बांधून घेतो

कवी मुक्तछंदातही मग्न होतो

कधी श्रावणी धुंद धारात न्हातो

तसा चांदण्याच्या प्रवाहात गातो

 

कवीला मिळे लेखणीचीच दीक्षा

कधी भोगतो हा स्तुती वा उपेक्षा

कवी शारदेचा खरा दास आहे

स्वयंनिर्मितीचा तया ध्यास राहे

 

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गीतांजली..10… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ गीतांजली..10… ☆ सुश्री शोभना आगाशे

(गुरूदेव टागोरांच्या ‘गीतांजली’ या इंग्लिश काव्यसंग्रहातील १०व्या कवितेचे मराठी काव्यरूपांतर)

तू असशी तव भक्तांजवळी

जे असती तव पायांजवळी।

हाकेस त्यांच्या देशी उत्तर

मज भासे तव दर्शन दुस्तर।

वाकुनि करतो तुजला नमना

पाहू न शकतो तुझिया चरणा।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

 

शाल पांघरून विनम्रतेची

सेवा करिसी त्या सर्वांची।

अहंकारी मी करित वल्गना

अधीर तरीही तुला भेटण्या।

तुझिया पाशी कसा येऊ रे

अडला नडला शरण मी नच रे।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

 

तुला भेटण्या आतुर अंतर

मार्ग शोधितो इथे निरंतर।

कसा मी येऊ जिथे तू असशी

शरणागतांसि मार्ग दाविसी।

उन्मत्ताला मार्ग न मिळतो

तुझियापाशी येऊ न शकतो।

चरणांपाशी असती जमले

दीन, दुबळे, भरकटलेले॥

 

षड्रिपूंचा त्याग करुनि

जावे शरण तयालागुनि।

अशाच भक्ता आश्रय देतो

त्यांच्यासाठी जन्मा येतो।

चरणांपाशी असेच जमती

दीन, दुबळे जे अहं त्यागती॥

 

 – सुश्री शोभना आगाशे – ९८५०२२८६५८

 – सुश्री मंजिरी  – ९४२१०९६६११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “आषाढ मेघा…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “आषाढ मेघा…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

बेधुंद बेगुमान कोसळण्यासाठीच थबकलेल्या आषाढमेघा …. 

ये ना रे —- ये,

तुला पाहून मनात दाटलेले भावघनही

तसेच आतुरलेत कोसळायला —–

 

तुझी चाहूल देत भीजपाऊस आल्यापासूनच

क्षितिजाशी ओठंगून तुझी वाट पहाते आहे ….

ही व्याकूळ धरती —–

 

अंधाराला उजेडाचे कोंब फुटावे तसे

मातीच्या गर्भातून उजळू पहाणारे नवचैतन्याचे अंकूर ….

कधीचे खोळंबळेत .. फक्त तुझ्यासाठीच —–

 

वैशाख वणव्यात होरपळलेली , कोमेजलेली सृष्टी

तगमगते आहे दिवस-रात्र ….

तू संजीवनी होऊन येशील म्हणून —–

 

आकाशाला अन स्वतःलाही विसरून धुंवाधार बरसतांना

मनामनातून हवीहवीशी आग जागवशील म्हणून ….

किती मनं आसावली आहेत तुझ्यासाठी —–

 

             ध्यानात ठेव पण इतकेच —-

                कधी उतू नकोस मातू नकोस —-

                  चढूनही जाऊ नकोस फारसा —-

                    कारण – पडशील तेव्हा तुलाही कळणार नाहीये —-

     तू कसा पडलास ते ——-.

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – निरागस शैशव… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– निरागस शैशव… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

निरागस शैशव 

जबाबदारीचे ओझे

खळाळणारे हास्य 

कसे मुखी यायचे ! .. 

शैशवाचे दारच

बंद तिच्या पाठी

मौनात डोळे

बोले काय बोली !.. 

अक्वा बिसलरी

काय असत बाई?

माहिती करून

घ्यायचीही नाही ! .. 

घरासाठी हवंय

हंडाभर  पाणी

सहज मिळेल का ?

सांगता का कोणी ! .. 

जगाच्या  शाळेत 

आम्ही शिकत जातो

आसुसल्या नजरेने

नुसती शाळा पहातो !  .. 

पाटी पेन्सिल वही

स्पर्शास्तव हात

आसुसलेले असतात …. 

.. आणि तसेच आसुसलेले रहातात …… 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 162 – बंध आयुष्याचे ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 162 – बंध आयुष्याचे ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

प्रेम धाग्यांनी विणले

धागेदोरे भावनांचे।

जीवापाड जपले मी

बंध माझ्या आयुष्याचे।

 

आई बाबा, ताई दादा

मऊ तलम ती माया

जीवनाच्या वणव्यात

माय पित्याची ती छाया।

 

गोड कवडसा जणू

मित्र मैत्रीणीचा संग।

दावी प्रतिबिंब खरे

भरी जीवनात रंग।

 

गुरुदेव माऊलीने

वास्तवाचे दिले भान।

ज्ञानामृत पाजूनिया

दिले सर्वस्वाचे दान।

 

कच्चा घागा तो प्रेमाचा

नकळत जुळायचा।

शब्दाविन भाव सारा

नयनात कळायचा।

 

गोड रुसवे फुगवे

इथे भांडणंही गोड।

दोन जीवांना बांधती

कच्चे घागे हे अजोड।

 

साद चिमण्या पिल्लांची

बालपण खुणावते।

तपश्चर्या मायबाची

प्रकर्षाने जाणवते।

 

 

सैल होता घागेदोरे

रितेपण हाता येई।

विसरलो परमेश्वरा

चरणाशी ठाव देई।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपपूजन… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपपूजन… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

  दिवस सरता आषाढाचे,

  सांगता असे अमावस्येने,

  निमित्त हेची दीपपूजेचे,

  कृतज्ञतेचे मनी भाव हे!*

 

  घरोघरी पूजन दीपांचे,

  दीप प्रतीक हो, हे ज्ञानाचे,

  अज्ञानाचा नाश होऊ दे,

  उजळू दे जीवन पतितांचे!

 

 तेजाचे अन् सात्त्विकतेचे,

 पूजन करूया पावित्र्याचे,

  परंपरेचे जतन करावे,

  भान हे ठेवू, संस्कृतीचे!

 

  उणे होऊनी दोष आमुचे,

  सद्गुण आम्हां ठायी यावे,

  आरोग्याचे दान मिळावे,

  ज्ञानामृत जीवनी बरसावे!

©  सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #184 ☆ रूप सावळे सुंदर… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 184 – विजय साहित्य ?

रूप सावळे सुंदर… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

रूपं सावळे सुंदर

उभे आहे विटेवरी

पांडुरंग हरी रूप

ठेवी कर कटेवरी….!

 

नाम संकीर्तनी हरी

माळ तुळशीची गळा

वैष्णवांचा मायबाप

लावी पंढरीचा लळा…!

 

अष्टगंध अबीराने

दिसे खुलूनीया रुप

मत्स्य कुंडले किरीट

मोहवीते निजरूप…!

 

राजा पंढरीचा माझा

मागे रखुमाई राणी

पितांबर आणि शेला

गाई कैवल्याची गाणी….!

 

रूप सावळे सुंदर

कंठी वैजयंती माला

संकटात धावे विठू

सखा वैष्णवांचा झाला..!

 

संत साहित्यात शोभे

विविधांगी पांडुरंग

पहा आषाढीची वारी

विठू दर्शनात दंग….!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ टोमॕटोची जादू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ टोमॕटोची जादू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सुखी संसारात

टोमॕटोची भर

समृध्दीच नांदे

भोजनाने घर.

 

पत्नीचा रुसवा

टोमॕटोचा हार

नको जवाहिरे

आवडिचा सार.

 

काय सांगू बाई

टोमॕटोची किर्ती

गावदेश तृप्त

सत्वस्वाद स्फूर्ती.

 

नाचतच आले

पतीराज एक

वाढदिन शुभ

टोमॕटोचा केक.

 

मस्त-मस्त चीज

अस्वास्थ्य भरुन

टोमॕटोचा चट्टा

दुष्काळ सरुन.

 

शेतकरी खुश

टोमॕटोचा मळा

जावई नवखा

सोनेमुल्य तोळा.

 

पैकी वरदान

मंथनाचे यत्न

टोमॕटोचा कुंभ

नवरस  रत्न.

 

भांडाभांडी खत्म

सांबार रसाळ

शत्रु मित्र झाला

टोमॕटो मिसळ.

                

आता म्हणे धरा

तोच भक्त जाण

टोमॕटोची शेती

घेतलीया आण.

 

सत्तेची पालट

टोमॕटोची जादू

चंचलात राजा

राजकिय साधू.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “बंद करुया दारे….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “बंद करुया दारे….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

बंद करूया दारे सारी इतिहासाची आता।

वर्तमान तरी सारे मिळुनी प्रसन्न करुया आता ।।

 

गुलदस्त्यातच राहू देत ते कसे काय जे घडले।

हद्दपार करू शिक्षणातुनी इतिहासाला आता।।

 

इतिहासाच्या पानोपानी मूर्तिमंत जी स्फूर्ती होती।

त्या पानातुन गळे विकृती गळे दाबण्या आता।।

 

कशास आम्हा हवी संस्कृती धर्म कशाला हवा।

गळे दाबणे गळे कापणे थांबवूया ना आता।।

 

‘जुने जाऊदे मरणा’ करू निर्मिती नवी संस्कृती।

नव्या पिढीची नवी संस्कृती करू निर्मिती आता।।

 

मानव सारे नष्ट कराया समर्थ आहे निसर्ग येथे।

नको त्या तरी पापामध्ये सामिल होऊ आता।।

 

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #170 ☆ शब्द…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 170 ☆ शब्द…! ☆ श्री सुजित कदम ☆

मनाच्या खोल तळाशी

शब्दांची कुजबुज होते…

कागदावर अलगद तेव्हा

जन्मास कविता येते…!

 

शब्दांचे नाव तिला अन्

शब्दांचे घरकुल बनते..

त्या इवल्या कवितेसाठी

शब्दांनी अंगण फुलते…!

 

शब्दांचा श्वास ही होते

शब्दांची ऒळख बनते..

ती कविताच असते केवळ

जी शब्दांसाठी जगते…!

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print