मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ठिपका… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ ठिपका… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

युद्ध लादले जर नियतीने

नियतीशीही झुंजत राहू

अखेरच्या अन् चिंधीलाही

निशाण बनवत फडकत ठेऊ !

 

     आपण ओंजळ.. ते तर सागर

     न्यून कधी हे उरी न जपणे

     झुळझुळ मंजुळ..रौद्र गाज ती

     आपण गावे अपुले गाणे !

 

स्वप्नपंथ हा अग्निपंथही

दाह तरीही साहत राहू

जरी गगन ना कवेत आले

उरि नक्षत्रे तेवत ठेवू !

    

     जीवन ही तर गळकी घागर

     किती भरावी तरी रिती रे

     शापालाही उ:शापाची

     दैव देतसे कधी हमी रे

 

स्वत: पारचे विश्व विलक्षण 

दृश्य विहंगम त्याचे पाहू

रणे  नंदने  तीर्थस्थाने

सारे सारे ह्रदयी घेऊ !

 

     अपुल्यास्तव जे तमात जळले

     त्या दीपांना तारण जीवन

     ज्या ताऱ्याचा वसा घेतला

     अवघे जीवन त्यास समर्पण !

      

चिरंतनाचा गंध मृण्मया

देता देता विरून जाऊ

नक्षत्रांच्या रांगोळीचा

जाता जाता ठिपका होऊ !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #141 ☆ संत मुक्ताबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 141 ☆ संत मुक्ताबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

ज्ञाना निवृत्ती सोपान

बंधू संत मुक्ताईचे

सांप्रदायी प्रवर्तक

बाळकडू अध्यात्माचे…! १

 

आदिमाता मुक्ताईस

ब्रम्हचित्कलेचा मान

मंत्र सोहम साधना

ज्ञानदेव देई ज्ञान…! २

 

करी मुक्ता उपदेश

गुरू बंधू ज्ञानदेवा

केले लेखन प्रवृत्त

दिला ज्ञानमयी ठेवा…! ,

 

बेचाळीस रचनांनी

सजे ताटीचे अभंग

मुक्ता बाई योग राज्ञी

विश्व कल्याणात दंग..! ४

 

ज्ञानेश्वर संवादाने

दिली सनद मानाची

झाली प्रकाश मुक्ताई

ज्ञानगंगा ज्ञानेशाची…! ५

 

भक्त श्रेष्ठ मुक्ताबाई

प्रबोधन गुणकारी

ताटीच्याच अभंगाने

झाली संकट निवारी…! ६

 

गुरू विसोबा खेचर

संकीर्तनी विवेचन

संतश्रेष्ठ सहवास

अध्यात्मिक प्रवचन…! ७

 

योगीराज चांगदेवे

मुक्ताईस केले  गुरू

पासष्ठीचा अर्थबोध

गुरू शिष्य नाते सुरू…! ८

 

अंगाईच्या अभंगांने

मुक्ता झाली रे मुक्ताई

ज्ञानबोध हरिपाठ

अनुबंध मुक्ताबाई…! ९

 

नाथ संप्रदायातील

पहिल्याच सद्गुरू

मुक्ताबाई सांगतसे

उपदेश मनीं धरूं…! १०

 

मुक्ताबाई मुक्तीकडे

करी जीवन प्रवास

संत साहित्य प्रेरक

लाभे संत सहवास…! ११

 

गुरू गोरक्षनाथांचा

झाला कृपेचा वर्षाव

संजीवन अमृताचा

पडे सर्वांगी प्रभाव..! १२

 

समाधीचे आले अंग

मुंगी उडाली आकाशी

धन्य धन्य मुक्ताबाई

झेप घेई अवकाशी…! १३

 

जळगावी तापीतीरी

मुक्ता स्वरूपा कारात.

वैशाखात दशमीला

मुक्ता मुक्तीच्या दारात…! १४

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हरित स्वप्न ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे 

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– हरित स्वप्न – ?सौ. अमृता देशपांडे 

उतरुनि पर्णसंभार सारा

व्यक्त झालो मुक्त मी

हा नसे की अंत माझा

ना कुणी संन्यस्त मी

हे निसर्गी बांधलेपण

सर्वस्व धरेला वाहिले मी

ऋतुजेच्या उदरात पेरला

नवचैतन्याचा थेंब मी

ढाळुन सारे पर्णपंख हे

आज मोकळा त्रयस्थ मी

ऋतुचक्राच्या पुढच्या पानी

हरित स्वप्न हे अंतर्यामी

थेंबातुन त्या कोंब फुटुनिया

फिरून बहरे कृतज्ञस्थ मी

पर्णलेकरे लेवुन अंगी

लेकुरवाळा गृहस्थ मी.

(चित्र साभार – सौ अमृता  देशपांडे)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्ञानदान… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्ञानदान… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(प्रयत्नः अनुष्टुप छंद)

या मुलांनो शब्दांनीच

गिरवू अक्षरे नित्य

शिकूया ज्ञानमंदीरी

संस्कारादी सदा सत्य

या मुलांनो……..   १

 

सरस्वती सर्वा देई

वरदान विद्या धन

ज्ञान हेची जन्मा भाग्य

गुरु सेवा शिक्षा ऋण

या मुलांनो…….२

 

मातृ -पितृ धंन्यांकीत

पुत्र ज्ञाने निपुणता

सार्थ विवेक राष्ट्राशी

जयकार गुणांधिता.

या मुलांनो……..३

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 162 ☆ नाताळ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 162 ?

☆ नाताळ 🎄⛄🌈 सुश्री प्रभा सोनवणे ☆

(२५ डिसेंबर २०२२)

नाताळ दरवर्षीच येतो,

मनाच्या पोतडीतून,

 “नाताळबाबा” काढतो

तशा निघतात सुंदर ,

सुंदर आठवणी !

 

लहानपण येतं परतून अलगद!

चर्च कम्पाऊंड मधली

तुझी छोटीशी बंगली …

नेहमीच स्वच्छ, नीटनेटकी….

नाताळ मधे सुशोभित…अधिक देखणी!

 

तुला आवडायचा आमचा ,

संक्रांतीचा सण,

तसाच तुमचा नाताळ..मला पण !

 

कोप-यातला तो  “नाताळवृक्ष”,

डोनट, केक, पुडिंग!

येशूची प्रार्थना….

चर्च च्या घंटेचा नाद…

 

सारं आठवतंय आज,

काल परवा सारखंच!

तू नाहीस पण .

तुझ्या आठवणी आहेत सखये,

निरंतर !

आणि माझा प्रत्येक नाताळ,

तुझ्या आठवणींनी सजलेला !

शाळेत असताना पाठ्यपुस्तकात

वाचलेल्या वसंत बापटांच्या—

“नाताळ” या धड्यातल्या,

“स्टेला” सारखीच तू…

चिरंतन,

चिरतरुण…..

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दवबिंदूपरी ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ दवबिंदूपरी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

अंगणातल्या प्राजक्तावर

फुले उमलती लाखो गणती

 

फुलांवरी त्या दवबिंदुनी

केली वसती दाटीवाटी

 

ऊन कोवळे पडता त्यावर

जणू भासती माणीक मोती

 

मंद वायुच्या झुळकी सरशी

क्षणांत माती माजी मिळती

 

तसेच जीवन जगतो मानव

दंभ दावीतो उगाच जगती

 

दवबिंदुपरी असते जीवन

क्षणात मिळते माती माजी

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #168 ☆ धुरळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 168 ?

☆ धुरळा…  ☆

धुरळा

काय तो धुरळा, काय ती माती, काय ते बैल

काय तो गाडा, काय तो चाबूक, काय ते फटके

बघ्यांच्या रांगेत उभे हे बोके

पाठीवर वळ तरी म्हणे ओके

 

काय तो पोपट, काय तो पिंजरा, काय ती कैद

काय तो पेरू, काय ती मिरची, काय ती चोच

फुटभर पिंजऱ्यात घेतोय झोके

पंख छाटले तरी म्हणे ओके

 

काय तो पट्टा, काय ती कुत्री, काय ते भुंकणं

काय ते खांब, काय त्या भिंती, काय ते रस्ते

गाड्या घाणीत भरती चाके

त्यांचं घर मात्र ओके

 

काय ती बाग, काय तो हट्ट, काय ती चर्चा, 

काय तो पेंग्विन, काय ती राखण, काय तो खर्च

जनतेचा पैसा सत्तेचे डोके

कसेही वागा म्हणू आम्ही ओके

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनातल्या मनात मी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मनातल्या मनात मी… ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

मनातल्या मनात मी मना तुलाच बोलतो

तुझ्यामुळे कितेकदा तुझाच मार्ग चालतो

 

जगायला जरूर ते हवे नको बघायचे

कवेत सूर्य घ्यावया उगा कशास नाचतो

 

कळेल का कधी मला तुझ्यात ला खुळेपणा

 म्हणून मी इथे तिथे तुलाच रोज शोधतो

 

जगातली हरेकबाब नेमकी हवी तुला

असा कसा भिकार तू कुणास काय मागतो

 

गुलाम देह जाहला तुझ्या पुढे कधी कसा

बनून दास का तुझा तुझ्या पुढेच राबतो

 

गुन्हा मना नसे तुझाअसे तुलाच वाटते

सजा तुला मिळायची खुशाल देह भोगतो

 

निवांत शांत ही धरा निसर्ग खूप देखणा

सभोवताल केवढा तुला सुखात ठेवतो

 

इथेच देव नांदतो मिळून माणसात या

हवे नको असेल ते तुझे तुलाच दावतो

 

निवांत भेट तू तुला विचार प्रश्न सारखे

हळूच येवुनी तुला तुझाच देव भेटतो

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 110 ☆ कधी वाटते… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 110  ? 

कधी वाटते… ☆

कधी वाटते, उगे मौन्य व्हावे

कधी वाटते, संवाद साधावे.!!

कधी वाटते, मी कशातच नसावे

कधी वाटते, सर्वास मी दिसावे.!!

कधी वाटते, अंतरंग प्रगटावे

कधी वाटते, त्यास आवरावे.!!

कधी वाटते, कलह नकोच काही

कधी वाटते, का बळे सहन करावे.!!

कधी वाटते, विजनवास असावा

कधी वाटते, सहवास मिळावा.!!

मनाचा गुंता, सुटता ही सुटेना

व्यथा अंतरिची, बोलता बोलवेना.!!

ही भावना, जाणतो फक्त कृष्णस्वामी

आहे कृपाळू भगवंत, प्रभू अंतर्यामी.!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पांथस्थास… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ पांथस्थास… ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

चल पांथस्था झाली आता

परतीची वेळ

जोडिलास जो मेळ तयाचा

आवर आता खेळ ॥

 

दिनमणि उगवुन ढळला आता

दिशा पश्चिमेला

रात्र तमाची होण्याआधी

वळवी तव पाउला ॥

 

नेई तुझिया संगे येथिल

स्मृती शुचिर्भूत

राहु द्यावे इथेच येथिल

अमंगलाचे भूत ॥

 

सर्वव्यापी चैतनाचा अतूट

तू अंश

अवनीवरती परी पाहुणा

होउनि आलास ॥

 

नच स्वामी तू धनि वा मालक

इथल्या धूलिकणाचा

पाहुणेर तुज मिळोनि गेले

वाटा तव भाग्याचा ॥

 

मंगल घटिका येइल आता

ठेवाया प्रस्थान

पंचभूती मग विलीन होता

सोन्याचा तो दिन ॥

 

जातांना परि संगे न्यावे

संजीवक ते वित्त

ओवि-अभंगी लपले

जे अन् पसायदानात

 

स्वस्थचित्त हो त्या लोकीही

मनास ठेवुन साक्षी

स्थलकालाच्या अतीत होऊनि

वितळुनि जाय गवाक्षी ॥

 

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares