सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 223 ?

झाड- पक्षी- बाई ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

तिला भारद्वाज दिसला अचानक,

दारासमोरच्या,

पानगळ सोसून….

नुकतीच नवपालवी फुटू लागलेल्या,

झाडावर!

ती…

नव-याच्या शिव्या खात…

भारद्वाज दिसला की ,

दिवस चांगला जातो

या श्रद्धेवर जगणारी…

जोडते हात भारद्वाजाला,

तिच्या दारी दाणापाणी,

शोधणा-या,

तिच्या भाग्यविधात्या…

भारद्वाजाकडे मागते,

अखंड सौभाग्याचं दान,

आणि भारद्वाज…

निरखतोय खाली वाकून,

 तिच्याच अंगणात,

त्याच्या प्रारब्धाच्या खाणाखुणा !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments