श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ कविता… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

धरू पाहता दूर धावते

पुन्हा परतुनी हळूच येते

एकांती तर खूप बहरते

अशी निरागस कविता असते

 

भावार्थाला साद घालते

 साजलेवुनी नटून बसते

चपला होऊन कधी विहरते

अशी निरागस कविता असते

 

शांत मनाने जगा निरखते

सुखदुःखाच्या बिया वेचते

भिजते रुजते मग अंकुरते

अशी निरागस कविता असते

 

परंपराना निवडत बसते

आदर्शना नित्य सजवते

समाजात ती पुन्हा मिरवते

अशी निरागस कविता असते

 

मार्दवतेने विकसीत होते

निर्दयतेवर खूप बरसते

आठवणींचा झुला झुलवते

अशी निरागस कविता असते

 

समतेसाठी किती झगडते

भाव मनातील सदा फुलवते

उन्मादाने  हसते  रडते

अशी निरागस कविता असते

 

ती सत्याचे स्वागत करते

लबाडास पण खूप ठेचते

चिरशांतिचा मार्ग दावते

अशी निरागस कविता असते

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments