मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दीपपूजन… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दीपपूजन… ☆ सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर ☆

  दिवस सरता आषाढाचे,

  सांगता असे अमावस्येने,

  निमित्त हेची दीपपूजेचे,

  कृतज्ञतेचे मनी भाव हे!*

 

  घरोघरी पूजन दीपांचे,

  दीप प्रतीक हो, हे ज्ञानाचे,

  अज्ञानाचा नाश होऊ दे,

  उजळू दे जीवन पतितांचे!

 

 तेजाचे अन् सात्त्विकतेचे,

 पूजन करूया पावित्र्याचे,

  परंपरेचे जतन करावे,

  भान हे ठेवू, संस्कृतीचे!

 

  उणे होऊनी दोष आमुचे,

  सद्गुण आम्हां ठायी यावे,

  आरोग्याचे दान मिळावे,

  ज्ञानामृत जीवनी बरसावे!

©  सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #184 ☆ रूप सावळे सुंदर… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 184 – विजय साहित्य ?

रूप सावळे सुंदर… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

रूपं सावळे सुंदर

उभे आहे विटेवरी

पांडुरंग हरी रूप

ठेवी कर कटेवरी….!

 

नाम संकीर्तनी हरी

माळ तुळशीची गळा

वैष्णवांचा मायबाप

लावी पंढरीचा लळा…!

 

अष्टगंध अबीराने

दिसे खुलूनीया रुप

मत्स्य कुंडले किरीट

मोहवीते निजरूप…!

 

राजा पंढरीचा माझा

मागे रखुमाई राणी

पितांबर आणि शेला

गाई कैवल्याची गाणी….!

 

रूप सावळे सुंदर

कंठी वैजयंती माला

संकटात धावे विठू

सखा वैष्णवांचा झाला..!

 

संत साहित्यात शोभे

विविधांगी पांडुरंग

पहा आषाढीची वारी

विठू दर्शनात दंग….!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ टोमॕटोची जादू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ टोमॕटोची जादू… ☆ श्रीशैल चौगुले ☆

सुखी संसारात

टोमॕटोची भर

समृध्दीच नांदे

भोजनाने घर.

 

पत्नीचा रुसवा

टोमॕटोचा हार

नको जवाहिरे

आवडिचा सार.

 

काय सांगू बाई

टोमॕटोची किर्ती

गावदेश तृप्त

सत्वस्वाद स्फूर्ती.

 

नाचतच आले

पतीराज एक

वाढदिन शुभ

टोमॕटोचा केक.

 

मस्त-मस्त चीज

अस्वास्थ्य भरुन

टोमॕटोचा चट्टा

दुष्काळ सरुन.

 

शेतकरी खुश

टोमॕटोचा मळा

जावई नवखा

सोनेमुल्य तोळा.

 

पैकी वरदान

मंथनाचे यत्न

टोमॕटोचा कुंभ

नवरस  रत्न.

 

भांडाभांडी खत्म

सांबार रसाळ

शत्रु मित्र झाला

टोमॕटो मिसळ.

                

आता म्हणे धरा

तोच भक्त जाण

टोमॕटोची शेती

घेतलीया आण.

 

सत्तेची पालट

टोमॕटोची जादू

चंचलात राजा

राजकिय साधू.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा ५ ते ७ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा ५ ते ७ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त) – ऋचा ५ ते ७ 

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – इंद्र 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकोणतिसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी इंद्र देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पाच ते सात या  ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद :

समि॑न्द्र गर्द॒भं मृ॑ण नु॒वन्तं॑ पा॒पया॑मु॒या ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ५ ॥

कुत्सित बोलत अमुच्याविषयी अभद्र जे भाषा  

अशा रासभा निर्दालुनिया जागृत ठेवी आशा 

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||५||

पताति कुण्डृणाच्या दूरं वातः वनात् अधि ।

आ तु नः इंद्र शंसय गोषु अश्वेषु शुभ्रिषु सहस्रेषु तुवीऽमघ ॥ ६ ॥

वावटळीसी कोसो कोसो दूर घेऊनि जाई 

काननाचिया पार नेऊनि पतन करोनी टाकी

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||६||

सर्वं॑ परिक्रो॒शं ज॑हि ज॒म्भया॑ कृकदा॒श्वम् ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ७ ॥

समस्त दुःखांचा शोकांचा करुनी परिहार

अमुचा वैरी नाश करी त्याचा करी संहार 

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||७||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu. be/ZBdJ2NoTlrA

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 5 – 7

Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 5 – 7

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “बंद करुया दारे….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “बंद करुया दारे….” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

बंद करूया दारे सारी इतिहासाची आता।

वर्तमान तरी सारे मिळुनी प्रसन्न करुया आता ।।

 

गुलदस्त्यातच राहू देत ते कसे काय जे घडले।

हद्दपार करू शिक्षणातुनी इतिहासाला आता।।

 

इतिहासाच्या पानोपानी मूर्तिमंत जी स्फूर्ती होती।

त्या पानातुन गळे विकृती गळे दाबण्या आता।।

 

कशास आम्हा हवी संस्कृती धर्म कशाला हवा।

गळे दाबणे गळे कापणे थांबवूया ना आता।।

 

‘जुने जाऊदे मरणा’ करू निर्मिती नवी संस्कृती।

नव्या पिढीची नवी संस्कृती करू निर्मिती आता।।

 

मानव सारे नष्ट कराया समर्थ आहे निसर्ग येथे।

नको त्या तरी पापामध्ये सामिल होऊ आता।।

 

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #170 ☆ शब्द…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 170 ☆ शब्द…! ☆ श्री सुजित कदम ☆

मनाच्या खोल तळाशी

शब्दांची कुजबुज होते…

कागदावर अलगद तेव्हा

जन्मास कविता येते…!

 

शब्दांचे नाव तिला अन्

शब्दांचे घरकुल बनते..

त्या इवल्या कवितेसाठी

शब्दांनी अंगण फुलते…!

 

शब्दांचा श्वास ही होते

शब्दांची ऒळख बनते..

ती कविताच असते केवळ

जी शब्दांसाठी जगते…!

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ काठी आणि करंगळी… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– काठी आणि करंगळी – ? ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

ठसा उमटवित पाऊले चालली

अनुभवी काठी मुठीत ठाकली

          सान काया कुंतल कुरळे

          बाल्य अल्लड अबोध झबले

 

  वस्रं धवल वार्धक्य ल्याले 

  झुलते शैशव  झालरवाले

       थकल्या हाती करंगुली इवली

       किती विश्वासे तिजला धरली

 

    हरले वय गात्रेही थकली

    झेलून गाठी पाठी वाकली 

           आजीच्या अनुभवांची बोली

            कथते ती सुरकुत्यांची जाळी

 

सायीसम कर तो सानुला

थोरलेपणा होई हो धाकुला

          कसली थरथर, नसेच काहूर 

          बीज पल्लविता नच हुरहूर 

 

 छोटी आशा स्वप्नील नयनी

 तरल भावना अनवर वदनी 

         भविष्यातले षड्ज उद्याचे

         काठी स्वरे पंचम पाचूचे 

चित्र साभार –सौ. दीपा नारायण पुजारी

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी, फोन.नं. ९६६५६६९१४८

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 191 ☆ गज़ल ☆ वृत्त – मृगाक्षी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे… ☆

सुश्री प्रभा सोनवणे

 

? कवितेच्या प्रदेशात # 191 ?

☆ गज़ल ☆ वृत्त – मृगाक्षी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मला सांगायचे आहे जरासे

इथे थांबायचे आहे जरासे

किती दुष्काळ सोसावा धरेने

अता बरसायचे आहे जरासे

नदीला पूर आल्याचे कळाले

तिला उसळायचे आहे जरासे

कधी बेधुंद जगताना मलाही

जगा विसरायचे आहे जरासे

मिळे सन्मान शब्दांना स्वतःच्या

तिथे मिरवायचे आहे जरासे

मला या वेढती लाटा सुनामी

मरण टाळायचे आहे जरासे

[लगागागा लगागागा लगागा (मृगचांदणी मधून)]

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पश्चात्ताप… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ पश्चात्ताप… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

गतीचे प्रामाण्य ,

प्रगतीचे वेग.

मनाचे आवेग,

थोपविले.

नाही जुमानली,

प्रचलित नाती.

हाती आले काय?

अपयश !

होउन खलाशी,

निघालो प्रवासी.

नाैकाही विनाशी,

प्रारब्धाची.

काही व्यथांचे जनक,

बाकी प्रमादांचे बाप.

केला पश्चात्ताप ,

हकनाक .

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विठूची रखुमाई… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

? कवितेचा उत्सव ?

☆ विठूची रखुमाई… ☆ श्री राहूल लाळे

रखुमाई नाजूकशी

सावळा रांगडा विठ्ठल

जोडी जमली कशी

मला पडे नवल

 

नाथांच्या घरी

हा भरे पाणी

जनीच्या मागे धावे

शेण्या उचलूनी

 

कबिर गाई दोहे

हा विणतो शेला

नाम्यासाठी हा

उष्टावतो काला

 

ज्ञानोबांसाठी हा

भिंत चालवतो

तुकोबांचे बुडलेले

अभंग वाचवतो

 

दामाजीनी गरीबांसाठी

रीती केली कोठारे

विठू महार होऊनी

हा परत ती भरे

 

चोखामेळा , गोरा कुंभार

याच्या भक्तांची किती गणती

आस लागलेल्या बायकोची

याला नसे काही भ्रांती

 

काळाचेही रहात नाही

याला काही भान

वाटेकडे डोळे रख्माईचे

लावूनी तनमन

 

भक्तांच्या हाकेला

हा सदा धावून जातो

शेजारच्या रखमाईला

मात्र विसरुनी जातो

 

मुलखाची भाबडी

माय भोळ्या भक्तांची

भाळली काळ्यावर

युगत ना कळली तयाची

 

विठूसंगे नाव सदा

येते रखुमाई

बरोबर असून नसे जवळ

रुसतसे बाई

 

याच्यासंगे राबे ही

सर्व भक्तांच्या घरी

बोल कोणा लावावा

तिचाच तो सावळा हरी….

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print