मराठी साहित्य – काव्यानंद ☆ प्रिय विणकरा….शांताबाई शेळके ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? काव्यानंद ?

☆ प्रिय विणकरा….शांताबाई शेळके ☆ रसग्रहण.. श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

प्रिय विणकरा

मलाही तुझे कौशल्य शिकव

प्रिय विणकरा..

नेहमी तुला पाहिलं वस्त्र विणताना

जेव्हा एखादा धागा तुटतो किंवा संपतो तेव्हा

दुसरा त्यामध्ये गुंफून

तू पुढे विणू लागतोस

तुझ्या या वस्त्रात पण

एकही गाठ

 कुणाला दिसत नाही

मी तर फक्त एकदाच

विणून पाहिलं होतं

एका नात्याचं वस्त्र

पण त्याच्या साऱ्या गाठी

स्पष्ट दिसताहेत

प्रिय विणकरा

 – शांता शेळके

कवी गुलजार यांच्या,’ यार जुलाहे ‘ या हिंदी कवितेचा अनुवाद !

एखाद्या विणकराच्या घराशेजारी कवीचे वास्तव्य असावे.तो रोज विणकराचे विणकाम बघत असावा. हळूहळू कविच्या मनात विणकराच्या कामाबद्दल इतका आदर निर्माण झाला असावा की त्याचे कौतुक वाटता वाटता तो कवीचा प्रिय मित्र बनला असावा.एक दिवस तो विणकराला म्हणला असणार,

‘ हे प्रिय विणकरा मी तुला नेहमी वस्त्र विणताना बघतो.किती सुंदर वस्त्र विणतोस..वस्त्र विणताना एखादा धागा जर तुटला किंवा संपला तर त्यात तू  दुसरा धागा इतका सहजपणे गुंफतोस की असा जोडलेला धागा न ओळखण्याइतका सफाईदार असतो की धागा जोडलेल्या ठिकाणी बारीकशी ही गाठ दिसत नाही इतके दोन्ही जोड एकरूप झालेले असतात.

 माणसाच्या नात्याचेही असेच आहे.दोन नाती अशी जोडली गेली पाहिजेत की दोन्ही एकच,एकरुप झाली पाहिजेत तरच आयुष्याचे तलम वस्त्र तयार होईल.’

प्रिय विणकरा असा विचार करून  मी एकदाच एक नात्यांचे वस्त्र विणायला घेतले नाती जोडायला गेलो पण विचार एकरूप न झाल्याने त्या वस्त्रावर अविचार, गैरसमज, मतभेदांच्या गाठी दिसू लागल्या.प्रिय विणकरा त्यामुळे दुसरे वस्त्र विणावेसे वाटलेच नाही.

या कवितेत कविला अभिप्रेत असलेला विणकर म्हणजे सुविचारी,एकमेकांच्या विचारांचा सांधा जो आपल्या कौशल्याने दुसऱ्याचे दोष सुविचारात परिवर्तित करतो.आयुष्याचे तलम वस्त्र विणण्यात यशस्वी होतो.आणि कवी हा त्यातला दुसरा घटक ज्याला हे कौशल्य प्राप्त करता आले नाही त्यामुळे तो नाती जोडू शकला नाही, टिकवू न शकणारा असा अप्रिय विणकर ठरला.

कवी गुलजार यानी अगदी सहजपणे नात्यांची जोडणी कशी होते,तोडणी कां होते हे मार्मिकपणे सांगितले असून आदरणीय कवियत्री शांता शेळके यानी अतिशय सुंदर असा अनुवाद केला आहे

 तेव्हा आपण नात्याची तोडणी न करता जोडणी करू या .आताच्या विस्कळीत समाजमनाला त्याची नितांत गरज आहे.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ हिरवा नजारा ☆ श्री प्रमोद वामन वर्तक 

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? हिरवा नजारा  ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

 

गर्द हिरवाईत वसलं

घरकुल कौलारू सुबक

बांधावरून शेताच्या

दृष्य दिसे मनमोहक

कष्ट सारे कासकराचे

उभ्या पिकात तरारले

पाहून तो हिरवा नजारा

डोळे आनंदाने भरले

चित्र साभार : श्री दीपक मोदगी

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ यावे यावे नववर्षा ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ यावे यावे नववर्षा… ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

यावे यावे नववर्षा

स्वागत आपुले अति हर्षा  धृ

 

आनंदात येऊनी, आनंदमय जगुनी

निःस्वार्थाचा हात धरूनी

समता धाग्याने वस्त्र विणूनी

समतोलाचे तत्व आचरणया

यावे यावे.        ‌

 

विज्ञानाची कास धरुनी

साध्य व साधन भेद करुनी

मानवतेचा पंथ चालूनी

अहंकाराचे दमन कराया

यावे यावे

 

स्वत्वाची मर्यादा ओळखूनी

प्रपंचात परमार्थ साधूनी

बंधू त्याला देव मानुनी

न्याय नीतीचे पालन करण्या

यावे यावे नववर्षा

 

प्रीतीचे हास्य फुलवुनी

विषमतेची आग विझवुनी

भ्रष्टाचारा मुठमाती देवूनी

प्रेमाचे संगीत गावया

यावे यावे नववर्षा

 

कलिकाळाची ओळख घेऊनी

अंतस्थ व बाह्य शत्रू ओळखूनी

विशाल दृष्टिचे दान देवूनी

एकात्मिक तेची फुले वेचण्या

यावे यावे नववर्षा

 

सद्गुणांचे मूल्य जाणूनी

माणूसकी चे शिल्प खोदुनी

भारतभूची  कीर्ती वाढवूनी

गतवैभव हे प्राप्त कराया

 

यावे यावे नववर्षा

स्वागत आपुले अति हर्षा

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रंगवीन मी ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? रंगवीन मी ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

 

? रंगवीन मी ?

 

आज पुन्हां एकदा मनावर

नक्षीदार रांगोळी रेखीन मी

आणखी एकदा नशीब नवं

भाळावर कोरून घेईन मी..

पुन्हां एकदा हरविलेल्या स्वप्नांना

आज नयनांत साठवेन मी

हसर्‍या भाकिताच्या स्वागतासाठी

सुखःदुःखाच्या पथारी मागे टाकीन मी..

निर्भेळ स्वच्छ जळाचा

तो एक अदृश्य रंग असेन मी

स्वैर भावनांशी समरस होऊन

गुंगून हरवून जाईन मी..

पलीकडच्या अंधाराचाही

तो एक अंदाज घेईन मी

सावलीत माझ्या मलाच

परि शोधीत राहीन मी..

पुन्हां एकदा नव्याने

नवीन स्वप्ने रंगवीन मी

नवीन स्वप्ने रंगवीन मी..!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागत नववर्षाचे ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वागत नववर्षाचे ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

(शेल काव्य रचना)

सान थोर सर्वजण

सर्वजण आतुरले..

 नववर्ष स्वागतास

 स्वागतास सज्ज झाले..१

 

भले बुरे जे जे झाले

झाले गेले विसरावे

नव आशा उमेदीने

उमेदीने सज्ज व्हावे..२

 

नव वर्षाची पहाट

पहाट हर्षानंदाची

फुले माळा रांगोळीने

रांगोळीने स्वागताची…३

 

मनी करूया संकल्प

संकल्प आनंददायी

पूर्ण होवो साऱ्या इच्छा

इच्छा व्हाव्या फलदायी..४

 

 नव वर्षात लाभावे

लाभावे सुख समृध्दी

दुःख सरूनिया होवो

होवो जीवन आनंदी..५

 

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 107 – माझी शाळा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? साप्ताहिक स्तम्भ # 107 – विजय साहित्य ?

☆ माझी शाळा  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

अभिनव माझी शाळा

अंतरात कोरलेली

यशोदीप गुणकारी

शैशवात गोंदलेली…१

 

कलासक्त गुरूजन

आधाराचा देती हात

ज्ञानदान करताना

देती संकटांना मात…२

 

शाळा आणि क्रिडांगण

जणू ज्ञानाची पंढरी

खेळ मैदानी खेळता

शाळा भरते अंतरी…३

 

शिका वाचा आणि खेळा

शाळेतील गुरू मंत्र

शाळा अभिनव माझी

जीवनाचे सोपे तंत्र…४

 

माय बाप झाली शाळा

तन मन  घडविले

योग व्यायाम संस्कार

अलंकार जडविले…५

 

बदलले रंग रूप

नाही बदलली शाळा

आशीर्वादी कानी नाद

ज्ञानवंत हो रे बाळा…६

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दत्ता अवधूता…☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ दत्ता अवधूता…. ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

श्रीपाद वल्लभा। दत्ता अवधूता

सद्गुरूनाथा । नमन घे

        

उभी कृष्णातिरी । त्रैमूर्ती प्रसन्न

तेजस्वी चैतन्य । दिगंबर

 

चरणी खडावा । रुद्राक्षाच्या माळा

दयाळा कृपाळा । दीनानाथ      

 

अनुसया सत्त्वे । जन्म घेतलासी

तू अवतारीसी ।गुरुदेव

 

योगीयांचा योगी । ज्ञानाची माऊली

कृपेची सावली ।साक्षात्कारी

 

चिंता मुक्त करी । सन्मार्गासी नेसी

पावन करीशी । कृपाळुवा

 

प्रेमळ कटाक्षे । स्नेह पाझरती

तू भक्तांवरती । दयाघना

 

वेड लावी चित्ता ।भरती प्रेमाची

तुला हृदयाची । पायघडी

 

नित्य नाम घेता ।होय चिंता मुक्त

संकटा त्वरित । निवारीशी

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 93 – हिशोब ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #93 ?

☆ हिशोब ☆

आयुष्याचे हिशोब  खडतर जमले नाही

सवाल कुठला कुठले उत्तर कळले नाही

हवे तसे मी उनाड जगणे जगून गेलो

किती कमवले जीवनात या पुरले नाही.

 

सुखात हसलो दुःखी रडलो खचलो नाही

चौकटीतल्या जगण्याला मी भुललो नाही

थोडे थोडे आयुष्याशी करार केले

गेले फसवून त्यांच्या वर मी रूसलो नाही.

 

अनुभवाच्या चार क्षणांना मुकलो नाही

संसाराचे हळवे नाते सुटलो नाही

जे जे जमले करून गेलो निर्धाराने

वही संपली हिशोब चुकला  अडलो नाही.

 

घाव मनाचे भरून आले थकलो नाही

देणे घेणे यात कधी ही चुकलो नाही

तरी राहिलो बराच मागे या दुनियेच्या

सुखदुःखाची सलगी करण्या मुकलो‌ नाही.

 

कित्तेक आले कित्तेक गेले अडले नाही

दूरदूरच्या नभात उडणे जमले नाही

पडलो घडलो धडपडलो मी अनेक वेळा

पंखांमधले बळ अजूनही सरले नाही.

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी… ☆ कै मंगेश पाडगावकर 

? कवितेचा उत्सव ?

☆ मी… ☆ कै मंगेश पाडगावकर ☆ 

मी झुळझुळणारा वारा,

मी सुंदर मोरपिसारा

निळ्या निळ्या या आभाळतील

तारा लुकलुकणारा !

 

          मी पारिजात फुलणारा

          मी सुगंध अन् झुलणारा,

          ऊन कोवळे झेलीत झेलीत

          पक्षी भिरभिरणारा !

 

मी पाऊस कोसळणारा

मी डोंगर अन् न्हाणारा

झरा चिमुकला आनंदाने

गात गात जाणारा !

                     

कै मंगेश पाडगावकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आताशा… ☆ श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आताशा… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

धुंद धारांचा मनस्वी ,

जोरही सरला आताशा.

 

बेधुंद नाचणारा मनीचा,

मयूरही थकला आताशा .

 

क्षीण झाले चांदणे अन्

चंद्रही लोपला आताशा .

 

जीर्ण झावळ्यांचे कवडसे ,

वृक्षही झुकले आताशा .

 

लुप्त झाली पाखरे,

हरवले वारे आताशा .

 

नभ झाले निरभ्र सारे,

नीरदही गुप्त आताशा .

 

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares