सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ स्वागत नववर्षाचे ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
(शेल काव्य रचना)
सान थोर सर्वजण
सर्वजण आतुरले..
नववर्ष स्वागतास
स्वागतास सज्ज झाले..१
भले बुरे जे जे झाले
झाले गेले विसरावे
नव आशा उमेदीने
उमेदीने सज्ज व्हावे..२
नव वर्षाची पहाट
पहाट हर्षानंदाची
फुले माळा रांगोळीने
रांगोळीने स्वागताची…३
मनी करूया संकल्प
संकल्प आनंददायी
पूर्ण होवो साऱ्या इच्छा
इच्छा व्हाव्या फलदायी..४
नव वर्षात लाभावे
लाभावे सुख समृध्दी
दुःख सरूनिया होवो
होवो जीवन आनंदी..५
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈