मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण भय… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण भय… ☆ श्रीशैल चौगुले ☆

थांबेल का रे नाव

कुठे एका किनारी

वादळाचे हे घाव

वेदनाच जिव्हारी.

 

श्रावण वद्य पक्ष

पौर्णिमेचे ऊधाण

इंद्रधनूत रंगतो

ऋतूराज प्रधान.

 

लाटा भव्य डोंगर

भय मनात ऊसळे

ढग जणू गिळून

नाव सागरी मिसळे.

 

आठवणी पुन्हा भेटी

ही वाट वाटते खोटी

काळजाची ही कसोटी

सावरण्या ‘ शब्द ‘धोटी.

 

झुले, फुल- फळे,गंध

श्रावण धारांचा धुंद

भाव अतृप्त तृष्णा

डोळ्यात आभाळ स्पंद.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #152 ☆ काजळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 152 ?

☆ काजळ…

किती दिवस मी शोधत होतो सापडलो मी आज मला

किती चुकांचा डोंगर माथी समजत होतो तरी भला

 

नश्वर देहालाही माया मोहाने या गुरफटले

मुक्कामाची वेळ संपली पुन्हा जाउ या घरी चला

 

भ्रष्टाचाराच्या खड्ड्याने बळी घेतला असा तुझा

आज निघाला ज्या रस्त्याने तो तर आहे धुक्यातला

 

ओठ टेकले स्पर्श जाहला बर्फाच्या ह्या गोळ्याला

कुठेच नव्हती आग तरीही बर्फ कसा हा पाघळला

 

कलेकलेने रूप बदलले शृंगाराचा साज नवा

पुनवेची ही रात्र घेउनी चंद्र नव्याने अवतरला

 

ओढ लागली मला घराची अंगणात मी अवतरले

नव्हे गालिच्या माझ्यासाठी जीवच त्याने अंथरला

 

जळल्यानंतर भाग्य उजळले त्यातुन झाला काजळ तो

आणि सखीच्या नेत्री आहे मुक्तपणे तो वावरला

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावणसरी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ श्रावणसरी… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी☆

अशीच एखादी सर येते

हळुच शिडकावा करुन जाते.

तापलेल्या  क्लांत भूमीबरोबरच

तप्त मनासही शीतलता देते.

 

श्रावणसरीतील ओलाव्याने

सृष्टी-सखी न्हाऊन निघते

तृप्त मनीच्या संतोषाने

अणुरेणूलाही चिंब करते.

 

तृप्त धरती गंधित होते

हेमपुष्पही जन्म घेते.

शिवार सारे फुलून जाते

आगळ्या सौंदर्ये धरती नटते.

 

सृष्टीसखीचा बहार पाहून

तनमनही रोमांचित होते

जलधारांना दुवा देते

शिवारातील सोनं वेचू पाहते.

 

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 94 ☆ ओढ… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 94  ? 

☆ ओढ… ☆

पावसाची ओढ

शेतकऱ्यांना

मताची ओढ

पुढाऱ्यांना

भक्तीची ओढ

भाविकांना

प्रियेची ओढ

प्रियेसीला

अशी ओढ

माणसाला

ओढतच नेते

कुणाला ओढ

प्राप्त होते,तर

कुणाला ओढ

धुळीस मिळवते…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 25 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 25 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

३५.

जिथं मन मुक्त असेल, माथा उन्मत्त असेल,

ज्ञान मुक्त असेल,

 

घरांच्या क्षुद्र भिंतींनी जगाचे तुकडे झाले नसतील,

सत्याच्या गाभाऱ्यातून शब्दांचा उच्चार होईल,

 

अथक परिश्रमांचे हात

 पूर्णत्वाप्रत उंचावले जातील,

 

मृत सवयींच्या वालुकामय वाळवंटात

बुध्दीचा स्वच्छ झरा आटून गेला नसेल,

 

सतत विस्तार पावणाऱ्या विचार

आणि कृती करण्याकडेच

तुझ्या कृपेने मनाची धाव असेल,

 

हे माझ्या स्वामी, त्या स्वतंत्रतेच्या स्वर्गात

माझा देश जागृत होऊ दे.

 

३६.

माझ्या ऱ्हदयातील दारिऱ्द्य्याच्या

मुळावर घाव घाल

 

सुख आणि दुःख आनंदानं सोसायची

शक्ती मला दे.

माझं प्रेम सेवेत फलद्रूप करण्याची शक्ती दे.

 

गरिबापासून फटकून न वागण्याची अगर

धनदांडग्या मस्तवालासमोर शरण न जाण्याची

शक्ती मला दे.

 

दैनंदिन क्षुद्रतेला ओलांडून उंच जाण्याची

शक्ती मला दे आणि

प्रेमभावनेनं तुझ्या मर्जीप्रमाणं तुला शरण

जाण्याची शक्ती मला दे.

इतकीच माझी प्रार्थना आहे!

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण आला ग…☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण आला ग☆ सौ. सुचित्रा पवर ☆

श्रावण आला ग

झोका लागे झुलू

हवेच्या झोक्यात

मन लागे डोलू

 

गोऱ्या गोऱ्या हाती

मेंदी लाल लाल

झिम्मा न फुगडी

पैंजनांचा ताल

 

नागोबा गं बंधू

 देऊ नागोबाला

दूध अन लाह्या

जाऊ वारुळाला

 

वाट पहाते मी

मुराळी येईल

गाडी घुंगराची

वेगात धावेल

 

डोळे भिजतील

व्याकुळ होईन

माहेर पारखे

कशी विसरेन

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रावण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(अष्टाक्षरी)

सारे आषाढ अंकुर

रान श्रावणी हिरवे

धोधो धोधो संगीताची

धून मंद आता उरे !

 

     क्षणी नभ अभ्रांकित

     क्षणी होई निळे निळे

     क्षणी  वर्षे  मेघातुन

     क्षणी सोन्यात उजळे !

 

मध्यवयीन पाऊस

जरा संयमी नी शांत

कधीकाळचा प्रपात

दिसे झऱ्याच्या रूपात !

 

     झुळझूळे  निर्झरात

     शुभ्र स्फटिकाचे पाणी

     सारे मालिन्य सांडून

     घेई आकाशा दर्पणी !

 

रात्र अथांग हिरवी

दिस अथांग हिरवा

दिवास्वप्नांनाही रंग

लाभे हिरवा हिरवा !

 

     एक  हिरवे  साम्राज्य

     मांडलिक  रानवाटा

     सारा  सागर  हिरवा

     साऱ्या हिरव्याच लाटा !

 

पहाटेस  अंगणात

शुभ्रकेशरी  दर्वळ

प्राजक्ताच्या गंधालाही

हिरव्याचे लागे खूळ !

 

     ओल्याचिंब पापण्यात

     आगंतुक आले उन्ह

     कुणी बांधिले ह्रदयी

     इंद्रधनूचे तोरण !…..

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक कागदाचं पान असतं…!! – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆  एक कागदाचं पान असतं…!! – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कसं आहे ना? 

एक कागदाचं पान असतं…!!

 ‘श्री’ लिहिलं, की पूजलं जातं …

 प्रेमाचे चार शब्द लिहिले, की जपलं जातं…

काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं…

 

एक कागदाचं पान असतं…!!

 

कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं…

कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं…

कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं…

आणि कधी तर  निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं…

 

एक कागदाचं पान असतं….!!

 

जे लेखकाच्या लेखणीला हात देतं…

जे चित्रकाराच्या  चित्राला साथ देतं…

जे व्यापाऱ्याच्या  हिशोबाला ज्ञात ठेवतं…

आणि हो, वकिलांसोबत कोर्टात गेलं, की साक्षही देतं…

 

एक कागदाचं पान असतं…..!!

 

पेपरवेट ठेवला, की एकदम गप्प बसतं…

काढून घेतला, की  स्वच्छंदी फिरतं आणि 

कशांत अडकलं, तर फडफडायला लागतं…

 

एक कागदाचं पान असतं…..!!

 

ज्यावर बातम्या छापल्या, की वर्तमानपत्र बनतं…

प्रश्न छापले, की  प्रश्नपत्रिका बनतं…

विवाहाचं निमंत्रण छापलं, की लग्नपत्रिका बनतं…

तर कधी आदेश~संदेश लिहिले, की तेच टपालही बनतं…

 

एक कागदाचं पान असतं….!!

 

 माणसाच्या जीवनांत आणि त्यांत खूप साम्य असतं…!!

 

एक कागदाचं पान असतं…!!

जन्माला आला तर birth certificate असतं

निधन पावला तर Death certificate असतं

 

एक कागदाचं पान असतं ——–

– अज्ञात 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा– ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – 🇮🇳 अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा 🇮🇳 –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

अमृत महोत्सव सोहळा स्वातंत्र्याचा

राष्ट्रध्वजाचे जाहले आरोहण

आदराने गाऊ राष्ट्रगीताचे गायन

स्मरुनी वीरांनी अर्पियले स्वःप्राण..

आकाशात लहरतो तिरंगा

देशाचा असे गर्व अन शान

देशधर्म निभावूनी चालू सारे

व्यर्थ न व्हावे त्यांचे बलिदान..

घेरले कितीदा देशास आपुल्या

अघोर आपदा,बेबंध संकटांनी

लावियले प्राण पणास वीरांनी

बाजी शर्थ अन हिम्मत दावूनी..

पंच्याहत्तर वर्षांचा काळ लोटला

स्वातंत्र्य मिळूनी भारताला

उगा जात धर्म भेद लोढण्याने

नका गमवू हो स्वारस्याला..

उत्साहात उत्सवाप्रती साजरा

असे देशाचा हा मंगलदिन

आठवूनी देशभक्तांचे समर्पण

तिरंग्यास करूया सादर वंदन..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

ठाणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श र णा ग त ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 श र णा ग त ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

धून ऐकून बासरीची

होई घालमेल राधेची,

नकळत पाऊले तिची

वाट चालती वनीची !

 

वाटेत थबके राधा

बघून पावलांचे ठसे,

शंका होणार खरी

मनोमनी तिज भासे !

 

तरुखाली बैसली मीरा

हाती धरून एकतारी,

उभा राहून सामोरी

पावा वाजवी श्रीहरी !

 

पाहून दृष्य समोरचे

मनात असूया दाटे,

घेतला हक्क हिरावून

उगा राधेला मनी वाटे !

 

मनीचे ओळखून भाव

सांगे राधेला तो मुरारी,

मज समान सारे भक्त

मी, भेदभाव न￰ करी !

 

मनात होऊन खजील

राधा धरी हरीचे चरण,

म्हणे, चुकले माझे वेडीचे

आले तुजला मी शरण !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares