श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 श र णा ग त ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

धून ऐकून बासरीची

होई घालमेल राधेची,

नकळत पाऊले तिची

वाट चालती वनीची !

 

वाटेत थबके राधा

बघून पावलांचे ठसे,

शंका होणार खरी

मनोमनी तिज भासे !

 

तरुखाली बैसली मीरा

हाती धरून एकतारी,

उभा राहून सामोरी

पावा वाजवी श्रीहरी !

 

पाहून दृष्य समोरचे

मनात असूया दाटे,

घेतला हक्क हिरावून

उगा राधेला मनी वाटे !

 

मनीचे ओळखून भाव

सांगे राधेला तो मुरारी,

मज समान सारे भक्त

मी, भेदभाव न￰ करी !

 

मनात होऊन खजील

राधा धरी हरीचे चरण,

म्हणे, चुकले माझे वेडीचे

आले तुजला मी शरण !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments