(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है। इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है मैत्री दिवस पर एक विशेष आलेख मैत्री ।)
☆ मैत्री ☆
आज सकाळपासून मला माझ्या मैत्रीणी ची आठवण येत होती.खरंच मैत्रीचे धागे एकदा विणले की ते विलग होत नाहीत,उलट दिवसेंदिवस अधिक दृढ होत जातात.
मैत्री ही अशी आहे असं सांगून भागत नाही ती प्रतिसाद देत टिकवायची असते.मैत्रीत ना असतं तुझं नाव माझं,ना खरं ना खोटं ! तिला कुठल्याही पारड्यात तोला. तिचं पारडं नेहमी जडंच !
मैत्री केव्हाही,कुठंही होऊ शकते.तिला वेळ काळ कशाचही बंधन नसतं.
मैत्रीच्या नात्यात प्राण असतो म्हणून रक्ताची नाती तुटू शकतात पण मैत्रीची नाही.
मैत्री असावी “द्वारकाधीश श्रीकृष्णाची व दरिद्री सुदाम्याची “!श्रीकृष्णाने सुदाम्याने आणलेल्या मूठभर पोह्यासाठी हट्ट धरला,पोहे कसले ते फाटक्या धोतराच्या पुरचुंडीत घरातल्या मडक्यातला उरलासुरला पोह्यांचा चुरा पण तो श्रीकृष्णाने अत्यंत प्रेमानं खाल्ला, आणि त्याला अमृताची गोडी आली कारण त्या पोह्यात सुदाम्याच्या मैत्रीची श्रीमंती होती.
मागच्या वर्षीच्या मैत्रीदिनानिमित्त एका चिनी मित्रांची कथा माझ्या वाचनात आली.त्यात एकजण दोन्ही डोळ्यांनी जन्मांध तर दुसरा लहानपणी अपघातात दोन्ही हात गमावलेला.दोघांनाही काम नव्हतं.एके दिवशी बेकारांच्या रांगेत दोघांची ओळख झाली.त्या दोघांनीही कुणाकडं भिकाऱ्यासारखं मागत बसण्यापेक्षा वेगळं काहीतरी कां करु नये असा विचार केला व त्यातूनच त्या दोघांची मैत्री झाली अन् त्याक्षणी “ये दोस्ती हम नहीं छोडेंगे ” म्हणत त्यांनी एका उदात्त ध्यासाची शपथ घेतली.दोघांनी स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा करुन नदीकाठची पण पडीक जमीन भाड्यानं मागितली.आम्हाला अपंगत्वान भविष्य ठेवलेलं नाही पण भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी आम्हाला पर्यावरणपूरक वनीकरण करायचं आहे असं सांगून त्यांनी त्या पडीक माळरानाच्यातब्बल तीन हेक्टरवर वृक्षारोपण केल. खड्डे खणण्यापासून पाणी घालण्यापर्यंत सारं या दोघांनीच केवळ एकमेकांच्या साथीनं “तू माझे हात व मी तुझे डोळे ” असं म्हणत असाध्य ते साध्य केलं.
आज पंधरा वर्षांनी हे सगळं माळरान सुंदर हिरवाईने फुललंय !माणसांचा आधार, चिमण्या पाखरांचा पशुपक्ष्यांच्या अनेक जातींचा “विसावा “झालंय !
कधीकाळी उपाशीपोटी पण समाधानी मनानं केलेल्या कामाला उदात्त व गोड फळं आलीत.
देह अपंग असले तरी अभंग मनातल्या आपल्या क्षमतांवरचा विश्र्वास व मैत्रीची भरभक्कम साथ यामुळे या दोघांनी अनेकांसाठी एक आदर्श निर्माण केला.
धन्य ती आयुष्याच्या सफलतेला कारणीभूत ठरणारी सुंदर मैत्री.!!
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की पंद्रहवीं कड़ी क्षणच तो, क्षणात हरवला की गवसला ?। सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं। सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। यह सत्य है कि जीवन के प्रत्येक क्षण महत्वपूर्ण हैं। जो क्षण हम खो देते हैं वे क्षण भविष्य में पुनः नहीं आएंगे। कुछ क्षण ऐसे भी होते हैं जिनके लिए हमारा सारा जीवन व्यतीत हो जाता है और हम उन्हें नहीं पा पाते। कुछ क्षण ऐसे भी आते हैं जो हमारे सामने से मुट्ठी में से रेत की तरह फिसल जाते हैं और हम उन्हें रोक नहीं पाते। कभी कल्पना कर देखिये। आरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों का कोई सानी नहीं। उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ सकेंगे।)
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #15
☆ क्षणच तो, क्षणात हरवला की गवसला ? ☆
क्षणच तो, क्षणात हरवला की गवसला ?
नक्की काय झालं ते कळलंच नाही…
क्षणोक्षणीचे विचार क्षणभंगूर की तो क्षणच…
मनात जे येतं, ते क्षणभर पकडायचा प्रयत्न ?असंच वाटतं, हो ना?
ह्या पकडा पकडीमध्ये किती तरी क्षण निसटून जातात नाही !
ओंजळीत उरतात ते फक्त आठवणीतले क्षण… क्षणभर विसावा !
पण हा विसवाही क्षणभरच असतो… इथेही क्षणभरच रमता येतं…
प्रत्येक क्षणाशी लढावं लागतं, कधी आनंदाने तर कधी इच्छा नसताना…
अनेक आशा आकांक्षांना सोबत घेऊन… तुझं माझं करत …
मग एक असा क्षण येतो की त्यात बाकी उरते ती असते, मी…
ह्या क्षणावर फक्त माझा हक्क असतो कारण तो मला माझ्यासाठी जगायचा असतो… ह्या क्षणाची वाट पहात असताना आयुष्य खूप काही शिकवून जातं, खूप काही घेऊन जातं, देऊन जातं, हातात उरतात ते क्षण सोनेरी करून जातं, क्षणभर !
एका लाटेतून जन्मणारी दुसरी लाट क्षणाक्षणांचा प्रवास करून येते अगदी तस्संच… नक्की कुठली लाट आपली आहे हे कळेपर्यंत दुसरी लाट मनाचा ताबा घेते, पायाला स्पर्शून जाते, पण थांबत नाही… तिची किनाऱ्याची ओढ अद्वैतात जाण्याची, पण तिथूनही परतावं लागतं, कारण जगलेले क्षण क्षणभंगूर आहेत ना ! सतत वाहत असतात, क्षणा क्षणाने !
(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक के रुप में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है उनका एक आलेख – त्याग ।)
☆ त्याग ☆
कालचाच किस्सा. ऑफिसमध्ये मीटिंग होती. रिजेक्शन का येताहेत. बिझनेस वाढत का नाहीये. या कारणांची मिमांसा करण्यासाठी मिटिंग घेतली गेली. ऑफिसचीच सुपर थर्टी मयुरीने मिटिंगला सुरूवात केली. आणि सगळ्यांकडून कारणे जाणुन घेतली. कारणे जाणुन घेतल्यावर बिझनेस कसा ग्रो करायचा. आणि आपण इथे कशा साठी आलो आहोत याची कारणे लक्षात आणुन दिली. ही कारणे लक्षात आणतांना एका भावनिक विषयाला हात घातला. विषय अर्थातच आई-वडीलांना सम्मान मिळवून देणे. आणि समाजामध्ये ताठ मानेने जगावं असं काही करून दाखवणे. आणि त्यांनी आयुष्यभर केलेलं काम त्यांच्या हातातुन काढून एक सम्मानपूर्वक आयुष्या देणे. हे उद्दिष्ट लक्षात आणुन दिले.
विषय खरोखर भावनिक होता. स्वतःच्या आई बाबांना एक चांगलं आणि आरामदायि आयुष्य देणं यापेक्षा चांगले विचार काय असू शकतात. जेव्हा मयुरीने तिचा स्वतःचा अनुभव शेअर केला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. कारण ती ज्यासाठी झटत आहे. आणि सगळीच मुलं ज्यासाठी एवढ सहन करताहेत त्यासाठी त्यांना खुप समस्यांना सामोरे जावं लागतं आहे. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या समस्या आणि वरून लोकांचे टोमणे. तरी न डगमगता ते अगदी संयमाने ते काम करताहेत. जेव्हा मयुरी हे सगळं बोलत होती तेव्हा तिचे डोळे भरून आले आणि मिटिंग तशीच अर्धी सोडून चालली गेली.
मयुरी गेल्या नंतर स्वातीने मिटींग पुढे सुरू ठेवली. सुरूवातीला तिने कठीण शब्द प्रयोग केला. पण मयुरी का रडली त्याचे कारण ही सांगीतले. आणि मिटिंगला बसलेल्या प्रत्येकाला विचारले कि त्यांनी तर त्यांच्या ध्येयासाठी खुप काही त्यागलंय पण तुमचं काय? तुमचं ध्येय काय आणि त्यासाठी तुम्ही काय त्याग केला. तसं मयुरीच्या भावनिक होण्याने अर्धी मंडळी तर रडायला लागलीच होती. आणि तशातच स्वातीचं असं विचारणं म्हणजे सरळ-सरळ भावनांना चेतवणारं होतं. प्रत्येक जण आपलं ध्येय सांगुन त्यांनी केलेला त्याग आणि यश मिळवण्यासाठी ठेवलेला संयम सांगु लागले. ज्यावेळी माझा नंबर आला. तेव्हा मी “शाॅ नाही करू शकत” असं म्हणुन उत्तर देणे टाळले.
मला जेव्हा कोणी असं विचारतं कि तुमच्या आयुष्याचं ध्येय काय त्यासाठी काय संघर्ष केला आणि संघर्ष करतांना काय त्याग केला. तेव्हा मला हसू येतं. आता ते का येतं ते मलाही स्पष्ट नाहीये. ते माझ्या कमी पडलेल्या प्रयत्नांवर येतं. कि माझ्यासाठी अशक्य नसलेलं स्वप्नावर कि मग त्यांनी माझ्या बद्दल केलेल्या विचारांवर येत हे सांगणं कठीण आहे. पण उत्तर याच दोन-तिन गोष्टींमध्ये आहे. हे मात्र नक्की. काही लोकं असल्या भावनिक गोष्टी ऐकून किंवा नुसतं आठवन करून रडतात किंवा खुप भावुक होऊन त्यांचे डोळे पाणावतात. मिटींग मध्ये जेव्हा ती मंडळी रडत होती तेव्हा माझ्या डोळ्यांत थेंब काय पण माझ्या चेह-यावरचे भावही बदलले नव्हते. त्यात काहींनी असा विचार केला कि दगडाचा काळीज असलेला माणुस आहे हा. याला भावनाच नाहीत. त्यांची प्रश्नार्थक तेवढीच तुच्छ नजर माझ्यावर होती. मला त्यांच असं वागणं पाहून हसू आलं.
ते त्यांच्या समजण्यावर नाही तर माझ्या स्वतः वर आलं. जेव्हा मला असं सांगितलं जातं की तु मिटीवेशनल व्हीडीओ बघ किंवा डेमो लेक्चर अॅटेंड कर तेव्हा त्यांना माझं प्रामाणिक उत्तर असतं. कि मला कोणाचे शब्द मोटोवेट करत नाहीत. माझा संघर्षच मला लढण्याची शक्ति देतो. माझं आयुष्य बद्दल एकच मत आहे रडा नाही तर लढा. कारण जिवन जगतांना अनेक संकटं येतात. त्याच्याशी लढणं हा एकमेव पर्याय मला दिसतो. मला वाटतं आपण ठरवलेलं ध्येय पुर्ण करण्यासाठी ज्या जिद्दीने संघर्षाच्या मैदानात उतरतो. जी आग मनामध्ये लागलेली असते. अश्रू गाळल्या ने ती विझायला लागते. नव्हे विझतेच. असं माझं मत आहे. हे चुकीचंही असू शकते.पण परिस्थितीबददल बोलून किंवा त्यागाचे आकडे देऊन मला वाटतं आपण आपली कमजोर बाजू उजागर करत असतो. त्याग तर प्रत्येक माणुस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करतच असतो. तसा मी ही केलेला आहे. त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्तही केलाय. या स्पष्टीकरण मला द्यायचं नाही. पण मला स्वतःला या प्रकारे समोर आणनं आवडत नाही.
मला वाटतं जे करायचं त्यावर पुर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहीजे. मग जगाला आपल्या त्यागाचे आकडे द्यायला वेळच मिळणार नाही. कोणीतरी मला म्हटलं कि आम्ही आमचं ध्येय आणि कशासाठी त्याग करतोय. हे लिहुन ठेवलंय. आणि त्याचा मोबाईलवर फोटोही काढला आहे. जेव्हा कधी आम्हाला आमचं ध्येय विस्मरणात जातं तेव्हा ते वाचुन घेतो, कोप-यात जाऊन रडून घेतो, आणि पुन्हा जोमाने कामाला लागतो. त्यांना जर असं केल्याने नवी उर्जा मिळत असेल तर नक्किच ही चांगली गोष्ट आहे. पण मी माझं ध्येय माझ्या मनावर कोरलंय. आणि ते कधीच विस्मरणात जाऊ देत नाही. म्हणुन डोळ्यातुन अश्रू गाळण्याचा प्रसंगच ओढावत नाही. माझे लक्ष फक्त माझ्या ध्येयावर केंद्रित असतं.
पण त्यांनी ठरवलेलं ध्येय, केलेला त्याग आणि ते गाठण्यासाठी ठेवलेला संयम खरोखरचं कौतुकास्पद वाटला.
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये तरुणों में व्याप्त व्यसन जैसी एक सामाजिक समस्या पर विचारणीय आलेख “व्यसनाच्या आहारी गेलेला तरूण वर्ग”)
☆ समाज पारावरून – साप्ताहिक स्तंभ – पुष्प दहावे # 10 ☆
☆ व्यसनाच्या आहारी गेलेला तरूण वर्ग ☆
माणसाला माणूस जोडण्याचे, माणसात रहाण्याचे व्यसन असावे असे संस्कार आमच्या वर झाले. त्यामुळे व्यसनाधीनता हा विषय जिव्हाळ्याचा वाटला. आजची तरुण पिढी मुबलक पैसा, कुतूहल, अनुकरण आणि सुखासीन आयुष्य जगण्याची सवय यामुळे जास्तीत जास्त व्यसनाधीन होत आहे. समाज पारावरून हा विषय हाताळताना अनेक पैलू समोर येतात. वर वर साधी वाटणारी ही समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे.
मी माझ्या मुलाला काहीही कमी पडू देणार नाही ही पालकांची भूमिका पाल्याला व्यसनी बनवायला कारणीभूत ठरते आहे. कुटुंबातील नात्यांमधे हरवत चाललेला संवाद हे ही प्रमुख कारण आहेच. एकटे रहाण्याची सवय व्यसनाला पोषक वातावरण तयार करते आणि समवयस्क मुलांना असलेली व्यसने संगती दोषामुळे आपोआप स्वतःला चिकटतात. तारूण्यात असलेली बेफिकीर वृत्ती व्यसनाला कारणीभूत ठरते. काही होत नाही कर ट्राय ही चिथावणी सार आयुष्य बरबाद करते.
घर दार, कुटुंब , म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आतच आजचा तरूण व्यसनाधीन होतो आहे. अंगावर कौटुंबिक जबाबदाऱ्या नसल्याने खुशालचेंडू आयुष्य जगणारा युवक स्वतःसाठी जास्त जगताना आढळतो. हे स्वतःसाठी जगणे म्हणजे हवे तसे जगणे असा अर्थ घेऊन तो जगतो आहे. पैसा हे मूळ कारण यात कारणीभूत आहे. पैसा कमवायची सवय, गरज निर्माण होण्याआधी तो खर्च कसा करायचा याचा विचार करणारी तरूण पिढी व्यसनाच्या इतकी आहारी जाते की ते व्यसन त्यांच्या जगण्याच्या एक भाग होऊन बसते.
एखाद्या कुट॔बात वडिल धारे व्यसनी असतील तर मात्र तरूण पिढी आपोआपच व्यसनाधीन होते. समाजरूढी परंपरा यामुळे घरची स्त्री अजूनही सजगतेने या व्यसनी व्यक्तीला सांभाळून घरदार सावरत आहे. ताण तणाव दुंख निराशा या भावना स्त्रीयांनाही आहेत. पण जबाबदारी माणसाला माणूस बनवते आणि या मुळेच स्त्रीया कणखर पणे यातून मार्ग काढीत आहेत. नव्या पिढीच्या काही तरूणी व्यसनाधीन होत आहेत त्याला कौटुंबिक वातावरण जास्त जबाबदार आहे.
नशा, दारू हे व्यवसाय समाजान वाढवले आहेत. आणि हा समाज आपणच आहोत तेव्हा वैयक्तिक पातळीवर आपण व्यसनाधीनतेला आळा कसा घालता येईल यावर जास्त कठोर पणे उपाययोजना करायला हवी. मुलगा वयात येताना बापाने व्यसनाधीनतेचे प्रदर्शन टाळले आणि मुलाशी सुसंवाद साधला तरी मुलगा व्यसनापासून दूर राहू शकतो. चांगले झाले तर मी केले आणि वाईट झाले तर देवाने, नशीबाने, सरकारने केले ही विचारधारा जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत हे सरकार देखील यात काही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही असे मला वाटते.
व्यसनाधीनता रोखणे आपल्या हातात आहे पण व्यसनाधीनता थांवण्यासाठी सरकारला दोष देणे मला पटत नाही. सर्व दोष व्यक्ती कडे असताना परीस्थिती हाताबाहेर गेल्यावर सरकारकडून मदतयाचना करणे हा या समस्येवर तोडगा नाही. आपण समजूत दार आहोत.
आम्ही व्यसन मर्यादित ठेवले आहे अशी फुशारकी मारणारे देखील कौटुंबिक संवादात अपयशी ठरले आहेत. तेव्हा व्यसन ही समस्या गंभीर आहे ती सोडविण्यास जागरूकता महत्वाची आहे. जबाबदारी पेलताना माणूस म्हणून वैचारिक संस्कार सुशिक्षित पिढीवर करण्याची वेळ आली आहे. तंबाखू, दारू, सिगारेट नशा हे सर्व आपण स्वीकारलेले विकार आहेत त्याचा विनाश करण्यासाठी त्यांचा त्याग करणे, हा मोह टाळणे अतिशय योग्य आहे.
दुसऱ्याला अमूक एक गोष्ट करू नको हे सांगण्यापेक्षा आपल्या माणसाला व स्वतःला (जर व्यसन असेल तर )परावृत्त करणे जास्त सोपे आहे. तरूण आपणही होतो. आपण केलेल्या चुका मुलांनी करू नये एवढी काळजी जरी प्रत्येकाने घेतली तरी तरूण पिढी यातून वाचू शकेल.
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है। इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है एक आध्यात्मिक अनुभव पर आधारित आलेख प्रमाते मनीं राम चिंतीत जावा। )
☆ प्रमाते मनीं राम चिंतीत जावा☆
श्रीसमर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात पुन्ह:पुन्हा “प्रभाते मनीं राम चिंतीत जावा “असं कां बरं सांगताहेत कारण त्यांना मन चांगलं समजलं होतं.मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार जर कुणाचं चिंतन निवडायचं असेल तर ज्याच्यामुळे आपलं जीवन आनंदस्वरुप होईल.कारण सर्वजण आनंदाच्या मागे धावताहेत आणि ‘राम ‘ म्हणजे प्रत्यक्ष ‘आनंदघन ‘!.
आता रामाचं नाव ‘प्रभाते ‘कां घ्यायचं तर यावेळी हवेत ओझोन वायूचं प्रमाण अधिक असल्यानं खूप आल्हाददायक वातावरण असते व अशा शांत वेळी एखादी माऊली जात्यावर दळण दळताना घरातल्यांना
उदंड औक्ष मागत असते.
मी २०१३ साली ‘मनोबोध विशारद ‘ चा अभ्यास करत होते त्यावेळी ‘प्रभाते ‘ या एकाच शब्दाचे किती पैलू आहेत हे लक्षात आलं.योगायोगाने मी त्याच कालावधीत १५ दिवस ‘यवतेश्वर (सातारा -कास रस्ता ) येथील ‘प्रकृति रिसाॅर्ट येथे शरीरशुद्धी साठी वास्तव्यास होते.श्रीसमर्थांची योजना पहा ? तिथं मला मैत्रीण मिळाली तीही समर्थसेवक ! झालं..आमची इतकी छान गट्टी जमली! शरीराबरोबर मनाची शुद्धी हवी नां ? रिसाॅर्टमध्ये सतत आम्ही भेटलो की आमच्या गप्पा असायच्या त्या समर्थांवरच ! तिचा अभ्यास तसा माझ्यापेक्षा बराच अधिक होता.म्हणून मी तिला म्हटलं ‘मला प्रभाते मनीं …या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे….तेव्हा ती म्हणाली हो…सांगेन नां… !
दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे उठल्यावर तिथले काही उपचार घेऊन जरा फिरून यावं म्हणून दोघीही बाहेर पडलो.पाहिलं तर पूर्वेला सुंदर अरुण रक्तिमा सर्वदूर आकाशात उधळला होता.उत्तरेकडे समोर कण्हेर जलाशयाचं नयनमनोहर निळशार पाणी स्तब्ध वाटत होतं.भोवतालचे डोंगर,झाडे अजून ध्यानस्थ बसल्यागत वाटत होती.थोड्याच वेळात दिव्यतेज दीप्तिमान सूर्यदेवाचं दर्शन होणार होतं.
आता पक्षीही कर्णमधुर अशा आपापल्या भाषेत जणू ‘श्रीराम श्रीराम ‘ म्हणत होते असंच वाटत होतं.
मैत्रीण म्हणाली “बघ श्रीरामाचं चिंतन करायला या वेळेसारखी सुवर्णवेळा हीच ! नाही कां गं ..?
प्रभात म्हणजे ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय तर असं म्हणतात की,पहाटे साडेतीन ते पाच यावेळेत सत्वगुणाचा उदय झालेला असतो . अशावेळी आपले पूर्वीचे ऋषीमुनी गुप्त आत्म्याच्या रुपानं अवकाशात भ्रमण करीत असतात त्यावेळी आपण घेत असलेल्या नामाच्या लहरी त्यांचेपर्यंत जाऊन पोहोचतात व तेथून ते आपल्याला अद्वितीय अशी शक्ती प्रदान करतात व त्यामुळे आपली जिज्ञासू वृत्ती वाढते व अध्यात्मिक प्रगती होते, “म्हणून
‘प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ‘!
श्रीरामाचं स्मरण रामप्रहरी केल्याने
त्याच्याकडच्या चांगल्या गुणांमुळे नाम घेणाऱ्याच्या मनातही चांगले बदल होतात व हे बदल समाजाच्या हिताचे असतात.त्यामुळे चांगल्या माणसांची संख्या वाढून समाजमन चांगले होण्यास मदत होते.आजच्या युगात चांगल्या माणसांची नितांत गरज आहे.
(श्रीमती रंजना मधुकरराव लसणे जी हमारी पीढ़ी की वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं। सुश्री रंजना एक अत्यंत संवेदनशील शिक्षिका एवं साहित्यकार हैं। सुश्री रंजना जी का साहित्य जमीन से जुड़ा है एवं समाज में एक सकारात्मक संदेश देता है। निश्चित ही उनके साहित्य की अपनी एक अलग पहचान है। आप उनकी अतिसुन्दर ज्ञानवर्धक रचनाएँ प्रत्येक सोमवार को पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है उनके द्वारा बच्चों के लिए नवीन तकनीकी ज्ञान (विशेषकर मोबाइल, टेलिविजन चैनल एवं मीडिया की महत्ता पर आधारित बच्चों एवं बड़ों के लिए भी ज्ञानवर्धक आलेख “ आधुनिक तंत्रज्ञान मुलां-मुलींसाठी योग्य की अयोग्य ???”।)
साप्ताहिक स्तम्भ – रंजना जी यांचे साहित्य #-9
आधुनिक तंत्रज्ञान मुलां-मुलींसाठी योग्य की अयोग्य ???
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि भाऊ, बहीण, दीर इत्यादी नातेवाईकांकडे जाण्याचे योग आले. यांची चुणचुणीत नातवंड पाहून खूप प्रसंन्न वाटलं. गप्पा मारत त्यांनी आम्हा दोघांच्याही मोबाईलचा नकळत ताबा घेतला, अगदी पासवर्ड सहीत. आमची मुले मोठी असल्यामुळे मोबाईलवर गेम्स नव्हते त्यांनी हवे ते डाऊन लोड करून घेतले व ती खेळण्यात रंगून गेली. तीन मुलं असूनही घरं अगदी चिडीचूप, कधीतरी खेळण्यात लवकर नंबर लागला नाहीतर तक्रार येई. अगदी के जी ते तिसरी चौथीची मुलं परंतु मोबाईलचा अचूक सफाईदार वापर पाहून नवीन पिढीच्या कौशल्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे असं वाटून गेलं.
कारण स्क्रीन टच मोबाईल वापरताना सुरूवातीला लागलेली पुरेवाट आठवली की आजही हसायला आल्या शिवाय राहत नाही. फक्त गेम नव्हे तर गाणी, गोष्टी, अनेक कार्यानुभवाच्या कलाकृती अभ्यासक्रमाचे सुद्धा अनेक व्हिडीओ त्यांनी मला वापरून दाखवले.
अवघड वाटणारा इतिहास नाट्य रूपात एकदम सोप्या पद्धतीने मुलांच्या सहज गळी उतरवता येऊ शकतो म्हणण्यापेक्षा तो अगदी आनंददायी पद्धतीने मुलांना हसत खेळत शिकता येतो. कठीण वाटणाऱ्या गणिताच्या अनेक मनोरंजक पद्धती मुलांना समजावून देता येतात विज्ञानाचे अनेक प्रयोग प्रत्यक्ष पाहाता येतील भूगोलाच्या भूकंप, भूगोलार्धाची रचना, ग्रह तारे सुर्यमाला, उल्कापात, चंद्रावरील मोहीम , मंगळाच्या संदर्भातील दृश्य माहितीपट अशा अनेक संकल्पना अगदी सहज आणि क्षणार्धात समोर हजर करणारे इंटरनेट म्हणजे पृथ्वीवरील अल्लाउद्दीनचा चिराग म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आमच्या लहानपणी एखादी आलेली शंका कुणाला विचारायची हा फार मोठा प्रश्न असायचा कारण ती माहिती कुठे मिळेल हे शोधणे आणि ज्यांना माहीत आहेत ते मुलांच्या प्रश्नांना किती महत्व देतील हाही प्रश्नच! परंतु इंटरनेट हे मुलांच्या अनेक प्रश्नांची अचूक हमखास उत्तरे देणाऱ्या बिरबला सारखे रत्न आहे म्हणावे लागेल.
थोड्या मोठ्या वयोगटातील मुले तंत्रज्ञानाचा आणखी कल्पकतेने वापर करताना दिसतात. संदर्भ ग्रंथ अभ्यासणे, आवडत्या लेखक/कविंचे संग्रह अभ्यासणे, बुद्धीबळासारखे बौद्धिक खेळ खेळणे. मित्र मैत्रीणींशी गप्पागोष्टी मेसेज मेल इत्यादीचा कौशल्याने उपयोग करतात आणखी एक सर्वांचाआवडता उपयोग म्हणजे ज्या मालिका टीव्हीवर पाहता येत नाहीत त्या मोबाईलचा वापर करून पाहताना दिसतात.
एक ना दोन हजारो फायदे या तंत्रज्ञानाचे असले तरीसुद्धा त्याची दुसरी बाजू सुद्धा मानवी जीवनासाठी तितकीच महत्त्वाची आहे म्हणून या बाबीचाही तितकाच सखोल अभ्यास आणि विचार करणे महत्त्वाचे आहे.
सुरूवात खेळा पासूनच करूयात थोडंस आपल्या बालपणात जाऊयात. भन्नाट मैदानी खेळ, मित्राच्या टाळ्या, हशा, प्रोत्साहन, जिंकल्याचा आनंद, हारल्याची खंत पण पुन्हा नव्याने जिंकण्याची जिद्द, यातूनच अपयश पचवण्याची, संकटांना पराजयाला हसत मुखाने सामोरे जाण्याची खिलाडू वृत्ती, इत्यादी गुण खेळातून कळत नकळत अंगी बाणवले जात. परस्पर प्रेम, सहकार्य, घाम गळे पर्यंत घेतलेली अंग मेहनत, मुक्त आनंददायी हालचाली, मोठ्यांचा खोटाच राग/ ओरडा. सारं काही चित्ताकर्षक, मनाला भुरळ घालणारे आजही हवेहवेसे वाटणारे क्षण खरोखरच आजकालच्या एका ठिकाणी बसून गेम खेळणाऱ्या मुलांना अनुभवायला मिळतात का? हा प्रश्न मनाला विचारलं तरं उत्तर नक्कीच नाही असं येईल, कुठे गल्ली गोळा होई पर्यंत आरडाओरडा करणारे आपण आणि राग चीड आनंद व्यक्त करण्यासाठी स्वतःशीच पुटपुटणारी, भावना दाबून जगणारी आजकालची मुलं पाहिली की यांच्या भावनांचा उद्रेक हा ज्वालामुखीच्या उद्रेका पेक्षाही किती भयानक असेल असेल याची कल्पनाही करवत नाही.
आपल्या लहानपणी मुलं दिवसाकाठी रिकामा मिळालेला जास्तीतजास्त वेळ खेळ गप्पागोष्टी यासाठी वापरत असत, त्यामुळे भरपूर व्यायाम होऊन आरोग्य शारीरिक सुधारण्यास मदत होत असे. गप्पागोष्टीमुळे मुलांचे संभाषण कौशल्य विकसित होई शिवाय परस्पर नाते संबंध दृढ आणि जिव्हाळ्याचे बनत .अभिव्यक्तीला वाव मिळाल्यामुळे मनातील सल, दुःख, वेदना कमी होण्यास मदत होऊन शारीरिक आरोग्या सोबतच मानसिक आरोग्य सुद्धा संतुलित राहत असे परंतु हल्लीच्या मुलांच्या खूप वेळ एकाच जागी बसून शरीरावर, डोळ्यांवर ताण येऊन शारीरिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय मुले एक्कलकोंडी हट्टी चिडचिडी होत चालली आहेत ही गोष्ट वेगळीच!
मुख्य म्हणजे हे सगळे गेम खेळायचे म्हणजे मोबाईल हवा नेट पॕक हवे. म्हणजे जो आनंद फुकट काच कांगऱ्या, बुद्धीबळ, कॕरम, भातुकली खेळभांडे, शाळा शाळा, खार कबुतर या सारखे बैठे खेळ व चिपलंग, लंगडी, खो-खो, कब्बडी, लपंडाव अंधळी कोशिंबीर यासारख्या मैदानी खेळातून मित्रांसोबत अतिशय धमाल मस्ती करून मिळायचा तोच आनंद विकत आणि तोही तुटपुंजा आनंद किती खेदाची बाब आहे ही! पुन्हा त्यात ज्यांचा मोबाईल भारीचा तो शेखी मिरवणार म्हणजे खेळाच्या निर्मळ आनंदावर विरझन पडणार ते वेगळंच.
दुसरी बाब म्हणाल, तर आपल्या लहानपणीचा रेडिओ असो की, पुढील काळातील दूरदर्शन असो. अगदी आजी आजोबाचे भजन, बाबांच्या बातम्या, आईची आपली आवड असो की ताई दादांची युवावाणी, किंवा आपलं बालजगत सगळं प्रत्येकाला इतरांसाठी का असेना ऐकावंच लागे. त्याचा परिणाम म्हणून कळत नकळत एक सर्वगुण संपन्न व्यक्तीमत्व आकाराला येई . घरातील इतरांच्या आवडी निवडी,मते यांचा आदर करणे, त्यांची मते जाणून घेणे या गोष्टी सहज साध्य होत परंतु आज मुले कार्टून शो तासन् तास पाहताना किंवा गेम खेळताना दिसतात .पालक सुद्धा मुलं शांत बसलेली आहेत यातच धन्यता मानत असतात परंतु भाऊ- बहीण, आई- वडील, मित्र- मैत्रीणी यांच्यातील संवाद संपत चालला आहे. मुख्य म्हणजे आजी आजोबांची गोष्टी सांगण्यासाठी नातवंडांची सलगी एक स्वर्गीय आनंददायी जिव्हाळा पार नाहीसा झाला आहे. माणूस तंत्रज्ञानाला कवटाळण्याच्या नादात माणूस आणि माणुसकी पासून फारकत घेतो आहे असं खेदाने म्हणावं लागत आहे. मोबाईल टीव्ही यासारख्या माध्यमांचा अतिशयोक्ती वाटावी असा वापर मुलांच्या नव्हे तर कुटुंब आणि समाज व्यवस्थेच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी नक्कीच घातक आहे, ही बाबही नक्कीच दुर्लक्षीत करून चालणार नाही.
‘सुग्रास अन्न शिजवणारा अग्नी घर पेटवण्याचे विघातक कृत्य करू शकतो तद्वतच मानवाच्या उन्नतीसाठी असलेले तंत्रज्ञान अधोगतीचे कारण व्हायला वेळ लागणार नाही’ याचा विसर पडता कामा नये.
म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर मुलांसाठी पालक/ शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने ठराविक वेळेचे बंधन पाळून.. त्यांच्या किंवा अन्य जाणकारांच्या नियंत्रणाखाली व योग्य प्रमाणातच होणे आवश्यक आहे.
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी के साप्ताहिक स्तम्भ – “मी _माझी “ शृंखला की चौदहवीं कड़ी Calligraphy ! ! !। सुश्री आरूशी जी के आलेख मानवीय रिश्तों को भावनात्मक रूप से जोड़ते हैं। सुश्री आरुशी के आलेख पढ़ते-पढ़ते उनके पात्रों को हम अनायास ही अपने जीवन से जुड़ी घटनाओं से जोड़ने लगते हैं और उनमें खो जाते हैं। जिस प्रकार हम वार्तालाप में सुंदर और मन को भाने वाले शब्दों का उपयोग करते हुए अन्य व्यक्तियों के हृदय में अपने प्रति एक अमिट छवि बनाते हैं या हमारी छवि अपने आप बन जाती है। उसी प्रकार कागज पर सुंदर मोतियों जैसे अलंकृत लिपिबद्ध शब्द हमें अनायास ही आत्मसात करने के लिए बाध्य करते हैं। कभी कल्पना कर देखिये। आरुशी जी के संक्षिप्त एवं सार्थकआलेखों का कोई सानी नहीं। उनकी लेखनी को नमन। इस शृंखला की कड़ियाँ आप आगामी प्रत्येक रविवार को पढ़ सकेंगे।)
साप्ताहिक स्तम्भ – मी_माझी – #14
☆ Calligraphy ! ! ! ☆
शब्दांशी खेळताना, शब्दांवर वापरलं जाणारं आणि मला भावलेलं art…
सगळे साज लेऊनी माझ्या भाषेचं सौन्दर्य जेव्हा शब्दांद्वारे कागदावर अवतरतं, तेव्हा ते काळजावर नक्कीच काही तरी कोरून जातं… कायमचं…
एक गमतीशीर तुलना मनात डोकावते…
Make up केलेली अक्षरं…
अक्षरशः हसून हसून डोळ्यात पाणी आलं…
हसायचं काय त्यात, तू नाही स्टेजवर यायच्या आधी मेक अप करत… प्रसंगानुरूप पेहराव नको करायला ! मला आठवण करून देण्यात आली, माझ्याचकडून !
अय्या, खरच की … आपणही बऱ्याच वेळा आपलं सौन्दर्य खुलावण्याचा प्रयत्न करतो.. मग आपल्या अंतर्मनातील जाणिवेला शब्दात जर मांडू शकलो तर तिलाही दगदागिन्यांनी सजवायला काहीच हरकत नाही… हे सुंदर शब्द किती समरस होऊन बोलतात, वागतात, त्यात नवजात अर्भकाचे निरागस हास्य दडलेलं असेल, नवं वधूची आशा असेल, आईची माया असेल, बापाची कडक शिस्त असेल, नात्यांची गुंफण असेल, समाजातील जबाबदारी असेल, शिक्षकाने दिलेली ज्ञानाची पुंजी असेल, घराची सुरक्षितता असेल, पावसाची चिंब भेट असेल, सागराची अथांगता असेल, आभाळाची काळजी असेल किंवा मातीची साथ असेल…
आपले विचार शब्दांद्वारे प्रवाही होत असताना, त्या शब्दांवरील calligraphic संस्कार, शब्दरूपी भावनांना, विचारांना अजून जवळ आणतात, मोत्यांसारखे श्रीमंती थाटात, आपल्या मनावर गारुड घालतात… अंगोपांगी खुलून दिसतात, हो ना !
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं । अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे। आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये शिक्षा के बाजारीकरण जैसी एक सामाजिक समस्या पर विचारणीय आलेख “शिक्षणाचे बाजारीकरण :- एक गंभीर समस्या”)
☆ समाज पारावरून – साप्ताहिक स्तंभ – पुष्प नववे # 9 ☆
☆ शिक्षणाचे बाजारीकरण :- एक गंभीर समस्या ☆
अगदी बालवाडीत प्रवेश घेण्यापासून ते पदवीदान समारंभात उपस्थित रहाण्यापर्यत प्रत्येक ठिकाणी हा बाजार पपहायला मिळतो . शालेय शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक व महाविद्या लयीन शिक्षण प्रत्येक ठिकाणी व्यवहार महत्वाचा झाला आहे. मुलांचे शिक्षण ही गोष्ट पालकांनी प्रेस्टीज इश्यू म्हणून चव्हाटय़ावर आणली आणि शिक्षण संस्थांनी नेमके याच गोष्टींचा फायदा घेऊन शिक्षण क्षेत्रात बाजारीकरण सुरू आहे.
ज्ञानदानाची गुणवत्ता पैशात मोजली जाते. जितके शुल्क अधिक तितका शिक्षण दर्जा उच्च असा गैरसमज पसरल्याने हे बाजारीकरण झपाट्याने वाढते आहे. राखीव मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देताना सुरू झालेले बाजारीकरण शिक्षण क्षेत्रात प्रत्येक विभागात पसरलेले दिसते. पैसा फेको तमाशा देखो, ही प्रवृत्ती शिक्षण क्षेत्रात देखील अमाप पसरली आहे.
वारेमाप पैसे मोजून पदवीधर झालेल्या तरूण तरूणी नोकरी च्या शोधात फिरत आहेत. हवी तशी नोकरी न मिळाल्याने सुशिक्षित बेरोजगार मिळेल तो रोजगार करायला तयार आहे. शिक्षण आणि नोकरी यामध्ये होणारी घुसमट पैशाच्या जोरावर कुटुंबातील मनःशांती नष्ट करीत आहे. आजचा तरुण व्यवसाय प्रशिक्षण घेऊन लवकरात लवकर पैसा कसा मिळेल याकडे लक्ष देताना दिसतो आहे. यातही प्रत्येक वेळी तो यशस्वी होईल याची खात्री नाही. केलेली गुंतवणूक केव्हा फायदेशीर ठरेल हे कुणाला नेमके सांगता येत नाही हे आजचे वास्तव आहे.
शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने पढतमूर्ख किंवा व्यवहार ज्ञान नसलेले सुशिक्षित डिग्री सांभाळत नोकरी शोधायला बाहेर पडले आहेत.
पैसा मिळवून देणारे शिक्षण प्रत्येकाला हवे आहे.
शिक्षण ही ज्ञानाची गंगोत्री आहे हा सुविचार या बाजारात मागे पडला आहे. पारंपरिक शेती व्यवसाय कडे तरूण पिढी चे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. आपला देश कृषी उत्पन्न वर अवलंबून असूनही व्यवसाय निवडताना तरूण पिढी आधुनिक तंत्रज्ञान कडे वळत आहे ही बाब चिंतेची आहे. या शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणामुळे अनुभव पैशात मोजला जात आहे.
समाज पारावरून हा विषय चर्चेला घेताना *रोजगार आणि शिक्षण* हा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो. पैशाला आलेले अवास्तव महत्व आज शिक्षणाचे महत्त्व कमी करत आहे. माणूस शिकलाय किती यापेक्षा तो कमवतो किती हा प्रश्न विचारला जात असल्याने तरूण पिढी पैसा कमवण्याचा उद्देश समोर ठेवूनच व्यवसाय प्रशिक्षण कडे लक्ष देत आहे.
शिक्षण हे माणसाला विचारी, संयमी, कृती शील,संस्कारी बनवते पण सध्या शिक्षण हे पैसा मिळवून देण्यासाठी कसे उपयोगी पडेल याचा विचार प्रत्येक जण करत आहे. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बाजारीकरणाचा फटका खूप मोठा आहे.
अनुदानित, विनाअनुदानीत शाळा यांचे ही प्रश्न अत्यंत बिकट आहेत. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करावी, मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा द्यावा यासाठी सुरू असलेले आंदोलन याचे मूळ या शिक्षण क्षेत्रातील बाजारामुळेच निर्माण झाले आहे. ही बाब खरोखरीच गंभीर आहे. वैयक्तिक पातळीवर योग्य निर्णय घेऊन ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
(आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में उनका आलेख सरोजिनी। यह आलेख पढ़ कर मुझे भी लगा कि बात तो सही है। हमारी उम्र गुजर जाती है किन्तु, हम तय नहीं कर पाते कि ऐसे कौन से व्यक्ति हमें जीवन में मिले जिन्हें हम गुरु कह सकें या मान सकें। सुश्री प्रभा जी ने इस विषय पर अत्यंत सहजता से बता दिया कि हमें शिक्षा तो किसी से भी मिल सकती है। कई बार हम अपने अनुभवों से भी सीखते हैं। किन्तु, जिन्हें हम गुरु मानते हैं वे हमारे हृदय पर अमिट होते हैं, अविस्मरणीय होते हैं।
अब आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी का साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 9 ☆
☆ सरोजिनी ☆
मी सहज विचार करायला लागले की गुरू म्हणावं असं आपल्याला आयुष्यात कोण भेटलं?
गेली अनेक वर्षे मी लिहितेय अगदी शाळेत असल्यापासून,लेखन, संपादन यात मला कुणीही गुरू भेटला नाही, ते घडत गेलं…..
पण आयुष्याच्या शाळेत कसं जगावं, हे मी माझ्या मैत्रीणीच्या आईकडून शिकले….विशेषतः कामवाली बद्दलचा त्यांचा दृष्टिकोन, त्या म्हणायच्या कामवाली च्या फार मागे लागू नये, तिला करायचं तेवढंच ती करते, त्यांच्याकडे हीरा नावाची बाई कामाला होती,ती फारच कामचुकार होती, मैत्रीणीची मोठी बहिण लग्न झालेली, ती माहेरी आली तेव्हा हिराला बोलली, “आई.
बोलत नाही म्हणून तू काहीच करत नाही,आम्ही काय चिंचोके मोजतो का?”
मैत्रीणीच्या आईचं नाव सरोजिनी गायकवाड, त्या स्वतः खुप नीट नेटक्या आणि कष्टाळू होत्या! तरूणपणी त्या शिस्तप्रिय पण प्रेमळ आई होत्या!
त्यांच्यातला एक गुण मला खुप आवडायचा, आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, मीही ती दक्षता नेहमी घेत असते, शेवटपर्यंत त्या निरपेक्ष जगल्या! दुस-याला त्रास न देता आणि स्वतःला त्रास न करून घेता!
आम्ही शिरूर मध्ये असताना माझी आई आणि इतर दोन सरोजिनी शिरूर मध्ये होत्या, मी त्यांच्यावर “तीन सरोजिनी” असा लेख ही लिहिला होता,या तीन सरोजिनी आज नाहीत, त्यांची आयुष्य मला बरंच काही शिकवून गेली!
सरोजिनी म्हणजे कमळ ! या तिन्ही सरोजिनींचे जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातले, त्या काळात “सरोजिनी नायडू” या स्वातंत्र्यलढ्यातील थोर कार्यकर्तीचा प्रभाव असल्यामुळे सरोजिनी हे नाव ठेवलं जात असावं!
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है। इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है एक रेखाचित्र उनके गाँव का जो निश्चित ही निसर्गाचं अमोल दान (निसर्ग का अमोल दान )है। )
☆ निसर्गाचं अमोल दान☆
सातारा आमचं गाव.आमचं घर अजिंक्यताऱ्याच्या पायाशी परळी-सजजनगड-कास रस्त्यावर.पहाटे फिरायला गेलं अन् बोगद्याबाहेर पडलं की,डावीकडं खिंडीतला गणपती-कुरणेश्वर,तर उजवीकडे परळीचा डोंगर अर्थात “सज्जनगड “अन् समोर पसरलेला हिरवागार देखण्या डोंगरांनी सजलेला नयनरम्य परिसर! सारंच सुंदर !!
अजिंक्यताऱ्याच्या दक्षिण बाजूस सोनगावच्या दिशेनं चालायला लागलं की उतारावरुन रात्रभराच्या मुक्कामाला आलेले निळे निळे मोर शेतातले दाणे खाण्यासाठी म्याव,म्याव आवाज करत उतरत असतात,माणसांच्या चाहुलीने ते पुन्हा ओरडत वरच्या दिशेनं पळत सुटतात.
उगवतीला पसरलेली तांबूस छटा पाहून पक्षांचा किलबिलाट सुरू झालेला असतो.मधूनच भारद्वाज पक्षांचा हूं हूं असा आवाज ऐकू येतो, आणि त्याच दर्शन झालं तर खूप छान!अन् त्याचं समोरुन फ्लाईंग दर्शन तर एकदमच भारी !!लहानपणी तर आमच्यासाठी ते खूप अप्रूप वाटायचं !!
पण आज आम्ही फिरायला आलो ते दुपारी,कारण पुण्याचा मुलगा नातू सगळेजण गणपतीसाठी आलेले.म्हणाले चला आपण कासला जाऊया.आणि हा सीझन फुलांचा त्यामुळे पर्वणीच !
कासच्या फुलांचा बहर सुरू झालेला सगळीकडे विविध रंगछटांची सुंदर फुलं बहरलेली दिसत होती.
कास पठार सुरू होण्यापूर्वी रस्त्याकडेच्या दोन्ही बाजूंची शेतं व पठारी भागावर जिकडं नजर जाईल तिकडं पिवळी हडूळ “सोनकीची “फुलं फुललेली दिसत होती.जणूं धरतीनं हळदुल्या रंगाची दुल ई पांघरल्यासारखी वाटत होती.
आम्ही जिथे गाडी थांबवून उभे होतो तिथून डावीकडं उरमोडी जलाशयाच्या लक्ष दर्पणातून सज्जनगडाचं पावन प्रतिबिंब खुणावत होतं,तर उजवीकडं कण्हेर धरणाचं आरस्पानी सौंदर्य डोळे दिपवीत होतं.दोन्ही बाजूंचे डोंगर उनसावलीच्या खेळामुळं हिरव्या-पोपटी रंगाचे रेशमी शेले पांघरुन बसलेत असं वाटतं होतं.किती पहावं आणि काय-काय पहावं असं होतं इथं आलं की !
डोंगर उतारावरुन खाली नजर टाकली की,गावकुसातल्या श्रमदान्यांनी खोदलेल्या चरांची सुंदर नक्षीदार रांगोळी अन् त्यातून खाली वाहून गेलेल्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले पाझर तलाव, छोटीमोठी तळी , हिरवीगार भातशेती,असं निसर्गाचं मनोहारी दृश्य दिसत होतं.
खरोखरी निसर्गदेवता मानवाला किती भरभरून देत असते.पण त्यानं ते जपलं नाही, वृक्षतोड,वणवे लावणं असं केलं तर आपणच आपल्या हातानं आपला ” केरळ उत्तरांचल “करु हे प्रत्येकानं लक्षात घ्यावं व निसर्गाच्या या अनमोल ठेव्याला अबाधित राखावं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे.!
दिवस मावळायला आला होता म्हटलं आता निघायला हवं तेवढ्यात भटकंतीला गेलेले माझे नातू मुलगे सुना सगळे आले अन् मला मोबाईलमध्ये काढलेले सुंदर कासची फुलं, सूर्यास्ताचे फोटो दाखवूलागले मी पाहिले तुम्हीही पहा..!!!