कविराज विजय यशवंत सातपुते

 

(समाज , संस्कृति, साहित्य में  ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले  कविराज विजय यशवंत सातपुते जी  की  सोशल मीडिया  की  टेगलाइन माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक,  सांस्कृतिक  एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं  ।  अब आप प्रत्येक शुक्रवार को उनके मानवीय संवेदना के सकारात्मक साहित्य को पढ़ सकेंगे।  आज इस लेखमाला की शृंखला में पढ़िये  शिक्षा के बाजारीकरण जैसी एक सामाजिक  समस्या पर विचारणीय आलेख “शिक्षणाचे बाजारीकरण :- एक गंभीर समस्या”)

 

☆ समाज पारावरून – साप्ताहिक स्तंभ  – पुष्प  नववे  # 9 ☆

 

☆ शिक्षणाचे बाजारीकरण :- एक गंभीर समस्या ☆

 

अगदी बालवाडीत प्रवेश घेण्यापासून ते पदवीदान समारंभात  उपस्थित रहाण्यापर्यत   प्रत्येक ठिकाणी  हा बाजार पपहायला मिळतो . शालेय शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक व  महाविद्या लयीन शिक्षण प्रत्येक ठिकाणी व्यवहार महत्वाचा झाला आहे. मुलांचे शिक्षण ही गोष्ट पालकांनी प्रेस्टीज इश्यू म्हणून चव्हाटय़ावर  आणली  आणि शिक्षण संस्थांनी नेमके याच गोष्टींचा फायदा घेऊन शिक्षण क्षेत्रात बाजारीकरण सुरू आहे.

ज्ञानदानाची गुणवत्ता पैशात मोजली जाते.  जितके शुल्क  अधिक तितका शिक्षण दर्जा  उच्च  असा गैरसमज पसरल्याने हे बाजारीकरण झपाट्याने वाढते आहे. राखीव मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देताना सुरू झालेले बाजारीकरण शिक्षण क्षेत्रात प्रत्येक विभागात पसरलेले दिसते. पैसा फेको तमाशा देखो,  ही प्रवृत्ती शिक्षण क्षेत्रात देखील  अमाप पसरली आहे.

वारेमाप पैसे मोजून पदवीधर झालेल्या तरूण तरूणी नोकरी च्या शोधात फिरत आहेत. हवी तशी नोकरी न मिळाल्याने सुशिक्षित बेरोजगार मिळेल तो रोजगार करायला तयार आहे. शिक्षण आणि नोकरी  यामध्ये होणारी घुसमट पैशाच्या जोरावर कुटुंबातील मनःशांती नष्ट करीत आहे. आजचा तरुण व्यवसाय प्रशिक्षण घेऊन लवकरात लवकर पैसा कसा मिळेल याकडे लक्ष देताना दिसतो आहे. यातही प्रत्येक वेळी तो यशस्वी होईल याची खात्री नाही.  केलेली गुंतवणूक  केव्हा फायदेशीर ठरेल हे कुणाला नेमके सांगता येत नाही हे  आजचे वास्तव आहे.

शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने पढतमूर्ख किंवा  व्यवहार  ज्ञान नसलेले सुशिक्षित डिग्री सांभाळत नोकरी शोधायला बाहेर पडले आहेत.

पैसा मिळवून देणारे शिक्षण प्रत्येकाला हवे आहे.

शिक्षण ही  ज्ञानाची गंगोत्री आहे  हा  सुविचार या  बाजारात मागे पडला आहे. पारंपरिक शेती व्यवसाय कडे  तरूण पिढी चे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.  आपला देश कृषी उत्पन्न वर अवलंबून असूनही व्यवसाय निवडताना तरूण पिढी  आधुनिक तंत्रज्ञान कडे वळत आहे ही बाब चिंतेची  आहे.  या शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरणामुळे अनुभव पैशात मोजला जात आहे.

समाज पारावरून  हा विषय चर्चेला घेताना  *रोजगार  आणि शिक्षण* हा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो.   पैशाला  आलेले  अवास्तव महत्व  आज शिक्षणाचे महत्त्व कमी करत आहे.  माणूस शिकलाय किती यापेक्षा तो कमवतो किती हा प्रश्न विचारला जात  असल्याने तरूण पिढी पैसा कमवण्याचा  उद्देश समोर ठेवूनच व्यवसाय प्रशिक्षण कडे लक्ष देत आहे.

शिक्षण हे  माणसाला विचारी,  संयमी, कृती शील,संस्कारी बनवते पण सध्या शिक्षण हे पैसा मिळवून देण्यासाठी कसे  उपयोगी पडेल याचा विचार प्रत्येक जण करत आहे. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बाजारीकरणाचा फटका खूप मोठा आहे.

अनुदानित,  विनाअनुदानीत शाळा  यांचे ही प्रश्न  अत्यंत बिकट आहेत.  महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करावी,  मराठी भाषेला  अभिजाततेचा दर्जा द्यावा  यासाठी सुरू असलेले आंदोलन याचे मूळ  या  शिक्षण  क्षेत्रातील  बाजारामुळेच निर्माण झाले आहे. ही बाब  खरोखरीच  गंभीर आहे. वैयक्तिक पातळीवर योग्य निर्णय घेऊन ठोस पावले  उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

धन्यवाद.

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

सुरेख लेख, समाज पारावरून-शिक्षणाचे बाजारीकरण