श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है।  इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। आज प्रस्तुत है  एक आध्यात्मिक  अनुभव पर आधारित आलेख  प्रमाते मनीं राम चिंतीत जावा। 

 

☆ प्रमाते मनीं राम चिंतीत जावा☆

श्रीसमर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात पुन्ह:पुन्हा “प्रभाते मनीं राम चिंतीत जावा “असं कां बरं सांगताहेत कारण त्यांना मन चांगलं समजलं होतं.मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार जर कुणाचं चिंतन निवडायचं असेल तर ज्याच्यामुळे आपलं जीवन आनंदस्वरुप होईल.कारण सर्वजण आनंदाच्या मागे धावताहेत आणि ‘राम ‘ म्हणजे प्रत्यक्ष ‘आनंदघन ‘!.

आता रामाचं नाव ‘प्रभाते ‘कां घ्यायचं तर यावेळी हवेत ओझोन वायूचं प्रमाण अधिक असल्यानं खूप आल्हाददायक वातावरण असते व अशा शांत वेळी एखादी माऊली जात्यावर दळण दळताना  घरातल्यांना

उदंड औक्ष मागत असते.

मी २०१३ साली ‘मनोबोध विशारद ‘ चा अभ्यास करत होते त्यावेळी ‘प्रभाते ‘ या एकाच शब्दाचे किती पैलू आहेत हे लक्षात आलं.योगायोगाने मी त्याच कालावधीत  १५ दिवस ‘यवतेश्वर (सातारा -कास रस्ता ) येथील ‘प्रकृति रिसाॅर्ट येथे शरीरशुद्धी साठी वास्तव्यास होते.श्रीसमर्थांची योजना पहा ? तिथं मला मैत्रीण मिळाली तीही समर्थसेवक ! झालं..आमची इतकी छान गट्टी जमली! शरीराबरोबर मनाची शुद्धी हवी नां ? रिसाॅर्टमध्ये सतत आम्ही भेटलो की आमच्या गप्पा असायच्या त्या समर्थांवरच ! तिचा अभ्यास तसा माझ्यापेक्षा बराच अधिक होता.म्हणून मी तिला म्हटलं ‘मला प्रभाते मनीं …या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे….तेव्हा ती म्हणाली हो…सांगेन नां… !

दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे उठल्यावर तिथले काही उपचार घेऊन जरा फिरून यावं म्हणून दोघीही बाहेर पडलो.पाहिलं तर पूर्वेला सुंदर अरुण रक्तिमा सर्वदूर आकाशात उधळला होता.उत्तरेकडे समोर कण्हेर जलाशयाचं नयनमनोहर निळशार पाणी स्तब्ध वाटत होतं.भोवतालचे डोंगर,झाडे अजून ध्यानस्थ बसल्यागत वाटत होती.थोड्याच वेळात दिव्यतेज दीप्तिमान सूर्यदेवाचं दर्शन होणार होतं.

आता पक्षीही कर्णमधुर अशा आपापल्या भाषेत जणू ‘श्रीराम श्रीराम ‘ म्हणत होते असंच वाटत होतं.

मैत्रीण म्हणाली “बघ श्रीरामाचं चिंतन करायला या वेळेसारखी सुवर्णवेळा हीच ! नाही कां गं ..?

प्रभात म्हणजे ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय तर असं म्हणतात की,पहाटे साडेतीन ते पाच यावेळेत सत्वगुणाचा उदय झालेला असतो . अशावेळी आपले पूर्वीचे ऋषीमुनी गुप्त आत्म्याच्या रुपानं अवकाशात भ्रमण करीत असतात त्यावेळी आपण घेत असलेल्या नामाच्या लहरी त्यांचेपर्यंत जाऊन पोहोचतात व तेथून  ते आपल्याला अद्वितीय अशी शक्ती प्रदान करतात व त्यामुळे आपली जिज्ञासू वृत्ती वाढते व अध्यात्मिक प्रगती होते, “म्हणून

‘प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ‘!

श्रीरामाचं स्मरण रामप्रहरी केल्याने

त्याच्याकडच्या चांगल्या गुणांमुळे नाम घेणाऱ्याच्या मनातही चांगले बदल होतात व हे बदल समाजाच्या हिताचे असतात.त्यामुळे चांगल्या माणसांची संख्या वाढून समाजमन चांगले होण्यास मदत होते.आजच्या युगात चांगल्या माणसांची नितांत गरज आहे.

‘जयजयरघुवीर समर्थ ‘!

©® उर्मिला इंगळे

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
अनिल इंगळे

‘प्रभात’ या शब्दाचा अन्वय खुप सुंदर विषद केला आहे. आपली मराठी भाषा खुप सम्रूध्द आहे, हे आणि असे लेखन सर्व दूर पोहोचले पाहिजे.