मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वारी पंढरीची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ वारी पंढरीची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆

(अष्टाक्षरी)

वारी चाले पंढरीला,

टाळ, चिपळ्या, मृदुंग !

साथी घेतल्या घेतल्या,

भरून ये  अंतरंग !

 

पंढरीचे वारकरी ,

धाव घेती वाटेवरी !

असे सर्वांचीच प्रीती,

विठूच्या राऊळावरी !

 

वाट असे ती लांबची,

पाउलांना होतो त्रास!

विठू माऊली भेटीचा,

सर्वांना लागला ध्यास!

 

भजनात रंगे रात्र,

पहाट ये उत्साहात!

पुढचा मार्ग सरे तो,

श्री विठ्ठलाच्या ध्यासात!

 

 विठुराया आणि कृष्ण,

 दोन्ही असे एकरूप !

 जुळती हात भक्तांचे,

 आठवता आपोआप!

 

 ध्यान जसे करू मनी,

तसे रुप  येई ध्यानी !

एका सृष्टी नियंत्याची,

ही अनंत रूपे जनी!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #145 ☆ अत्तर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 145 ?

☆ अत्तर…

काळोखाच्या कुपीत थोडे असते अत्तर

प्रणय विरांच्या भेटीसाठी झुरते अत्तर

 

परिश्रमाचे बाळकडू जो प्याला आहे

त्या देहाला सांगा कोठे कळते अत्तर

 

वास मातिचा ज्या सदऱ्याला येतो आहे

त्या सदऱ्याला पाहुन येथे हसते अत्तर

 

शौकीनांच्या गाड्यांसोबत असते कायम

खिशात नाही दमडी त्यावर रुसते अत्तर

 

शांत घराच्या चौकटीत हे कुठे थांबते

कायम उनाड वाऱ्यासोबत दिसते अत्तर

 

संस्काराच्या घरात झाला जन्म तरीही

नाठाळाच्या मागे का हे फिरते अत्तर ?

 

तुझ्या स्मृतीचे स्मरण मनाला होते तेव्हा

हळूच माझ्या डोळ्यांमधुनी झरते अत्तर

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || वारकरी || ☆ श्री आनंदराव रघुनाथ जाधव ☆

श्री आनंदराव रघुनाथ जाधव

? कवितेचा उत्सव ?

☆ || वारकरी || ☆ श्री आनंदराव जाधव ☆

सावळा विठ्ठल | कर कटेवरी ||

उभा विटेवरी | युगे युगे || १ ||

 

भाळी गंध टिळा | वैजयंती गळा ||

नामाचा सोहळा | पांडुरंग || २ ||

 

पायी दिंडी चाले | भोळा वारकरी ||

भक्त माळकरी | विठ्ठलाचा || ३ ||

 

आषाढी कार्तिकी | भक्तजन येती ||

विठूनाम घेती | सदा मुखी || ४ ||

 

टाळ टाळी वाजे | चंद्रभागे काठी ||

विठुराया साठी | गळा भेटी || ५ ||

 

पंढरी वसते | भक्तांची माऊली ||

प्रेमाची सावली | माय बाप || ६ ||

 

पांडुरंग हरी | पांडुरंग हरी ||

नामघोष वारी | देवा दारी || ७ ||

© आनंदराव रघुनाथ जाधव

पत्ता  – खणभाग, भारत चौक, शिवगर्जना मार्ग, “श्री ज्योतिर्लिंग”, २०७, सांगली.. संपर्क…८८३०२००३८९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 87 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 87 ? 

☆ अभंग… ☆

तयाचीये नावे, चालला प्रवास

येईल सुवास, लवकरी..!!

 

दुस्तर दुर्गम्य, अवघड भारी

अशी माझी वारी, त्याच्यासाठी..!!

 

नाही तमा आता, नच काही भीती

शुद्ध माझी मती, तोच ठेवी..!!

 

कवी राज म्हणे, माझा भगवंत

आहे दयावंत, इहलोकी..!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 18 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 18 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

२५.

माझ्या विश्वासू मित्रा!

या भयाण रात्री

कसलाही प्रयत्न न करता

मला निद्रेच्या स्वाधीन होऊ दे.

कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.

 

तुझ्या पूजनाची सिध्दता करायची

धडपड माझ्या उतरत्या उमेदीकडून नको.

 

दिवसाच्या थकलेल्या डोळ्यावर

रात्रीचा पडदा तूच ओढतोस

आणि जाग आल्यावर आनंदानं,

चैतन्याने त्या डोळ्यातले तेज

नव्याने चमकत, झळाळत ठेवतोस.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आलो चुकून येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आलो चुकून येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : रसना)

(लगावली : गागाल गालगागा  गागाल गालगागा)

आलो चुकून येथे भूमी न परिचयाची

मी भोगितो सजा ही येथे चुकावयाची !

 

फुटलो उरी कितीही या शुष्क कातळांना

कळणार ना कधीही ती गोष्ट भंगण्याची !

 

झाकून सूर्य ठेवा देऊ नकाच ओल

ही कोडगी बियाणी सृजनास यावयाची !

 

जाळ्यास त्या रुपेरी फसणार कोण आता

पंखास पाखराच्या बाधा दिगंतराची !…….

 

काळोख पेरणारे सारेच सूर्य तुमचे

नाही पुजावयाची ती दैवते भ्रमाची !

 

झाला न डंख रक्ता त्या धूर्त प्रेषितांचा

झाली म्हणून फत्ते माझ्या खुळ्या क्रुसाची !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समृध्द रान!… ☆ सौ ऐश्वर्या परांजपे ☆

सौ ऐश्वर्या परांजपे

संक्षिप्त परिचय – 

शिक्षा – B.Sc., B.Lib. Sc.

सम्प्रति – लायब्ररीयन म्हणून सर्विस केली.

सायन्सची विद्यार्थिनी असले तरी ओढा साहित्याकडेच.

“सखी” ह्या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली .

? कवितेचा उत्सव ?

☆ समृध्द रान!… ☆ सौ ऐश्वर्या परांजपे ☆

(भ्रष्ट व निर्लज्ज राजकारणी व तितकाच बेजबाबदार,नैतिक प्रदुषणयुक्त  समाज,एखाद्या दिवशी मन वैफल्याने तडफडू लागते म्हणून अशी जळजळीत कविता सुचते)

जाणिवेच्या पातळीवर

डुकरेच ना आपण सगळे..?

छे…छे….

इथे वाघ..सिंह..चित्ते आहेत,

इथे कोल्हे..लांडगे…गेंडे आहेत,

इथे कावळे, बगळे, गिधाडे आहेत,

इथे नाग.. साप.. विंचू आहेत,

जंगली हत्तींचे कळप आहेत,

उन्मत्त, मस्तवाल गवे आहेत,

रानटी कुत्र्यांची झुंड आहे,

माकड चेष्टांचा कहर आहे!

भ्याड लपणारे ससे आहेत,

भेदरट पळपुटी हरणे आहेत,

सावज पळवणारे चोर आहेत,

फिल्मी नाचणारे मोर आहेत,

टिवटिवणारे पक्षी आहेत,

सुस्त अजगर साक्षी आहेत,

समृध्द आहे रान….

भीषण आहे हे समृद्ध रान!

© सौ ऐश्वर्या परांजपे

8104535935

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – लव्हाळी – ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – लव्हाळी –  ? ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे 

सारे नावाजती वृक्षतरुंना

कुणा नजरेस दिसे लव्हाळी ?

जोमाने वाढती जागोजागी

सारेच तुडविती पायदळी..

कोपल्या निसर्गाचे तांडव

वादळ वारे पिसाटले

न साहूनी वृक्ष कोलमडले

लव्हाळीने मातीस घट्ट धरिले..

नाही वाकली नाही मोडली

धैर्याने सामना दिला वादळाला

जाहले सैरभर उजाड सारे

कणखर लव्हाळी सांत्वनाला..

वनस्पती लव्हाळी देई संदेश

जरी तिज नाकारूनी दुर्लक्षिली

असूनी इवली नगण्य जरी

चिवट जिद्दी नव्याने तरारली..!

चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पालखी-प्रस्थान.… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ पालखी-प्रस्थान…. ☆ श्रीशैल चौगुले ☆ 

चला माणसांनो

चाला माणसांनो

आयुष्याची वाट

म्हणा तुका-ज्ञानो.

 

पांडुरंगे सिध्द

पालखीला डोळे

देहू-आळंदीत

पारणे सोहळे.

 

टाळ-चिपळीला

नाम गजरही

पंढरीत स्वर्ग

वारकरी पाही.

 

अभंगाची ओवी

वाखरिला रंग

आषाढाचे वेध

सृष्टीजीव दंग.

 

चला माणसांनो

पामरची होऊ

चाला माणसांनो

भेट पुण्य घेऊ.

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 109 – गर्दीच फार झाली ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 109 – गर्दीच फार झाली

देशात दानवांची गर्दीच फार झाली।

मदतीस धावण्याची वृत्ती फरार झाली।

 

शेतात राबणारा राही सदा उपाशी।

फाशीच जीवनावर त्याच्या उदार झाली।।

 

सारे दलाल झाले सत्तेतले पुढारी।

जनसेवकास येथे नक्कीच हार झाली।।

 

भोगी बरेच ठरता निस्सीम राज योगी।

भक्तांस वाटणारी श्रद्धाच ठार झाली।।

 

जाळून जीव आई मोठे करी मुलांना ।

आई कशी मुलांच्या जीवास भार झाली।।

 

बापू नकाच येऊ परतून या घडीला।

तत्त्वेच आज तुमची सारी पसार झाली।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares